My life in advertising (Marathi)

My life in advertising (Marathi)

परिचय

तुम्हाला इफेक्टिव एडव्हरटाईजिंगचे सीक्रेट्स जाणून घ्यायचे आहेत का? क्लोड होपकिंसन यांनी त्यांच्या 35 वर्षांच्या ऍडवरटाईजिंग करियरमध्ये कशी प्रगती केली, हे जाणून घ्यायचे आहे का? जर तुमचे उत्तर होय असेल तर मग ही समरी शेवट पर्यंत एका!

मित्रांनो, आपले लेखक क्लोड होपकिंसन हे एक फेमस आणि श्रीमंत ऍड राइटर आहेत. पण हे यश  त्यांना एका रात्रीत मिळाले नव्हते. माई लाइफ इन ऍडवरटाईजिंग या पुस्तकात क्लोड यांनी स्वतः त्यांची सक्सेस स्टोरी लिहिली आहे.

लेखक सांगतात की जेव्हां ते 9 वर्षांचे होते तेव्हा पासूनच त्यांनी काम करायला सुरूवात केली, त्या वयातच ते सेलिंग आणि ऍडवरटाईजिंगचे काही धडे शिकले आणि आज आम्ही तुम्हाला त्यांच्या  Success चे सिक्रेट या समरी व्दारे सांगणार आहोत.

या समरी मध्ये तुम्हाला अशा काही टेक्निक्स आणि स्ट्रटेजीज मिळतील ज्यांचा वापर करून तुम्ही तुमचा एक मॉस्ट इफेक्टिव्ह ऍडवरटाईजिंग कंपेन बनवू शकता. पामोलिव, क्वेकर ओट्स आणि पेप्सोडेंट आपल्या इंडस्ट्रीजमध्ये एक मोठे ब्रँड्ज बनले आहेत.

या ब्रँडना फेमस बनवण्यामध्ये क्लोड होपकिंसचे मोठे हार्ड वर्क आहे. तर त्यांनी कशाप्रकारे या तीन प्रॉडक्ट्सना मार्केटमध्ये मोठा ब्रँड बनवले आणि त्यांच्या काय Strategies होत्या या तुम्हाला येथे पहायला मिळतील.

TO READ OR LISTEN COMPLETE BOOK CLICK HERE

अर्ली इन्फ्लुयेंश

मी माझ्या पालकांकडून दोन महत्त्वाच्या गोष्टी शिकल्या, ज्याची मला माझ्या एडवर्टाईजिंग करियरमध्ये मदत झाली. माझ्या आईकडून मी आपल्या कामावर कसे प्रेम करायचे हे शिकलो आणि बाबांकडून मला लोकं कशी असतात हे समजले. मी १० वर्षांचा असताना माझे बाबा मला सोडून गेले, तेव्हापासून माझी आई संपूर्ण कुटुंब सांभाळत आहे.

ती खूपच हार्डवर्किंग होती, ती मोकळी बसलेली आहे किंवा मनसोक्त आराम करत आहे, असा एकही क्षण मला आठवत नाही. तिने  डिग्री मिळवली होती. सकाळी ती लहान मुलांना शिकवत असे. पूर्ण घर स्वच्छ करून ती शाळेत जायची. जेव्हा परत यायची तेव्हा पुन्हा घरातील काम करायला सुरूवात करायची.

रात्री ती किंडरगार्टनर साठी पुस्तकं लिहायची. परत जेव्हा सुट्टी असेल तेव्हा ती पुस्तकं सायकलीत ठेवून प्रत्येक शाळेत पोहचवायची. माझी आई एकाचवेळी आई, शिक्षिका, लेखिका, प्रकाशक आणि सेल्सपर्सन बनली.

मी सुध्दा तिच्याच पाऊलांवर पाऊल टाकले. मी सुध्दा 9 वर्षांचा असतानाच काम करायला सुरूवात केली. माझ्या शाळेत जाण्यापूर्वी मला दोन शाळा उघडाव्या लागत, शाळेनंतर मी डेस्कची, फ्लोर्स ची सफाई करायचो आणि रात्री जवळजवळ 65 जणांच्या घरी जाऊन 'डेटरोयेट इनविंग न्यूज' डिलीवर करायचो.

प्रत्येक शनिवारी 2 शाळा स्वच्छं करणे आणि घरोघरी बिल्स डिलीवर करणे हे माझे काम होते. रविवारी मी आमच्या कम्यूनिटीच्या चर्चमध्ये जेनिटरचेही काम करायचो. तसचं तिथं मी पहाटेपासून ते रात्री 10 पर्यंत स्वच्छतेचं काम करायचो. शाळेला सुट्ट्या असताना मी एक शेतकरी मुलगा बनून जायचो. मला हार्ड वर्क करण्याची सवयच होऊन गेली होती.

आणि याच गुणांसोबत मी बिझनेस फील्डमध्ये उतरलो. प्रत्येक तास माझ्यासाठी कामाचा तास असायचा. मी रात्री 2 वाजेपर्यंत काम करायचो. मध्यरात्री घरी आल्यावरच मी आराम करत असे. संडे तर माझा फेवरेट दिवस असायचा कारण तेव्हा मी कोणत्या व्यत्ययाशिवाय काम करू शकत होतो. माझे आजोबा चर्च मिनिस्टर होते.

त्यांचे कित्येक पूर्वज सुध्दा चर्च मिनिस्टरच होते. पण सगळेजण गरीबीतच जगले. मी पण त्याच गरीबीमध्ये जन्मलो आणि मोठा झालो. पण या गोष्टीला एक आशिर्वादच समजून जगलो कारण मी कॉमन लोकांसोबत राहायचो, त्यांना चांगल्या प्रकारे ओळखायचो. मला त्यांच्या इच्छा, त्यांचे स्ट्रगल, त्यांच्या गरजा माहित होत्या.

मला माहित होतं की त्यांच्यासाठी काय महत्त्वाचे आहे. हीच गोष्ट माझ्यासाठी ऍडवरटाईजिंगमध्ये  फायद्याची ठरली. कस्टमर्सपैकी 95% लोकं ही कॉमन लोकं असतात. त्यामुळे त्यांची मेजोरिटी आहे. मी जेवढ्या जाहिराती बनवल्या, त्यात मला माहित होते की कशाप्रकारे आपण कॉमन लोकांना अट्रॅक्ट करू शकतो कारण मी सुध्दा त्या लोकांपैकीच एक होतो.

जर रोल्स रॉयलवाल्यांनी मला त्यांच्या कारच्या जाहिरातीसाठी हायर केले असते, तर कदाचित मी एवढा सक्सेसफुल झालो नसतो. कारण मी जास्त श्रीमंत लोकांना ओळखत नव्हतोप, कारण मला सुखसुविधा, ऐशोराम कधी मिळालाच नाही. मी स्वतःला कामगार लोकांच्या फार जवळचा समजतो.

मला गृहिणींचा  संघर्ष माहित आहे, ज्यांना थोड्याच बजेटमध्ये पूर्ण महिना घालवायचा असतो. मला त्या मुला-मुलींचा संघर्ष चांगलाच माहित आहे ज्यांना हार्ड वर्क केल्याशिवाय पुढील यश मिळत नाही. जर तुम्ही मला काही प्रॉडक्ट्स दिले, तर त्याचा चांगला रिझल्ट आणण्यासाठी कशाप्रकारे चांगली जाहिरात करायची हे मला माहित आहे.

मी साधे शब्द वापरतो. मी लिहिलेली वाक्ये पण लहान असतात. स्कॉलर्स आणि श्रीमंत लोकं माझ्यावर हसतील, पण सामान्य लोकांना माझे म्हणणे पटेल. मला हे माहित आहे की, माझ्या जाहिराती वाचताना ते माझ्याशी आणि माझ्या प्रॉडक्टशी एक कनेक्शन फील करत असतील.

TO READ OR LISTEN COMPLETE BOOK CLICK HERE

लेसंस इन ऍडवरटाईजिंग एंड सेलिंग
ऍडवरटाइजिंग आणि सेलिंगमधून मला मिळालेले धडे

मी एक छोट्या शहरात राहणारा तरूण मुलगा होतो, जिथे मी एडवर्टाईजिंग आणि सेलिंगचे पहिले धडे शिकले. मी पाहिले की फ्री सॅम्पल्स प्रोवाइड करून तुम्ही तुमची ऍडवरटाईजिंग अधिक इफेक्टिव बनवू शकता.  एके दिवशी माझ्या आईने होममेड सिल्वर पॉलिश तयार केले.

मी प्रत्येक केकला लहान केकच्या आकाराचा शेप देऊन एका चांगल्या पेपरमध्ये पॅक केले. त्यानंतर मी माझ्या सायकलीवरून ते घरोघरी ते विकण्याचा प्रयत्न केला, १० पैकी फक्त एकच केक विकला गेला. पण जेव्हा मला ते सिल्वर पॉलिश वापरण्याची संधी मिळाली तेव्हा मात्र 10 च्या 10 डब्बे विकले गेले.

तेव्हा मला समजले की, जेव्हा तुम्ही लोकांना फ्री सॅम्पल देता तेव्हा तुमचे प्रॉडक्ट 10 पट जास्त विकले जाते. पण बाकीच्या एडवर्टायजर्सना ही आयडिया पटत नाही. जे त्यांच्या प्रॉस्पेस्ट्स म्हणजेच फ्यूचर कस्टमर्सना कोणतेही सॅम्पल ट्रायल प्रॉडक्ट देत नाहीत.

भलेही त्यांना मोठ्या मोठ्या जाहिरातींमध्ये पैसे खर्च करावे लागले तरी ते करतील. काही बिझनेसेसना वाटते की, फ्री सॅम्पल्स त्यांना खर्चिक पडतील आणि काहीजणांना वाटते की, लोकं आणखीनच फ्री ट्रायल्स मागतील. पण मी मात्रं माझ्या सिल्वर पॉलिशवाल्या प्रयोगातून काहीतरी नविन शिकलो.

खरेतर, मी बहुतेक न्यूजपेपर्स आणि मॅगझिन्समध्ये कूपन्स देऊनच एक नॉन एडवर्टाइजर बनलो आहे. सॅम्पलिंग एक सिंपल पण जास्त इफेक्टिव स्ट्रेटेजी आहे. लोकांना फ्रीमध्ये तुमचे प्रॉडक्ट्स ट्राय करायला आवडते.

आणि जर त्यांना तुमचे प्रॉडक्ट सॅम्पल आवडले तर ते पुन्हा पैसे देऊन ते प्रॉडक्ट विकत घेतील.  मी आणखी एक धडा बुक्स सेलिंगमधून शिकलो. एलेन पिंकरटन एक सक्सेसफुल डिटेक्टिव आहेत. जे माझ्यासाठी हिरो आणि आयडॉल होते. त्यांनी त्यांची बायोग्राफी लिहिली आहे.

मी माझ्या आईला त्या बुकमध्ये इन्वेस्ट करायला सांगितले कारण मला ते पुस्तक खूप आवडले होते आणि मला वाटले की दुसऱ्यांनाही ते पुस्तक आवडेल. जेव्हा ती पुस्तकं आमच्या घरी डिलिवर झाली तेव्हा मी ती जमिनीवर पसरवून ठेवली. मला ती पुस्तकं विकायची होती.

दुसऱ्या दिवशी मी सकाळीच आमच्या मेयर ला भेटायला गेलो. त्यांनी त्यांच्या घरी माझे स्वागत केले. ते नेहमी माझ्यासारख्या हार्ड-वर्किंग तरूण मुलामुलींची मदत करण्यासाठी पुढे यायचे. मी खूपच उत्साही होतो पण जेव्हा मी त्यांना पुस्तक प्रेजेंट केले, तेव्हा त्यांनी सहजपणे ते पुस्तक घेण्यास नकार दिला.

मेयर म्हणाले  “तुझे माझ्या घरामध्ये स्वागत आहे, पण तुझ्या पुस्तकांचे नाही…या एलेन पिंकरटोनला सपोर्ट करणे माझ्या आइडियल्ससाठी लज्जास्पद गोष्ट असेल. डिटेक्टिवला समाजात मान-सन्मान मिळत नाहीत, कारण पिंकरटोन सारखी लोकं गुन्हेगारांसोबत काम करतात.

त्यांचं हे बोलणं माझ्यासाठी वेक अप कॉल सारखं होतं. एखादं प्रॉडक्ट तुम्हाला आवडलं म्हणून ते दुसऱ्यांनाही आवडेल असं नाही. मी खूप बोर्ड ऑफ डायरेक्टर्सना ट्रायल्स लाँच करण्याचे सुचवले जेणेकरून लोकांची मतं समजतील. पण त्या लोकांना नेहमी असंच वाटायचं की दुनिया त्यांच्या म्हणण्यानुसार चालते.

पण खरी गोष्टं तर ही आहे की, जोपर्यंत तुम्ही रियल फ्यूचर्स कस्मटर्सना भेटत नाही तोपर्यंत तुम्हाला त्यांच्या आवडी-निवडी समजत नाहीत. तुमच्या इच्छा आणि गरजा सर्वांना नाही पण काही लोकांना अपीलींग वाटू शकतात. ऍडवरटाईजिंग 100% लोकांच्या मतांवर डिपेंड असते. जी लोकं तुमचे प्रॉडक्ट्स खरेदी करतात, ती कॉमन लोकं असतात, त्यामुळे तुम्ही त्यांचे म्हणणे ऐकायला हवे.

माई स्टार्ट इन बिजनेस
बिझनेसमधील माझी सुरूवात

सुरूवातील मी एक फार्म बॉयचं काम केलं, त्यानंतर कित्येक विचित्रं कामेही केली आहेत. मला तेव्हा  $4.50 पगार मिळायचा. पगार मिळाला की, मला  सक्सेस मिळाल्या सारखं वाटे. मी रस्त्यालगतच्या गवाताच्या पेंढ्यावर झोपायचो.

मी एका कंपनीसाठी लहान-सहान कामं करायचो, त्यानंतर मी एक अपार्टमेंट भाड्याने घेतली ज्यामध्ये जवळजवळ काहीच जागा नव्हती. त्यामध्ये एक छोटासा बेड टाकून मी त्यावर एकटा झोपी जायचो. पण ही माझ्यासाठी एक मोठी इम्प्रुवमेंट ( एक प्रकारची investment hoti ) होती, ज्यासाठी मी वरच्याचे आभार मानतो.

हायस्कुल नंतर मी माझ्या आईपासून वेगळा राहायला लागलो. मी चर्च मिनिस्टर बनेल असा मी नेहमी विचार करायचो, कारण लहान असताना मला बायबल वाचायला खूप आवडायचे. पण लवकरच वास्तविकता माझ्या समोर आली.

Minister's आम्हाला सांगायचे की, डान्सिंग, प्लेइंग कार्ड्स आणि थिएटरमध्ये जाणं हे सगळं राक्षसांचे काम आहे, जे आपण नाही करायला हवं. त्यांचं बोलणं ऐकून असं वाटायचं की एन्जॉयमेंट ही वाईट गोष्ट आहे. म्हणून मी मिनिस्टर होण्याचा विचार सोडून दिला. अगदी मी माझे घर ही सोडले.

त्यादिवशी माझ्या पाकीटात फक्त $3 होते. मला माझ्या एका काकांची आठवण आली, ज्यांची स्प्रिंग लेकमध्ये एक फळ शेती होती. तेव्हा कापणीचा हंगाम सुरू होता. मी विचार केला की मी त्यांच्याकडे जाऊन त्यांना फळ काढणीच्या कामात मदत करेल. काकांनी मला $1.25  चा रोज दिला.

मी रोज शेतात 16 तास काम करायचो. माझी $100  ची सेविंग्स झाली. पण माझ्या कॉलेजच्या फीसाठी हे पैसे पुरणार नव्हते. माझं नशिब चांगलं होतं की माझ्या आजोबांनी मला एवढे कष्ट करताना पाहिले आणि त्यांना माझी दया आली.

त्यांनी मला आणखीन $100  दिले, ज्याची मला गरज होती. मी ६ महिन्यांच्या बुककिपींग कोर्ससाठी ###स्वेंसबर्कच्या बिझनेस कॉलेजमध्ये एडमिशन घेतले. तसे तर ते काही मोठे शिक्षण नव्हते पण त्यातून मला एक संधी मिळाली. एक दिवस 'प्रोफेसर स्वेंसबर्ग' एक लेटर घेऊन आमच्याकडे आले. ग्रँड रॅपिड्स फेल्ट बूट कंपनीमध्ये एक बुककीपिंगची पोस्ट वॅकेंट होती.

आणि पगार हा, दर आठवडा- $4.50  इतका होता. नंतर मला तो जॉब मिळाला होता. तिथं मला थोडी बुककीपिंग करावी लागायची आणि खरेतर फरशी पुसणे, खिडक्या पुसणे यासारखी कामंही करावी लागायची. तरी मी पूर्ण मेहतनीने ते काम करत होतो, कारण मला कमी पैशात माझ्या राहण्याचा आणि खाण्या-पिण्याचा बंदोबस्त करावा लागे.

त्यावेळी तर खूप वेळा मला माझे जेवण स्कीप करावा लागेल होते.
फेल्ट बूट कंपनीत काम करत असताना माझी मिस्टर. एम्. आर बिस्सेलशी ओळख झाली. जे बिस्सेल कार्पेट स्वीपर कंपनीचे ओनर होते. त्यांनीच मला माझ्या ऍडवरटाईजिंग करियरसाठी मार्ग दाखवला होता.

एक दिवस मी मिस्टर बिस्सेलसोबत चाललो होतो, त्यांना मी माझ्या weekly  $4.50  बजेट आणि स्किप मील्सबद्दल सांगितलं. आणि माझं 'पाई' खाण्याचं स्वप्नंही मी त्यांच्यासोबत शेअर केलं. त्यांनाही पाई आवडत होती. त्यांनी त्यांच्या घरी मला पाई खाण्यासाठी आमंत्रित केले. तसेच त्यांनी माझा weekly $6 पगार सुध्दा मॅनेज केला. आता मी देखील त्यांना डिनरमध्ये पाई ऑफर करू शकत होतो.

TO READ OR LISTEN COMPLETE BOOK CLICK HERE

SHARE
Subscribe
Notify of
Or
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments