When Breath Becomes Air (Marathi)
मी सीटी स्कॅन बघितले. ट्यूमर सर्व फुफुस्सांमध्ये पसरले होते आणि स्पाइनल कॉर्ड पण वाईट अवस्थेमध्ये होते. लीवरचा एक भाग पूर्णपणे खराब झाला होता. हे स्पष्ट होते की कँसरने पूर्ण शरीरावर कब्जा केला आहे.
मी माझ्या न्यूरोसर्जनच्या अभ्यासाच्या शेवटच्या वर्षात शिकत होतो. मागील 6 महिन्यांपासून मी माझ्या पेशंट्सवर उपचार करण्यासाठी, अशाप्रकारच्याच सीटी स्कॅन प्रोसिजरच्या शोधात होतो. पण आज मात्रं, मी कोणत्या पेशंटचा नाही तर खुद्दं स्वतःचा सीटी स्कॅन पाहत आहे.
माझी पत्नी लूसी माझ्यासोबतच होती. मी डॉक्टरांच्या सफेद कोट ऐवजी पेशंट्सचा गाऊन घातला होता. मी माझा सीटी स्कॅन बारकाईने पाहत होतो, कदाचित त्यातून कोणता आशेचा किरण तर मिळत नाही ना, या भावनेने मी माझा सीटी स्कॅन बारकाईने पाहत होतो.
जवळजवळ, 6 महिन्यांपूर्वी मला माझ्यामध्ये काही बदल जाणवत होता. अचानकच माझे वजन घटले होते आणि कंबर भयंकर दुखत होती. मी लगेच माझ्या डॉक्टरकडे गेलो होतो. मी सध्या फक्त 35 वर्षांचाच आहे आणि या वयात या सर्व गोष्टींचा एकच अर्थ निघतो, तो म्हणजे, “कॅन्सर”.
एक्स-रे रिझल्ट माझ्या समोर होता आणि त्यात स्पष्टपणे माझ्या आजाराबाबत समजत होते. मी कंबरेच्या वेदना दूर करणारी ब्रुफेन घेतली. कदाचित जास्तं काम केल्यामुळे ही लक्षणे दिसत असावी. मी पुन्हा आपल्या कामाला लागलो. दवाखान्यात मी रेजिनेंट डॉक्टर होतो.
मला ग्रॅज्युएशन पूर्ण व्हायला फक्त एक वर्षांचा कालावधी होता. बहुतेक युनिवर्सिटीजकडून मला जॉब ऑफर येत होत्या. आता माझ्या समोर माझं आख्खं फ्युचर पडलं होतं.
पण, काहीच आठवड्यात माझ्या छातीत खूप दुखू लागले. माझे वजन 80 किलो वरून 65 किलो पर्यंत घटले होते आणि खोकला तर थांबायचे नावच घेत नव्हता.
मला कँसर होता ही गोष्टं निसंशय होती. तरीही मी लूसीपासून काही लपवले नाही, आधीच आमच्या नात्यात कडवटपणा होता, तिला वाटत होते की मी तिला जास्तं वेळ देत नाही.
माझं कामच असं होतं की मला कामातून वेळच मिळत नव्हता. लूसी आणि मी कित्येक दिवस भेटू शकत नव्हतो. मला सतत वाटायचे की ही रेजीडेंसी पूर्ण झाल्यानंतर, लूसी आणि माझ्यामध्ये सगळं ठिक होऊन जाईल.
पुढील 36 तास मी ऑपरेशन रूममध्ये होतो. माझ्याकडे एन्युरसिम्स आणि बाईपास सारख्या कठिण केस आल्या होत्या. मला एक मिनिट ही आराम नव्हता. त्यानंतर मी आणखी एक एक्स-रे काढला.
काही दिवसांनी डॉक्टरांनी मला फोन केला आणि सांगितले की माझ्या छातीचे एक्स-रे क्लिअर नव्हते, ते खूपच पुसट होते. याचा अर्थ डॉक्टर व मला, आम्हा दोघांनाही चांगलाच माहित होता.
मी लूसीसोबत घरी बसलो होतो. मी तिला सर्व काही सांगितले.
ते ऐकून तिने माझ्या खांद्यावर तिचे डोके टेकवले. त्या एका क्षणात आमच्यामधील सगळा कडवटपणा नाहीसा झाला. मी तिच्या कानात हळूच बोललो “मला तुझी गरज आहे”
“मी तुला सोडून कुठेही जाणार नाही” ती उत्तरली.
आम्ही दवाखान्यातील एका डॉक्टर मित्राला कॉल केला. मी त्याला विचारले की, तो मला अॅडमिट करू शकेल का. कुण्या पेशंटप्रमाणेच मी हॉस्पिटलचा गाऊन आणि प्लॅस्टिकचे ब्रेसलेट घातले. मी त्याच रूममध्ये अॅडमिट होतो जिथे मी अनेक पेशंट्सवर उपचार केले होते.
जोपर्यंत श्वास आहेत तोपर्यंत थांबू नका
लूसी आणि मी हॉस्पिटलच्या बेडवर बसून रडत होतो. ती मला म्हणाली की, ती माझ्यावर खूप प्रेम करत आहे, आणि मी पण तिला रडत-रडत म्हणालो की, “मला आता मरायचे नाहीए”. त्यानंतर मी तिला म्हणालो की, तिने दुसरे लग्नं करावे. कारण माझ्यानंतर तिने एकटीने जगावे असे मला वाटत नव्हते.
एवढी वर्षे मी पूर्ण जीव ओतून फ्यूचर बनवण्यासाठी मेहनत घेत होतो. पण आता या गोष्टींना काहीच अर्थ उरला नाही. माझ्याकडे आता काहीच उरले नव्हते. जर मी डॉक्टर बनलो नसतो तर माहित नाही काय बनलो असतो. आज मला कळते आहे की, मृत्यूच्या तोंडातून जाताना माझ्या पेशंट्सना काय वाटत असेल.
मला सकाळी डिस्चार्ज मिळाला. त्यानंतर मला माझ्या पर्सनल ओंकोलोजिस्ट(oncologist) एम्मा हेवार्ड (Emma Hayward) ला भेटायचे होते. त्या देशातील सर्वात मोठ्या लंग कॅंसर डॉक्टर होत्या.
माझे आई-वडिल आणि भाऊ पण आला होता. एम्मा म्हणाली “मला तुमच्या आजाराबद्दल ऐकून खूप वाईट वाटले, तुमच्या सर्वांबाबतीतच मला वाईट वाटत आहे.” तिने लॅबमध्ये माझ्या ट्यूमरच्या सँपलची टेस्ट करून घेतली होती. आता मला जी ट्रिटमेंट दिली जाणार ती रिझल्टवर डिपेंड होती. मी तिला विचारले की माझ्याकडे आता किती वेळ बाकी आहे., पण तिने ते सांगण्यास नकार दिला.
एक डॉक्टर असल्या कारणामुळे मला हे जाणून घेण्याचा पूर्ण हक्क होता, पण एम्मा म्हणाली,“ नाही, आपण नंतर थेरपीबद्दल बोलू शकतो, तुला हवे असेल तर आपण तू ठिक झाल्यावर तुझ्या परत कामावर जाण्याबाबतही बोलू शकतो.”
तिने हे देखील सांगितले की, माझी कीमोथेरेपीची औषधेसुध्दा बदलली जाऊ शकतात. एक सर्जन असल्या कारणाने मला हे माहित होते की, या औषधांचा वाईट परिणाम माझ्या नर्वस सिस्टिमवर नाही झाला पाहिजे. सिस्प्लेटिन(cisplatin) च्या बदल्यात मला कार्बोप्लेटिन (carboplatin) दिले जाणार होते.
मी माझ्या मनातच विचार करत होतो की, परत कामावर जायचे ? ही काय बोलत आहे ? ती स्वप्नात तर बोलत नाही ना?
एम्मा तिचे कार्ड देऊन गेली. दोन दिवसांनी मला पुन्हा तिला भेटायचे होते.
मला एम्माने सांगितले की उपचारांचे दोन मार्ग आहेत, एक म्हणजे कीमोथेरपी. जी अत्यंत साधारण ट्रीटमेंट आहे आणि अधिक प्रमाणात लोकं ती वापरतात.
यामध्ये कॅँसर सेल्स नष्ट केले जातात पण त्याचसोबत शरीरातील हेल्दी सेल्सही नष्ट होतात, जे बोन मॅरो, आतडे, केसांचे फोल्लीस्ल्स (hair follicles) आणि इतर ठिकाणी असतात. दुसरा मार्ग म्हणजे, नवीन डेव्हलप झालेली थेरपी, ज्यामध्ये मॉलिक्यूलर लेवलवरच कँसर सेल्सला नष्ट केले जाते.
मला सांगितले गेले की, जर माझ्या शरीरात ईजीऍफ़आर (EGFR) कँसर म्यूटेशन असेल तर मला टारसीवा नावाचे औषध दिले जाणार आणि त्यात कीमोथेरेपीसुध्दा करावी लागणार नाही. मी माझ्या सर्जन ड्युटीवर पुन्हा जाऊ शकेन यावर एम्माला पूर्ण विश्वास होता.
जेव्हा किमोची गरज भासत तेव्हा तिने मला Cisplatin ऐवजी carboplatin दिले ). मला माहित होतं, एम्मा मला हे सांगणार नाही. म्हणून, मी स्वतःच रिसर्च करू लागलो की, मी आणखी किती दिवस जगू शकणार आहे.
मागील काही दिवसांपासून मला कळत नव्हते की, कुठून सुरूवात करावी. पण मला इजीऍफआर म्यूटेशनबद्दल समजल्यापासून माझे जगण्याचे चान्सेस जास्त आहे, हे मला कळाले होते.
लूसी आणि मी ठरवले होते की माझी रेजीडेंसी पूर्ण झाल्यानंतर आम्ही मुलांना जन्मं देणार, पण आता माझ्याच जगण्याचा काही पत्ता नव्हता तर या गोष्टीवर विचार करणे म्हणजे निरर्थकच. दुसऱ्या दिवशी आम्ही दोघं स्पर्म बँकेत गेलो.
एक रेजीडेंट सर्जन असल्याने, पेशंट आणि त्यांच्या नातेवाईकांना मी त्यांच्या कठिण प्रसंगी त्यांना आधार देण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे कोणत्याही डॉक्टरसाठी कठिण काम असते.
एखादी 94 वर्षांची वृध्द (dementia) डेमेंटीया ने ग्रस्त असेल तर ही काय खूप मोठी गोष्टं नाही, पण जर 36 वर्षांच्या तरूणाला टर्मिनल कँसर होणं म्हणजे अधिक दुःखाची गोष्टं आहे. त्यामुळं स्वतः ला कसा दिलासा द्यावा, हे मला समजत नव्हते.
लूसी आणि मी जेव्हा घरी पोहचलो तेव्हा मला फोन आला की, मला ट्रीटेबल कँसर म्यूटशन ईऍफजीआर आहे, ज्यावर उपचार होऊ शकतो. आता मला किमोची गरज नव्हती, फक्त मला टारसीवाची छोटी गोळी घ्यावी लागणार होती. हे सगळं ऐकून माझी हिम्म्त वाढली, आता मला थोडा आशेचा किरण दिसू लागला.