Outliers (Marathi)

Outliers (Marathi)

परिचय

outlier कोण असतो? “Out of box” हे वाक्य ऐकल्यावर तुम्हाला काय वाटते? हो, अगदी बरोबर याचाही अर्थ तोच आहे. Outliers अशी व्यक्ती असते जी इतरांहून काहीतरी वेगळं करते. Outlier हा माणसांच्या गर्दीचा भाग नसतो. Outlier इतरांहून वेगळा, अद्वितीय असतो.

यशाचे शिखर गाठू शकणारा व्यक्ती म्हणजे outlier. Outlier हे geneius, athlit, rock star, business taifoon, जगातील बिलेनियर या मधलेच एक असतात. आता हे तर ऐकलं की, outlier नेमके असतात कोण, पण त्यांच्यात असं काय असत, ज्यामुळे ते एवढे successful बनतात. काय आहे यामागचे रहस्य?

आपल्यालाही तेच लोक आवडतात, जे successful आहेत. नाही का? एखादा व्यक्ती कसा गरिबीतून यशाचे शिखर गाठतो आणि श्रीमंत बनतो, अशा गोष्टी ऐकून आपण inspire होतो. हो ना?

त्यांची लाईफ स्टाईल कशी आहे, त्यांची personality कशी आहे, त्यांच्यात कोणतं विशेष असं टॅलेंट आहे का, वगैरे वगैरे.. असे अनेक प्रश्न आपल्या मनात येत असतात. हो ना? आपल्याला वाटते, त्यांच्यात काही विशेष असेल म्हणूनच ते successful आहेत. पण त्यांचे रहस्य दुसरेच आहे, जे आपल्याला सहजासहजी दिसत नाही.

या पुस्तकात आपल्याला sucsess च्या अशा काही गोष्टी कळणार आहेत, ज्या आपल्याला आपण नेमके कुठे चुकतो हे सांगतील.

आपले लेखक म्हणतात, sucsess ही एक personal गोष्ट आहे. जी लोकं सक्सेसफुल आहेत, त्यांनी जे काही मिळवलं ते एकट्याच्या हिमतीवर मिळवलं, अस आपल्याला वाटते. त्यांच्या यशामागे केवळ आणि केवळ त्यांचीच मेहनत आहे.

जर असं असेल, तर त्या व्यक्तीत असणारे केवळ एखादे टॅलेंट पुरेसे असेल, नाही का? मग अपब्रिंगिंग बद्दल काय?

त्या लोकांबद्दल काय, जे त्यांच्या success मागे आहेत? ज्या Society, culture मध्ये ते राहिले त्याबद्दल काय? या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला outliers ची समरी ऐकताना मिळणार आहे आणि नक्कीच आपण यातून मोलाची शिकवण घेऊन  success ला एका नवीन नजरेतून पाहायला लागू.

कैनेडीयन हॉकी

हॉकी कॅनडाचा लोकप्रिय खेळ आहे. आता एखद्या देशाचा एखादा खेळ लोकप्रिय आहे म्हणजे त्या देशात त्या खेळाबद्दल जनजागृती ही अगदी लहान मुलांपासून वयस्कर माणसांपर्यंत असते. असेच काही कॅनडामध्ये ही आहे. तेथील मुलं हा खेळ अगदी किंडरगारटेन पासूनच खेळतात.

तिथे प्रत्येक वर्षी school मध्ये हॉकी लीग होत असते. तिथे तुम्हाला एकाचढएक हॉकीचे खेळाडू मिळतील. मग प्रश्न येतो, कॅनडा national team मध्ये players चे selection कसे होते? आणि हे लक्षात घेण्यासारखे आहे की बहुतेक सर्वोत्तम हॉकी खेळाडू जानेवारी ते मार्च दरम्यान जन्मलेले असतात. मग हे कसे घडले?
त्याचे रहस्य हे आहे की हॉकी कोचिंग क्लासमध्ये वयाने मोठी असलेली मुलेचं निवडली जातात.

उदाहरणार्थ, जर मुलगा डिसेंबरमध्ये जन्माला आला असेल, तर त्याला team मध्ये निवडले जाणार नाही. मोठ्या वयाची मुले शारीरिकदृष्ट्या मजबूत असतात, म्हणून त्यांची निवड केली जाते. वयातील महिन्यांचे अंतर मुलाच्या शरीरात बराच फरक निर्माण करते. त्यानुसारच 9 ते 10 वर्षे वयोगटातील मुलांची निवड केली जाते. म्हणजे 9-10 Age ग्रुप साठी 10 वर्षांच्या मुलांची निवड केली जाते.

जे मुलं वयानी मोठी असतात त्यांना कोच स्वतः training देतात. त्यांना इतरांपेक्षा 3 पट जास्त practice करावी लागते. नॅशनल टीम मध्ये जाऊ पर्यंत ही मुल हॉकीत तरबेज बनतात. त्यानंतरच त्यांना मोठमोठ्या लिग्स मध्ये खेळण्यास पाठवले जाते.

हेच selection process दुसऱ्या खेळांसाठीही वापरली जाते.म्हणजेच जानेवारी ते मार्च मधील मुलांनाच वाव असतो. वर्षाच्या उत्तरार्धात जन्मलेल्या मुलांचे टॅलेंट बर्‍याचदा दुर्लक्षित केले जाते. लहान मुलांना बर्‍याचदा खेळामध्ये तितके Encourage मिळतं नाही जेवढं त्यांना मिळायला हवं.

परंतु जर त्यांना समान समर्थन व संधी मिळाली, तर त्यांचे कौशल्य देखील वाढविले जाऊ शकते. कदाचित त्यांपैकी एक यशस्वी अ‍ॅथलीट बनू शकेल. आधी जन्मलेले players physically जास्त fit असतात, म्हणून त्यांना successful होण्याची संधी दिली जाते व एका नंतर एक संधी त्यांना मिळत राहतात, म्हणूनच अशा selection process मुळे कॅनडाची टीम outliers बनली.

आपला समाज जे यशस्वी होतात त्यांना अधिक संधी देतो. त्यांच्यासाठी प्रत्येक दरवाजा उघडतो. ज्यामुळे त्यांचे status समाजात आणखीन वाढते आणि जी लोक अपयशी ठरतात त्यांना समाज आणखीन मागे ओढतो. असे का घडते?

कारण यशाकडे पाहण्याचा आपला दृष्टीकोन हाच आहे. आपण केवळ personal achievement ला सर्वकाही समजतो. त्यावेळी आपल्याला हे कळत नाही, आपण कोणाला संधी देत आहोत आणि कोणाची संधी हिरावून घेत आहोत. एखद्याच्या sucseful होण्यात याचाही खूप मोठा हात असतो.


10,000 तास

“जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीमध्ये तज्ज्ञ व्हाल, तेव्हा तुम्ही त्यास सराव करणे थांबवाल, कारण तुम्हाला यापुढे सराव करण्याची आवश्यकता वाटनार नाही”

1990 मध्ये बेर्लिनच्या Musium academy मध्ये psychologist चा एक अभ्यासगट स्टडी करण्यासाठी आला होता. ज्यामध्ये psychologist शोधत होते, यशासाठी practice आणि टॅलेंट हे कितपत महत्वाचे आहे.

वाईलेनिस्ट त्यांच्या टॅलेंट मुळेच इतके चांगले काम करतात का? की तो त्यांच्या practice चा परिणाम आहे? मानसशास्त्रज्ञांना असे आढळले की, विद्यार्थी जितका जास्त वेळ सराव करतात, तितकेच छान वायोलिन वाजवतात.

मुले जसजशी मोठी होत जातात, तसतसे ते practice ला जास्त वेळ देतात. वयाच्या वीसव्या वर्षापर्यंत ते सर्वोत्कृष्ट व्हायोलिन वादक होतात, कारण त्यांनी 10,000 तास practice आधीच केलेली असते.

पियानोवादकांवर हाच अभ्यास केला गेला, ज्यांना यात रस होता, त्यांनी आपल्या बालपणात फक्त 2,000 तासांचा सराव केला होता, परंतु प्रोफेशनल लोक प्रत्येक वर्षाला त्यांची practice वाढवतात  आणि 20 वर्षांची होईपर्यंत त्यांच्याकडे एकूण 10,000 तासांचा अनुभव असतो.

यातून मानसशास्त्रज्ञांना समजले की त्यांच्यात “नैसर्गिक” असे काही नाही. असा कोणताही संगीतकार नाही जो कमी सराव करूनही सर्वोत्कृष्ट संगीतकार झाला. कोणत्याही गोष्टीमध्ये जागतिक दर्जाचे होण्यासाठी, आपल्याला किमान 10,000 तासांचा सराव करावा लागेल.

इतर अभ्यासांमध्ये, ही जादूची संख्या सिद्ध झाली आहे. संगीतकारांपासून ते अ‍ॅथलीट्स, लेखक आणि गुन्हेगारी मास्टरमाइंडपर्यंत प्रत्येकाला शीर्षस्थानी पोहोचण्यासाठी 10,000 तासांच्या सरावाची आवश्यकता असते.

असे दिसत आहे की, कदाचित आपल्या मेंदूला कोणत्याही गोष्टीचा मास्टर होण्यासाठी 10,000 तासांची आवश्यकता आहे. परंतु सत्य हे आहे, प्रत्येकजण 10,000 तास घालवू शकत नाही.

आपण केवळ स्वत:हून ते साध्य करू शकता, हे शक्य नाही, कारण त्यासाठी लहान असताना आपले पेरेंट्स सपोर्टिव असले पाहिजेत मोठे झाल्यावर आपल्याकडे खूप मोकळा वेळही असावा.

परंतु जर आपण गरीब असाल आणि काम करणे ही आपली मजबूरी असेल, तर आपल्याला practice करण्यासाठी पुरेसा वेळ मिळणार नाही. अशा परिस्थितीत 10,000 तासांचा सराव करणे हे मोठ्या संधीपेक्षा कमी नाही.

बिल गेट्सचे उदाहरण घ्या. त्यांनी आठवीत असतानाच प्रोग्रॅमिंग सुरू केले.  ही त्यांच्यासाठी एक विशेष संधी होती, कारण ते 1960 चे दशक होते. त्यावेळी फक्त श्रीमंत लोकांकडे computer असायचा. बिल गेट्सचे वडील वकील होते आणि त्याची आई एका श्रीमंत कुटुंबातील होती.

त्यांनी बिल गेट्सला सिएटलमधील लेकसाइड या नामजलेल्या शाळेत टाकले, जी 1968 मधील computer क्लब असलेल्या काही शाळांपैकी एक होती. शाळेत, 8th standard ते हायस्कूल पर्यंत बिल गेट्सने सतत प्रोग्रामिंगचा सराव केला.

जेव्हा बिल गेट्स कॉलेज मधूून बाहेर पडले आणि मायक्रो-सॉफ्ट सुरू करण्याची तयारी करत होते, तेव्हा त्यांचा कॉम्प्युटर प्रोग्रामिंगमध्ये 10,000 हून अधिक तासांचा सराव झाला होता. ते एक अतिशय हुशार प्रोग्रामर आणि उद्योजक आहेत. बिल गेट्सना ती विशेष संधी मिळाली होती. याचा उल्लेख ते स्वतःच “मी खूप भाग्यवान होतो” असे म्हणून करतात.

Outlier होण्यासाठी आपल्यास विशेष संधीची आवश्यकता आहे. आपल्याला ती भाग्यवान संधी मिळायला हवी जेणेकरुन आपण स्वत:ला सिद्ध करु शकाल. जर तुमच्याकडेही एखादे अनोखे टॅलेंट असेल, तर तुम्हालाही त्या एका अनोख्या, मोल्यावान संधीची अत्यंत गरज आहे. विश्वास ठेवा ती तुम्हाला लवकरच मिळेल.

The Beatles

“वर पहा, अशा माणसाकडे पहा ज्याच्याकडे कधीही काहीही नव्हते, कुटूंब नाही किंवा डोक्यावर कुणाचा हात नव्हता, पण आज तो जे काही आहे, तो केवळ त्याच्याच हिंमतीवर आहे.”हे शब्द रॉबर्ट विंथ्रोप यांनी बेंजामिन फ्रँकलीनच्या पुतळ्यावरील पडदा उठवताना बोलले होते.

तर खरोखरच outliers अशीच असतात का? यशस्वी लोकांचे आत्मचरित्र आपल्याला वेड करून सोडते, कारण सुरुवातीस त्यांचे सर्वांचे जीवन अगदी साधे होते. परंतु या सर्वांनी सर्व अडचणींचा सामना करून यश संपादन केले आहे.

कारण त्या सर्वांमध्ये काहीना काही विशेष टॅलेंट होते. त्यांच्या यशामागील जी गोष्ट आपण पाहत नाही ती म्हणजे opportunity. “बेन्जामिन फ्रँकलिन” ला अनेक संधी मिळाल्या आणि त्यांनी त्याचा फायदही करून घेतला.

Outliers च्या यशामागे त्यांचे parents आणि त्यांची community देखील आहे. एक प्रकारे ते त्यांच्या संस्कृतीबद्दल आणि त्यांच्या पूर्वजांच्या वारसाबद्दल कृतज्ञ असतात. एखादी व्यक्ती कशी यशस्वी होते हे आपल्याला जाणून घ्यायचे असेल, तर फक्त त्याचे गुण जाणून घेणे पुरेसे नाही. तो माणूस कधी आणि कोठे जन्मला आणि कसा मोठा झाला हे देखील आपल्याला माहित असले पाहिजे.

आता Beatles band ला घ्या, लोकप्रिय होण्यापूर्वी त्यांना जर्मनीच्या हेमबर्गमध्ये विशेष संधी मिळाली, ही 1960 ची गोष्ट आहे. त्यावेळी बीटल्स हा फक्त हायस्कूलचा band असायचा.

हॅम्बुर्गमध्ये त्या काळी पुष्कळसे स्ट्रिप्स क्लब होते. अशा परिस्थितीत अधिकाधिक ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी रॉक band ला मोठी मागणी होती. तेथे ब्रूनो नावाचा एक क्लब असायचा, जिथे इंग्लंडच्या लिव्हरपूल येथून bands ला बरीच मागणी होती. बेंड क्लबमध्ये तासनतास वाजत रहावा, अशी क्लब मालक फिलिप नॉर्मनची इच्छा होती.

जॉन लेनन यांनी हेमबर्गमधील आपल्या अनुभवाबद्दल सांगितले, “आमचा performance आणखीन उत्तम होत होता आणि आमचा आत्मविश्वासही वाढत होता. आम्ही बेस्ट देण्याचा मनापासून प्रयत्न केला… मनापासून.” दररोज रात्री, बीटल्स हॅमबर्गच्या क्लबमध्ये आठ तास वाजत असे.

या प्रॅक्टिसमुळे त्यांचा स्टॅमिना, डिस्पलिन वाढू लागली होती. लिव्हरपूलमध्ये, ते एकच गाणे एक तासासाठी वाजवत होते. परंतु हॅम्बुर्गमध्ये त्यांना त्याचे डिफरेंट वर्जन वाजवावे लागे. आठ तास कव्हर करण्यासाठी ते रॉक आणि झांज देखील वाजवू लागले होते. 18 महिन्यांत बीटल्सने हॅम्बुर्गमध्ये 270 night perfornance दिले होते.

1964 मध्ये ते लोकप्रिय होईपर्यंत त्यांनी 1200 हून अधिक लाइव्ह performance दिले होते. त्यांचा सराव इतरांपेक्षा अधिक होता. हेच त्यांना बाकीच्या रॉक आणि रोल बँडपेक्षा वेगळे करत होते. बीटल्सला हॅम्बुर्गमध्ये विशेष संधी मिळाल्या आणि त्यांना जर्मनी, हॅम्बुर्गच्या कल्चर आणि कम्युनिटीचाही फायदा झाला.

फिलिप नॉर्मन म्हणाले, “जेव्हा ते तिथे होते तेव्हा ते फारसे चांगले नव्हते, परंतु जेव्हा ते तेथून परत आले तेव्हा सर्वोत्कृष्ट, सर्वात भिन्न, कोणीही त्यांच्यासारखे नव्हते.”

SHARE
Subscribe
Notify of
Or
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments