The Power of your subconscious mind (Marathi)

The Power of your subconscious mind (Marathi)

1: The power of your Subconscious mind.

मला सांगा, जर मी तुम्हाला तुमच्या ब्रेन बद्दल विचारलं, तर तुमच्या मनात कोणते विचार येतील? तुमचं उत्तर काही असं असेल की, मेंदू झालेल्या गोष्टींना, परीक्षेसाठी केलेल्या अभ्यासाला लक्षात ठेवतो, तसेच तो शरीराचे नियंत्रक म्हणून काम करतो. हेच सांगाल ना तुम्ही?

पण, आज मी तुम्हाला यापेक्षा काही वेगळं सांगणार आहे. तुम्हाला माहिती आहे का, तुमचं subconscious mind, जे तुमच्या ब्रेनचा एक भाग आहे, ते किती Powerful आहे? तुमचं Subconscious mind  किती powerful आहे, याचा तुम्ही विचारही करू शकणार नाही. मित्रांनो, तुमच्यात एक खजिना आहे. तुम्हाला त्या खजिण्याबद्दल सांगण हाच या पुस्तकाचा एकमेव उद्देश आहे. जेणेकरून तुम्ही त्या खजिन्याचा पुरेपूर फायदा घ्याल.

तर चला, Subconscious mind ची ताकत ओळखण्यासाठी एक उदाहरण पाहूया.
एक 75 वर्षांची विधवा महिला होती. तिने आपल्या लेखकास पत्र लिहिले. त्या पत्रात ती म्हणाली, तिला पुन्हा लग्न करण्याची इच्छा आहे. लग्न करून संसारात सुखी राहायचं आहे. लेखकांनी तिला काही गोष्टी करायला सांगितल्या. त्या तिने काळजीपूर्वक फॉलो केल्या.

मग काय! तेच झाले, एके दिवशी त्या महिलेची भेट एका प्रसिद्ध फार्मासिस्टशी झाली. दोघांनाही एकमेकांवर प्रेम झालं. आज दोघेही विवाहित आहेत आणि खूप आनंदी जीवन जगत आहेत. हो! ऐकताना आश्चर्य वाटतं असेल, पण हे खरं आहे. मग प्रश्न येतो, आपल्या लेखकांनी त्या महीलेस असं काय सांगितलं की, तिला जे हवं होत, ते तिला मिळालं. लेखकांनी सांगितलेली अशी कोणती गोष्ट तिने फॉलो केली असेल बरं?

तुमच्या subconscious mind च्या मदतीने तुम्हाला जे हवं आहे ते तुम्ही मिळवू शकता. ती महिला नेहमी स्वतःला आठवण करून देत होती की,  “मी विवाहित जीवन जगत आहे आणि माझ्या पतीचे माझ्यावर खूप प्रेम आहे, मी खूप खुश आहेे.” काल्पनिक गोष्ट सत्यात रूपांतरित होण्याचे कारण दुसरे तिसरे नसून, तिचा विश्र्वासच होता, ज्यामुळे तिला जे हवं ते मिळालं. आहे ना मग तुमचं subconscious mind एक सोन्याची खान! आयुष्य किती सुंदर असेल ना, जेव्हा तुम्ही तुमच्या subconscious mind ला कंट्रोल करायला शिकाल. याला अजून नीट समजून घेण्यासाठी तुम्हीच अनुभवलेलं एक इंटरेस्टिंग उदाहरण पाहुया.

असं कधी झालाय का, तुम्ही रस्त्याने घाईत जात होता आणि रस्त्याने जाताना तुमच्या मनात हाच विचार चालू होता की, “ट्रॅफिक लागू नये, ट्रॅफिक लागू नये” तुम्हाला माहित नसेल पण, हा ट्रॅफिक बद्दलचा तुमचा विचार तुमच्या सब-कोंशेस माईंडला “ट्रॅफिक” बद्दल विचार करण्यास भाग पाडत होता आणि याचा परिणाम म्हणजे, तुम्हाला ट्रॅफिक लागलं असेल. पण, याचा थोडाही अंदाज त्यावेळी तुम्हाला नसेल, हो ना?

अशाच छोट्या मोठ्या गोष्टी आपल्या जीवनात होत असतात. खरं तर आपणच त्यांना आमंत्रण देत असतो. आपलं subconscious mind जणू एक ड्रायव्हर असते आणि आपण त्या ड्रायव्हरला दिशा सांगणारे. त्यामुळे आपल्या मनात कधीही नकारात्मक आयडियांना येऊ देऊ नका. नेहमी Positive राहा.

आपण याचे एक उदाहरण पाहुया, एका महिलेस सब-कोंशेस माईंडच्या Power बद्दल माहीत होते. जेव्हा ती वयोवृद्ध झाली, तेव्हा तिला कळाले की, तिची स्मरणशक्ती हळू हळू कमी होत आहे आणि तो दिवस दूर नाही, जेव्हा ती सगळं काही विसरून जाईल, पण तीने Positive विचार केला, ती स्वतःला नेहमी सांगत राहिली की, तिची स्मरणशक्ती दिवसेंदिवस वाढत आहे, तो तिचा मजबूत विश्वासचं होता ज्यामुळे तिला जे हवं होत ते मिळालं आणि उतारवयात देखील तिची स्मरणशक्ती शाबूत राहिली.

2: मला सांगा तुमचे ब्रेन कसे काम करते?

तुम्हाला माहित आहे का, आपल्या मनाचे 2 भाग असतात. पहिला आहे conscious mind आणि दुसरा subconscious mind. हे दोन वेगवेगळे भाग असले तरी ते एकमेकांशी connected असतात.

वर्तमानात तुम्ही ज्या गोष्टींचा विचार करता त्या सर्व गोष्टींचा समावेश Conscious mind मध्ये होतो आणि तुम्ही जो विचार करता तो विचार तुमच्या Subconscious mind वर प्रभाव टाकतो. यातून तुम्हाला हे कळाले असेलच की, conscious आणि Subconscious हे वेगवेगळे नसून एकाच ब्रेनच्या दोन वेगळ्या लेव्हल आहेत.

विचार करण्याचे काम तुमचे Conscious mind करत असते आणि Subconscious mind तुमच्या Conscious mind वर किंवा त्या विचारांवर विश्वास ठेऊन प्रत्येक गोष्ट स्वीकारत असते. मग, तुम्ही कोणताही विचार करा, चांगला किंवा वाईट, तुमचे Subconscious mind आहे त्या information ला स्वीकारत असते. तुमच्या Subconscious mind पर्यंत कोणते विचार पाठवायचे हे तुमच्याच हातात आहे.

लक्षात ठेवा तुमच्या भाग्याचे शिल्पकार तुम्हीच आहात. सगळे नियंत्रण तुमच्याच हातात आहे. म्हणून positive विचार करा, आणि सुखास आमंत्रण द्या.

TO READ OR LISTEN COMPLETE BOOK CLICK HERE

3: तुमच्या सब-कोंशेस माइंडची, काम करण्याची जादुई ताकत.

तुम्ही एनेस्तीथीसिया बद्दल ऐकले आहे का? एनेस्तीथीसिया म्हणजे operation करण्याआधी patient ला बेशुद्ध करण्याचे शास्त्र. पण त्यावेळी काय होत होते जेव्हा याचा शोध लागला नव्हता.

जेम्स एस्दिले हे एक स्कॉच सर्जन होते. एनेस्तीथीसियाचा शोध लागलेला नसताना, त्यांनी या जादुई ताकतेचा वापर कसा करून घेतला ते आपण पाहूया, त्यांनी जवळजवळ 400 operations केले होते.  Dr. जेम्स एस्दिले आपल्या patients ला मेंटल एनेस्तीथीसिया देत असे.  त्यांचा mortality rate म्हणजेच patient मरण्याचा रेट ही कमी होता, फक्त 2-3%. ते त्यांच्या patinet ला मेंटल एनेस्तीथीसिया देऊन पूर्ण विश्वासात घेत होते. काय आहे बरं मेंटल एनेस्तीथीसिया?

Dr. जेम्स एस्दिलेे operation करण्याअगोदर, patient च्या Subconscious mind ला हिप्नोटिक करतं आणि त्यांच्या कानात बोलतं की, “operation करताना तुम्हाला कोणताही त्रास किंवा इन्फेक्शन होणार नाही, तुम्ही खूप strong आणि स्वस्त आहात याची मला पूर्ण खात्री आहे”

तुमचे सब-कोंशेस माईंड तुमच्या प्रत्येक गोष्टीला control करते, तुमचे blood circulation ( रक्तभिसरण ), तुमचे digestion, तुमच्या शरीराचा प्रतिसाद, अगदी तुम्हाला होणाऱ्या त्रासासही. म्हणूनच Dr. जेम्स एस्दिलेे operations करताना patients ला कमी वेदना होत होत्या.

तुमचे negative विचार तुमचे distractive emotions असतात. हे distractive emotions तुमच्यासाठी इतके घातक आहेत की तुम्हाला ulser, हार्ट प्रोब्लेम्स, एंजाईटी असे मेंटल इलनेस सारखे आजार होवू शकतात. म्हणूनच आता तुमच्या डोक्यात येणाऱ्या सगळ्या विचारांवर लक्ष द्या. कारण तेच विचार तुमच्या कृती मध्ये उतरतील. चुकूनही negative विचार येऊ लागले तर, स्वतःला सांगा हे विचार माझ्यासाठी घातक आहेत आणि त्या विचारांना एखाद्या वस्तू सारखं स्वतः पासून लांब करा.

हे ऐकून मनात प्रश्न येत असतील ना? हे कसं शक्य आहे? वस्तूला लांब ठेवलं जाऊ शकतं, पण विचारांना कसं लांब ठेवायचं? दोन्ही गोष्टी एक सारख्या नक्कीच नाही. तुम्ही जो विचार कराल, तेच तर तुमचे subconscious mind ऐकत आहे. म्हणून सुरुवात इथूनच करा.

स्वतःला हे करण अवघड किंवा अशक्य आहे, हे सांगण बंद करा, पण याला शक्य करण्याचा मार्ग काय असेल हे नक्की मनाला विचारा. म्हणजे अशक्य वाटेल असे विचार मनात आणू नका, पण अशक्य गोष्टीस शक्य कसं करता येईल असे विचार मनात येऊ द्या.

मी सांगू तो मार्ग? तर ऐका, तुम्ही झोपण्याधी, तुम्हाला जे काही हवं आहे, मग ते काहीही असूद्या, जसे की तुमचे चांगले आरोग्य, पैसा, exam मध्ये तुम्हाला किती मार्क्स हवेत किंवा लोकांशी चांगल नात बनवणे वगैरे, वगैरे..जे काही असेल, ते स्वतःला सांगा. असं feel करा की तुम्हाला ती गोष्ट हवीच आहे आणि तुम्ही पूर्ण मनाने तिला स्वीकारण्यासाठी तयार आहात.  अगदी तसचं घडेल जसं तुमच्या ब्रेनने imagine केल असेल.  म्हणूनच Positive विचारांना जन्म देत रहा. तुमच्या ब्रेनला प्रोग्रॅम करत रहा.

4: मेंटल हीलिंग ची जुनी आणि नवी पद्धत

एका एक्सपेरिमेंट मध्ये हीपनोटीस केलेल्या लोकांना सांगितले, त्यांना एखादा मोठा आजार आहे. आणि खरोखरच त्या लोकांच्या शरीराने त्या आजाराची लक्षणे दाखवण्यास सुरुवात केली. कारण त्यांच्या subconscious mind ने त्यांना मोठा आजार झाला आहे यावर विश्वास ठेवला.

आणि त्यानूसार subconscious mind ने त्यांच्या शरीरात त्या आजाराची लक्षणे निर्माण केली. हे या उलटही काम करते, जेव्हा  खरोखर आजारी असणाऱ्या एखादया माणसाला सांगितले जाते तुम्ही ठीक होत आहात. तेव्हा आजारी व्यक्ती ही पूर्णपणे बरी होते.

1910 चा एक प्रसिद्ध किस्सा ऐकायला आवडेल तुम्हाला? तर ऐका, एका व्यक्तीला टंग पैरालिसिस झालते. म्हणजे त्याची जीभ अर्धांगवायू झाली होती. त्याकाळी यावर कोणताच उपचार उपलब्ध नव्हता. तो व्यक्ती डॉक्टर कडे गेला आणि डॉक्टरने त्याच्या तोंडात एक थर्मामीटर ठेऊन त्याला म्हणाले, हे एक नवीन इंस्ट्रूमेंट आहे ज्यानी तुमची जीभ ठीक होईल. त्याच्या subconscious mind ने शरीरातून अगदी काही मिनिटांत प्रतिसाद दिला आणि त्याची जीभ ठीक झाली. तो तिला हलवूही शकला.

आपल्यातील खूप लोकांना subconscious mind बद्दल माहीत आहे. पण खूप लोकांना याचा योग्य वापर करणे माहीत नाहीे. त्याच्या सामर्थ्याने त्यांचे जीवन कसे बदलेल, कदाचीत हे त्यांना ठाऊक नाही. तुमच्या डोक्यात एक plan बनवा.

इमॅजिन करा की तुम्ही त्या प्लॅन नुसार काम करत आहात आणि हो, imagination करतांना नेहमी positive विचार ठेऊन इमॅजिन करा, कारण मधेच negative विचार येऊ लागले तर तुम्ही पूर्ण मनाने इमॅजिन करू शकणार नाही. सोबतच हेही लक्षात ठेवा जे हवं आहे ते तुम्हाला मिळालं आहे असा विचार करा. त्या imagination मध्ये तुमच्या भावनांना ही फील करा.

TO READ OR LISTEN COMPLETE BOOK CLICK HERE

SHARE
Subscribe
Notify of
Or
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments