The One Minute Manager (Marathi)
परिचय
लोकांना चांगल्या पद्धतीने कसं मॅनेज करायचं हे तुम्हाला समजून घ्यायला आवडेल का? तुम्हाला एक चांगला मॅनेजर बनायचं आहे का? तुम्हाला असे काही उपाय ठाऊक आहेत का ज्यामुळे तुम्ही तुमच्या ग्रुपची उत्पादकता वाढवू शकाल आणि त्यांच्यामध्ये आनंद पसरवू शकाल?
तुमचा विश्वास बसणार नाही पण तुम्ही हे सारं अगदी एका मिनिटात करू शकता. सगळ्यात अगोदर तुम्हाला ध्येय निश्चित करण्यासाठी एक मिनिट हवा. दुसरं, तुम्हाला लोकांचं कौतुक करण्यासाठीही एक मिनिट लागेल. तिसरी गोष्ट ही की तुम्हाला लोकांच्या चुका सांगण्यासाठीही एक मिनिट लागेल.
आणि विश्वास ठेवा, तुम्ही ही पद्धत वापरली तर तुमचा ग्रुप खुश राहील आणि उत्तम कामगिरीही करू शकेल. जर तुम्ही एक मॅनेजर असाल किंवा मॅनेजर बनण्याची तुमची इच्छा असेल तर हीच वेळ आहे तुमच्या मानसिकतेला बदलण्याची.
ह्या पुस्तकामधून तुम्ही जे काही शिकणार आहात त्यावर नीट लक्ष द्या आणि मग त्याचा वापर करा. या वन मिनिट पुस्तकातून कोणीही शिकू शकतो, मग तो एखादा कर्मचारी असो, पालक असो, शिक्षक असो किंवा प्रेमी असो.
TO READ OR LISTEN COMPLETE BOOK CLICK HERE
शोध (The search)
ह्या पुस्तकाची सुरुवात होते एका तरुणापासून, ज्याला प्रभावी मॅनेजर कसं बनायचं हे जाणून घ्यायचं असतं. आणि हे जाणून घेण्यासाठी तो वेगवेगळ्या संस्थांमध्ये जातो. बँक, रेस्टॉरंट्स, हॉटेल्स, दुकानं, युनिव्हर्सिटी, सरकारी आणि कॉर्पोरेट ऑफिस.
त्याला तिथे खूप मॅनेजर्स भेटतात जे स्वतःला ऑटॉक्रॅटीक, रिअलिस्टीक आणि प्रॉफिट ओरिएंटेड म्हणत होते. कारण ते खूप रिझल्ट ओरिएन्टेड होते. आणि म्हणूनच त्यांची लोकांमधली Image एक कठोर मॅनेजर अशी होती.
हे मॅनेजर्स ज्या संस्थेत काम करायचे ती संस्था नेहमीच फायद्यात असायची. पण ह्या भानगडीत त्या मॅनेजर्सच्या हाताखाली काम करणारे कधीच समाधानी राहू शकत नसत.
आणि काही असेही मॅनेजर होते ज्यांची Image पार्टिसिपेटीव्ह, दुसऱ्यांच्या भावना समजून घेणारी आणि माणुसकीच्या प्रवृत्तीच्या मॅनेजर्सची होती. लोकांना हे मॅनेजर्स आवडत असत. हे मॅनेजर्स लोकांचा जास्त विचार करणारे होते, पण यांच्यासोबत उलट व्हायचं. ह्यांची संस्था कधी तितकीशी फायद्यामध्ये रहायची नाही मात्र कर्मचारी खूश असत.
आता हा तरुण निराश झाला. त्याला वाटत होतं की ज्या मॅनेजर्सना तो आत्तापर्यंत भेटला आहे, ते लोक फक्त अर्ध कामच करत आहेत. तो इतका निराश झाला की त्याने मॅनेजर बनायचा आपला विचार सोडून दिला. पण पुढे एक दिवस त्याच्या जवळच्याच शहरात राहणाऱ्या एका स्पेशल मॅनेजरविषयी त्याने ऐकलं.
लोकांना हा मॅनेजर खूप आवडायचा आणि त्याच्यासाठी काम करायला ते सहजपणे तयार असत. त्याच्या हाताखाली काम करणार्या टीमचा रिझल्ट नेहमीच सर्वात उत्तम असायचा. हे सगळं ऐकून त्या तरुणाची उत्सुकता थोडी वाढली आणि त्याने त्या स्पेशल मॅनेजरच्या ऑफिसमध्ये फोन करून भेटीची वेळ मागितली.
TO READ OR LISTEN COMPLETE BOOK CLICK HERE
वन मिनिट मॅनेजर
जेव्हा त्या तरुणाने स्पेशल मॅनेजरच्या ऑफिसमध्ये प्रवेश केला तेव्हा त्याने बघितलं की तो मॅनेजर खिडकीजवळ उभा होता. त्याने त्या तरुणाकडे वळून हसत हसत विचारलं “मी तुझ्यासाठी काय करू शकतो?”
“लोकांना मॅनेज कसं करायचं हे मला शिकायचं आहे” तरुणाने उत्तर दिलं. तो स्पेशल मॅनेजर स्वतःला पार्टिसिपेटीव्ह मानत नव्हता किंबहुना कुठल्याही निर्णय प्रक्रियेमध्ये तो सहभागी व्हायचा नाही असं त्याचे सहकारी सांगत.
आणि तो स्वतःला रिझल्ट ओरिएन्टेडही मानत नव्हता. किंबहुना तो निकालाच्या बरोबरीनेच लोकांचीही काळजी करायचा. त्याच्यासाठी ह्या दोन्ही गोष्टी सारख्याच महत्त्वाच्या होत्या. त्याच्या डेस्कवर एक नोट लिहिलेली होती.
“People who feel good about themselves produce good results” म्हणजेच जे स्वतःबद्दल चांगला विचार करतात तेच उत्तम रिझल्ट देऊ शकतात. त्या तरुणाच्या लक्षात आलं की ही गोष्ट १०० % बरोबर आहे. स्पेशल मॅनेजर नेहमी आपल्या ग्रुपला चांगल्या पद्धतीने वागवायचा.
त्यामुळे त्या लोकांमध्ये अधिक काम करण्याची इच्छा उत्पन्न होत असे. त्या लोकांच्या कामाचा दर्जाही उत्तम असायचा. तो मॅनेजर त्या तरुणाला खिडकीजवळ घेऊन गेला. त्याने खिडकीतून बघितलं की खूप सारे लोक परदेशी गाड्या घेत होते.
स्थानिक बनावटीच्या गाड्यांचा पुरवठा कमी होता असं नाही. पण लोक परदेशी गाड्यांची निवड करत होते कारण त्या जास्त आरामदायक आणि कार्यक्षम होत्या. त्यासाठी उत्पादनक्षमतेमध्ये संख्या आणि गुणवत्ता दोन्ही असायला हवं.
मॅनेजरने सांगितलं की या दोन्ही गोष्टी मिळवायच्या असतील तर लोकांमध्ये गुंतवणूक करायला हवी. तरुणाने विचारलं “तुम्ही जास्त सहभाग घेत नाही. तुम्ही प्रॉफिट माइंडेडही नाही. मग तुम्ही स्वतःला कुठल्या पद्धतीचा मॅनेजर समजता?”
“हा खूप सोपा प्रश्न आहे. मी वन मिनिट मॅनेजर आहे.” मॅनेजर ने उत्तर दिलं. आणि त्यांचं म्हणणं बरोबर होतं. कारण वन मिनिट मॅनेजर कमीत कमी वेळेतही लोकांकडून मोठा रिझल्ट काढून घेऊ शकतात. त्या तरुणाने आजवर त्या स्पेशल मॅनेजरसारखं कोणी बघितलं नव्हतं.
त्याचा विश्वासच बसला नाही. “ऐक, जर तुझा विश्वास नसेल तर, मी कसा मॅनेजर आहे हे तू माझ्या हाताखालील कर्मचाऱ्यांना विचारू शकतोस” मॅनेजरने सांगितलंं. त्याने त्या तरुणाला एक कागद दिला. त्यामध्ये जेे त्याला थेट रिपोर्ट करतात अशा लोकांची नावं लिहिली. “कोणापासून सुरुवात करू?”
तरुणाने विचारल. त्यावर मॅनेजर म्हणाला “मी आधीच तुला सांगितलं आहे की दुसर्या लोकांसाठी मी निर्णय घेत नाही” ते दोघेही थोडा वेळ शांत राहिले. तो तरुण बेचैन झाला. तेव्हा मॅनेजरने त्याच्या नजरेला नजर देत सांगितलं “तू लोकांना कसं मॅनेज करायचं हे शिकतो आहेस हे बघून मला बरं वाटलं”
“माझ्या लोकांना भेटल्यावर तुझ्या मनात काही शंका असतील तर माझ्याकडे ये” मी वन मिनिट मॅनेजर ही संकल्पना तुला भेट देईन, जी मलाही कोणीतरी भेट दिली होती. त्यामुळे माझं आयुष्यच बदलून गेलं. ही संकल्पना तुला आवडली तर कदाचित एक दिवस तू सुद्धा वन मिनिट मॅनेजर बनू शकशील.
TO READ OR LISTEN COMPLETE BOOK CLICK HERE
पहिले रहस्य – वन मिनिट ध्येय (One minute goal)
त्या तरुणाने त्याच्या यादीतून तीन नावं निवडली. तो सगळ्यात आधी मिस्टर ट्रेनेल ह्याला त्याच्या ऑफिसमध्ये जाऊन भेटला. मिस्टर ट्रेनेल एक मध्यमवर्गीय माणूस होता. तो त्याला बघून हसला. “बरं, तू manager ला भेटून आला आहेस तर. कमालीचा माणूस आहे ना तो? त्यांनी तुला वन मिनिट मॅनेजरबद्दल सांगितलं का?”
“हो सांगितलं ना. पण हे खरं नाही ना?” त्या तरुणाने विचारलं. अगदी खरं आहे आणि तुला ह्यावर विश्वास ठेवायला हवा. पण मी स्वतः खूप कमी वेळा भेटतो त्यांना”. मिस्टर ट्रेनेल म्हणाले. तो तरूण आता अधिकच गोंधळात पडला.
Manager हे मिस्टर ट्रेनेलला काही नवं काम किंवा जबाबदारी द्यायची असेल तेव्हाच भेटत असत. वन मिनिट मॅनेजर मिस्टर ट्रेनेलला वन मिनिट ध्येय ठरवून देत असत. बऱ्याच संस्थांमध्ये हाताखालचे कर्मचारी त्यांच्या ध्येयाविषयी गोंधळलेले असतात.
त्यांना ठाऊकच नसतं की त्यांना नक्की काय करायचं आहे. पण वन मिनिट मॅनेजर त्यांच्या सहकाऱ्यांना त्यांची जबाबदारी काय असेल आणि संस्थेला त्यांच्याकडून काय अपेक्षित आहे हे स्पष्ट करून देतात.
ते आपल्या सहकाऱ्यांना वन मिनिट ध्येय नक्की करण्यामध्येसुद्धा मदत करतात. हाताखालचे कर्मचारी आपली ध्येय एका कागदावर लिहून घेतात. प्रत्येक ध्येय लिहिण्यासाठी २५० पेक्षा जास्त शब्द वापरायचे नाहीत.
हाताखालचे कर्मचारी आणि वन मिनिट मॅनेजर दोघेही ह्या ध्येयाची प्रत स्वतःजवळ ठेवतात. आणि मग वेळोवेळी किती प्रगती झाली आहे हे तपासलं जातं. वन मिनिट ध्येय ठरवल्यामुळे आपल्याला काय करायचं आहे प्रत्येक सदस्याला ठाऊक असतं.
जसं उदाहरणार्थ मिस्टर ट्रेनेलचं एक ध्येय आहे, “समस्या शोधून त्या समस्येवरचा उपाय शोधायचा, ज्यामुळे ती समस्या मिटून जाईल” जेव्हा मिस्टर ट्रेनेल ह्या कंपनीत नवीन आले होते तेव्हा एकदा ते आपल्या वन मिनिट मॅनेजरकडे एका समस्येवर चर्चा करण्यासाठी आले होते.
यावर मॅनेजरने म्हणाले “मला फक्त हे सांगा की तुमचे निरीक्षण काय आहे? आणि तुम्ही चुकीचं मोजमाप करू शकता का? भावनिक गोष्टींबद्दल मला काही सांगू नका”
हे ऐकून मिस्टर ट्रेनेल गोंधळात पडले. त्यांना कळलंच नाही ते काय बोलले.
मॅनेजरने मिस्टर ट्रेनेलला सांगितलं “माझा वेळ फुकट घालवू नका. जर तुम्हाला काय करायचं आहे हे तुम्हाला स्वतःलाच ठाऊक नसेल तर त्याचा अर्थ असा की कुठलीही समस्याच नाहीये.
तुम्ही फक्त तक्रार करत आहात” तर अशाप्रकारे मॅनेजरने मिस्टर ट्रेनेलला ते जोपर्यंत सर्वात उत्तम उपाय घेऊन येत नाही तोपर्यंत मार्गदर्शन केलं. “आता तू बरोबर आहेस ट्रेनेल. लक्षात ठेव पुढच्यावेळी एखादी खरोखरची समस्या घेऊन ये”
वन मिनिट ध्येय (One minute goal) ह्या पद्धतीने ठरवा
१. मॅनेजर आणि कर्मचारी दोघांचंही ठरवलेल्या ध्येयावर एकमत असणं आवश्यक आहे.
२. आपली वर्तणूक नेहमी चांगली असावी.
३. प्रत्येक ध्येय २५० पेक्षा कमी शब्दांत एका कागदावर लिहून ठेवावं.
४. अधूनमधून ( अधेमधे) एक मिनिट थांबून आपल्या कामाची प्रगती तपासून घ्यावी.
५. तुमची वागणूक तुमच्या ध्येयाशी मिळतीजुळती आहे की नाही ह्याची खात्री करून घ्यावी.