You Can Heal Your Life (Marathi)
आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात असे प्रसंग किंवा अशी वेळ येतंच असते, जेव्हा आपल्याला खूप खचल्या सारखे वाटते, कुठलीही आशा राहतं नाही. जेव्हा आपल्याला कोणतीच गोष्ट Motivate करू शकतं नाही तेव्हा आपल्यातील उत्साह संपायला लागतो.
अशा वेळी असं वाटतं ना, कोणतीतरी यावं आणि मदतीचा हात द्यावा. पण असं खरंच होतं का? कधी कधी आपल्याला एकट्याने या गोष्टींना सामोरे जावे लागते. कोणीही मदतीसाठी येत नाही. तेव्हा आपणच आपली मदत करत असतो. हो ना?
आपणच आपल्या रथाचे सारथी होतो. पण तुम्हाला या परिस्थितीतून जाण्याआधी सेल्फ हेल्प फिलॉसॉफी आणि होलिस्टिक हेल्थ चे काही मूलभूत नियम जाणून घेणे गरजेचे आहे. आणि यासाठी सगळयात उत्तम मार्ग आहे 'यु कॅन हिल युर लाईफ' या पुस्तकाचे वाचन करणे! तसं तर हे पुस्तक 1984 मध्ये लिहिल गेल आहे, तरी आज देखील हे पुस्तक तितकेच नाविन्यपूर्ण आणि इंनोव्हेटिव्ह आहे.
आपल्या लेखिका Louise यांनी 'सेल्फ हेल्प' या संकल्पनेवर आधारित पुस्तके लिहिली आहेत.
मॅन्युअल अँड मॅन्युस्क्रिप्टने एक असा ट्रेंड चालवला ज्याला आजदेखील बरेच लेखक फॉलो करतात. याआधी सेल्फ हेल्प इंडस्ट्री इतकी popular नव्हती जेवढी आज आहे आणि भविष्यात देखील ती अशीच वाढत जाणार आहे.
TO READ OR LISTEN COMPLETE BOOK CLICK HERE
Roots of problems
Roots of problem बद्दल बोलताना, आपल्या लेखीका 'Louise' म्हणातात की, अडचणी आयुष्याचा भागच आहेत. पण हे ही खरं आहे, आयुष्यातल्या बऱ्याच अडचणी आपल्यात असणाऱ्या नकारात्मक दृष्टिकोनामुळे उद्भवतात.
मी या कामासाठी योग्य नाही / मी चांगला नहीहे, हा तुमचा नकारात्मक विश्वासचं आहे जो बऱ्याच अंशी मानसिक आजारांचे कारण ठरतो. आता डिप्रेशन लाच घ्या. आपल्या सगळ्यांना माहीत आहे की डिप्रेशन हा एक गंभिर मानसिक आजार आहे आणि या आजाराने ग्रस्त व्यक्ती आयुष्याच्या प्रत्येक गोष्टीकडे पाहताना एक नाकरात्मक दृष्टिकोनचं ठेवते.
त्याचा परिणाम करियर, सामाजिक जीवन, छंद, मोटिव्हेशन या सगळ्यागोष्टीवर होतो. आज यु एस मध्ये 15 टक्के लोक कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या डिप्रेशन चे शिकार आहेत. मेलान्कोलिया (Melancholia) म्हणजेच मानसिक आजाराचे दुसरे नाव.
मेलान्कोलिया हा depression चा उपप्रकार आहे.
मेलान्कोलिया असणाऱ्या लोकांमध्ये स्वतःची काळजी घेण्याची आणि दुसर्यांना समजून घेण्याची क्षमता खूप कमी असते. असे लोक स्वतःलाचं इजा पोहोचवतात.
एका मानसशास्त्राच्या अभ्यासामध्ये हे सिद्ध झाले आहे की, डिप्रेस असणारी लोकं जेव्हा अपयशी होतात, तेव्हा ते काही असा विचार करतात, “हे तर होणारच होते, मला माहित होते माझ्यात कोणताच चांगला गुण नाही, म्हणूनच मी अपयशी होतो”,
असा विचार करून ते स्वतः लाच दोषी ठरवतात, आणि यश मिळाल्यावर मात्र याउलट विचार करतात, यश मिळाल्यावर अशी लोकं स्वतःला शाबाशी न देता, एखाद्या विशिष्ट गोष्टीमुळे हे सगळं झालं असणार, जसे की कदाचित यावेळी मी lukcy ठरलो किंवा हे काम तर खूपच सोपे होते म्हणूनच मला जमले, असा गैरसमज करून घेतात.
चला तर याचे एक टीपिकल उदाहरण पाहूया…
मार्क हा मॉडरेट डिप्रेशनने ग्रस्त असलेला मुलगा एका परीक्षेची तयारी करत होता. तयारी दरम्यान तो त्याच्या result बद्दल चिंतेने अस्वस्थ झालता. कारण त्याच्यात self confidence ची कमी होती. शिवाय त्याच्यात self Care ची ही कमी होती.
तो पुरेसा आराम करत नसल्याने त्याची अवस्था अजून बिघडत गेली. आणि जेव्हा तो नापास झाला तेव्हा त्याने स्वतःला सांगितले की, मला तर माहीतच होते की मी नापास होणार आहे. दुःखाची गोष्ट ही आहे की, मार्क चा या गोष्टीवर विश्वास बसला की तो stupid आहे आणि कधीच पास होवू शकणार नाही.
पण त्याला हे कळाले नाही की, तो महत्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष्य करत होता. परीक्षेच्या काळात प्रॉपर रेस्ट न घेतल्याने, स्वतः ची काळजी न घेतल्याने तो खूप थकलेला असायचा आणि त्यामुळे तो अभ्यासात लक्ष केंद्रित करू शकतं नव्हता. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर कळत-नकळत त्याला नेहमी असं वाटायचं “ही इज नॉट गुड इनफ!”
पण मार्क ने जर थोडा विचार केला असता तर तो असं म्हणाला असता की, ओके, मी कधी कधी negative विचार करतो पण याचा अर्थ हा नाही ना की, मी मूर्ख आहे, मी बावळट आहे. मी चांगले काम देखील करू शकतो. असा positive attitude असणे म्हणजेच एक हेल्दी, फंडामेंटल आणि रेअलिस्टिक विचारसरणी असणे होय.
TO READ OR LISTEN COMPLETE BOOK CLICK HERE
“I should” आणि “I must” पासुन “I could” पर्यंतचा प्रवास
जसं आपण मागे पाहिले, अतिरिक्त नकारात्मक विचारांमुळे आपले आयुष्य कठीण आणि अवघड होऊन बसते. आपण बघतो की काही लोक नेहमी म्हणतात, मला हे करायलाच हवे/I should, मी केलेच पाहिजे/ I must, मी करेलच/ I could याला 'टायरनी ट्रायो ( Tyranny trio ) म्हणतात.
आता एक परिस्थिती डोळ्यासमोर आणा, तुम्ही सकाळी लवकर उठून दिवसभर काय काय करायचं आहे याचा विचार करत आहात. आणि स्वतःला सांगतात की, मी आज माझ्या पुस्तकासाठी 100 पान लिहिणार.
जे जवळ जवळ अशक्य आहे. एका दिवसात कोणी एवढे पान कसं बरं लिहू शकेल. तुम्ही जेव्हा लिहिण्यास सुरुवात करता तेव्हा जसजसा वेळ जातो तसतसे तुम्हाला कळून चुकते की, तुमचे गोल तुम्ही कधीच पूर्ण करू शकणार नाहीत.
आणि संध्याकाळ होई पर्यंत तुम्हाला अगदी अस्वस्थ वाटायला लागते. कारण तुम्ही जे ठरवलं होत ते असाध्य झालेले असते. मग करता ना तुम्ही स्वतःवरचं टीका. माझ्याकडून काहीच नाही होणार, मी माझे ध्येय गाठण्यासाठी अक्षम आहे.
अशा गोष्टी तुमच्या डोक्यात येतात. पण जर तुम्ही सुरुवातीलाच, वस्तुस्थिती लक्षात घेऊन जर ध्येय ठरवले असते तर? तुम्ही जर सकाळी उठल्यावर असं म्हणाले असता की आज शक्य तितके काम करीन. जास्त ही नाही आणि कमीही नाही.
असा विचार करून दिवसाचे टार्गेट ठरवले तर तुम्ही चिंता विरहित तुमचे काम करू शकाल. जेवढे झाले तेवढे झाले, नाही झाले तरी हरकत नाही. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे स्वतःवर उगीच टीकास्त्र चालवावे लागणार नाही.
TO READ OR LISTEN COMPLETE BOOK CLICK HERE
Belief are Only a construction, not reality
प्रत्येक माणसाला त्याच्या आजूबाजूच्या वातावरणाची चांगली माहिती असते. पण त्याला असणारी माहिती ही खरी असेलच असं नाही. बऱ्याचदा ती माहिती वास्तविकतेपासून बरीच वेगळी असू शकते. म्हणून आपल्या मतांबद्दल आपण नेहमी केअरफुल राहायला (असलं पाहिजे) हवं. त्यामूळे लगेच कोणत्याच गोष्टीला ग्रँटेड घेऊ नका.
डिप्रेसिव्ह लोक स्वतःला वाईट आणि मूर्ख समजतात तर काही लोक स्वतःबद्दल अतिआत्मविश्वास बाळगतात. कारण ही लोकं मेनिअक डिसऑर्डर चे शिकार असतात. Actually हे लोकं एकाच नाण्याच्या दोन बाजूंन सारखे आहेत.
या कंटेपररी जगात आपण स्वतःची काळजी घेतलीच पाहिजे. इन्स्टाग्राम, फेसबुक सारखे सोशल मीडिया आपल्याला जाळ्यात फसवण्याचा प्रयत्न करतात. आणि आपण त्या जाळ्यात फसतो ही आणि अधिक सेल्फ-ऑब्झरव्हड होत जातो.
आपण नेहमी आपल्या फोल्लोवेर्स आणि लाईक्स चा विचार करायला लागतो. आणि खरा प्रोब्लेम तेव्हा होतो जेव्हा आपण या गोष्टींचा गर्व करायला लागतो, माझे इन्स्टाग्राम अकाउंट किती भारी आहे आणि त्यावर हजारो-लाखो फोल्लोवेर्स आहेत.
आपण एक गोष्ट विसरता कामा नये की अशा प्रकारचा कॉन्फिडन्स हा नाजूक असतो आणि तो कधीही ढासळू शकतो. रिअल कॉन्फिडन्स तर तेव्हा येतो जेव्हा आपल्याला आपल्या चुका आणि कमतरतांची जाणीव होते. कारण तेव्हाच आपल्याला कळते की कोणीही परिपूर्ण म्हणजेच परफेक्ट नसतो कारण आपण सामान्य माणूस आहोत, सुपरमॅन नाही.
बिलिफ, सेल्फ कॉन्सेप्ट आणि रिप्रेजेंटेशन या गोष्टी अचानक घडत नसतात. त्यांना यंग एज पासूनच स्वतः मध्ये कन्स्ट्रक्ट करावे लागते, जेणेकरून आपण मोठे झाल्यावर त्यांना आपल्या आयुष्यात अप्लाय करू शकतो. मानसशास्त्रज्ञाच्या मते, लहान वयापासूनच मुलांमध्ये स्ट्रॉंग बिलिफ तयार होण्यास सुरुवात होते तसेच लहान वयातच डीसफंक्शनल बिलिफ पर्सनॅलिटी डीसऑर्डर सारखे मानसिक आजार देखील उद्भवतात.
याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे सारा!
15 वर्षाच्या सारा मध्ये बॉर्डरलाईन पर्सनॅलिटी डीसऑर्डर ची लक्षणं दिसू लागली. सहाजिकच आहे की, तिला हा आजार फार लहान वयातच झाला होता. आणि या मागे असलेले मुख्य कारण म्हणजे साराची आई!
ती साराची अजिबात काळजी घेत नसे, साराला जेव्हा सांत्वन आणि सुरक्षित वातावरणाची गरज भासत तेव्हा तिच्या आईने तिला कधीच आधार दिला नाही. कित्येक वेळा साराला प्रश्न पडे की ही माझी खरी आई आहे की सावत्र! दुसरी गोष्ट म्हणजे सारा चे वडील घरी राहत नसतं. आणि यामुळे परिस्थिती आणखीनच बिकट झाली.
ते जेव्हा कधी साराला भेटत तेव्हा ही ते तिच्याशी नीट बोलत नसतं. साराला आई वडिलांकडून जे प्रेम हवं होत ते मिळालं नाही “मी चांगली नाही, म्हणूनच माझ्यावर कोणी प्रेम करत नाही” असं तिचं एक दृढ मत बनलं. अशी मुलं लवकर व्यसनाच्या आहारी जातात. साराच्या बाबतीत असंच घडलं. ती लवकरच ड्रग्सचा आहारी गेली.
मित्रांनो, सारा सारख्या लोकांनी सगळ्यात पहिले आपल्या प्रॉब्लेम चे मूळ शोधायला हवे. आई-वडिलांच्या बेजबाबदार वागणुकी मुळे त्यांनी स्वतःला दोषी नाही ठरवलं पाहिजे.
मग प्रश्न पडतो की सारा ने आपल्या आई-वडिलांना माफ केले पाहिजे की नाही? हो! तिने आपल्या आई-वडिलांना माफ करायला हवं कारण त्यांनी जी वागणूक सारा दिली कदाचित असं असु शकते की त्यांना त्यांच्या बालपणात अशीच काहीशी वागणूक मिळाली असेल. कदाचित त्यांना देखील असंच भावनाशून्य आणि हानिकारक वातावरण मिळालं असेल.
'Louise Hay' असं स्पष्ट करते की, “जर तुम्ही तुमच्या पालकांना जाणून घेऊ इच्छिता तर त्यांच्या बालपणाच्या गोष्टी ऐका. आणि सहानुभूतीने तुम्ही जर सगळं काही ऐकले तर तुम्हाला कळेल की त्यांच्या वागणुकीत रिजिड पॅटर्न कुठून आला आहे.”