(Hindi) Vivekananda: A Biography
परिचय (Introduction)
तुम्ही देवाला पाहिलं आहे का? असेच प्रश्न स्वामी विवेकानंद, लहान असताना विचारत होते. त्यांनी जीवनातल्या प्रत्येक सुख-सुविधा देणाऱ्या गोष्टी सोडून दिल्या होत्या. फक्त एक काठी आणि कटोरी सोबत त्यांनी पूर्ण भारत देशाचा प्रवास केला. ते देवाला पाहू इच्छित होते आणि लवकरच ते त्यात यशस्वीही झाले.
या पुस्तकाच्या sumaary मधून तुम्ही स्वामी विवेकानंदांच्या आयुष्याबद्दल ऐकणार आहात. ते जेव्हा लहान होते तेव्हा कसे होते? ते कसे एवढे महान व्यक्तीमत्व बनले? त्यांच्यामध्ये असं काय होतं की अमेरिकामध्ये त्यांना सर्वजण एवढं पसंत करत होते? काय आहे त्यांची गोष्ट, त्यांचे ध्येय आणि का त्यांना आजही आठवल जात? या पुस्तकाच्या summary मधून तुम्ही हे सर्व आणि यावरून ही जास्त, खूप काही जाणाल.
देवाला पाहण्याच्या आणि पडणाऱ्या प्रश्नाची उत्तरे शोधण्याच्या या प्रवासात स्वामी विवेकानंदांनी नेहमी स्वतःला एकटे, भुकेलेले, कोणत्या ना कोणत्या विचारांमध्ये पडलेले पाहिले. “त्यांना जे हव आहे त्यांना नक्कीच मिळेल” हा विश्वास त्यांच्याकडे होता.
त्यांना त्यांच्या जीवनाच अंतिम ध्येय माहीत होत. त्यांना स्पष्ट माहित होते की त्यांना काय हवं आहे आणि लवकरच त्यांनी ते मिळवलं ही. स्वामी विवेकानंदांन नेहमी चांगलच काम करत, म्हणूनच त्यांच्याकडे चांगल्या गोष्टी स्वतःहून आकर्षित होत होत्या.
TO READ OR LISTEN COMPLETE BOOK CLICK HERE
आधीचे वर्ष (Early Years)
स्वामी विवेकानंद यांचा जन्म १२ जानेवारी १८६३ ला मकर संक्रांतीच्या दिवशी झाला होता. त्या दिवशी गंगा नदीच्या किनारी खूप लोकं पूजा करण्यासाठी आली होती. स्वामीच्या घरी त्यांच्या पूजा करण्याचा आणि आरतीचा आवाज येत होता.
त्यांच्या आईचा देवावर खूप विश्वास होता. त्या नेहमी पूजापाठ करत असे. एक अस मुल त्यांना हवं होत जे त्यांच्या घराचं नाव मोठ करेल. एके दिवशी त्यांच्या आई भुवनेश्वरीदेवी ने स्वप्न पाहिले. त्या स्वप्नात त्यांनी शंकर भगवानला पाहिले.
त्यांनी पाहिल की भगवान त्यांना म्हणत आहेत की, ते त्यांच्या मुलाच्या रूपांमध्ये जन्म घेतील. हे ऐकून त्या खूप खूश झाल्या. त्यांच्या डोळ्यांमधून आनंदाचे अश्रू वाहू लागले.
भुनेश्वरी देवी आपल्या मुलाचे नाव विरेश्वर (vireshwar) जे कि भगवान शंकराचे दुसरे नाव आहे ते ठेवू इच्छित होत्या. पण त्यांच्या घरातील इतर सदस्यांनी स्वामीचे नाव नरेंद्रनाथ ठेवले. त्यांना सर्वजण प्रेमाने नरेन म्हणून बोलवू लागले.
कोणाला माहीत होत की नरेन मोठे होऊन “स्वामी विवेकानंद” बनतील, ज्यांचा सर्वजण एवढा आदर करतील. हिंदू धर्मासाठी त्यांचे प्रेम लहानपणापासूनच स्पष्ट दिसून येत होते. त्यांचा जन्म कलकत्ता येथे दत्ता परिवार मध्ये झाला होता. त्यांच्या घरामध्ये सर्व जण खूप हुशार, शिक्षित आणि नेहमी दुसऱ्यांची मदत करणारे होते. त्यामुळे त्यांचे खूप नाव झाले होते.
नरेन चे वडील कलकत्ता उच्च न्यायालयात वकील होते. नरेन त्यांच्या वडिलांपेक्षा त्यांच्या आजोबां सारखे होते. त्यांच्या वडिलांना सर्व सुख सुविधा आवडत होत्या. पण, नरेन ला साधू प्रमाणे साधी राहणी आवडत होती.
त्यांच्या जीवनाची पहिली गुरु त्यांची आई होती ज्यांनी नरेनला अल्फाबेट आणि काही इंग्लिश शब्द शिकवले होते. त्या नरेन ला रामायण आणि महाभारत च्या गोष्टीही सांगत होत्या. छोट्या नरेला रामाची गोष्ट खूप आवडे. त्यांना राम एखाद्या हिरो सारखे वाटत, कारण रामाने आपल्या पत्नी सीताला वाचवण्यासाठी युद्ध देखील केलते.
नरेन सर्व मुलांपेक्षा वेगळे होते, म्हणूनच कदाचित त्यांना स्वप्न देखील वेगळेच पडत. त्यांना वाटायचे प्रत्येक मुलाला अशी स्वप्ने पडतात आणि ही कोणती मोठी गोष्ट नाही. एकदा त्यांना स्वप्नामध्ये एक चमकणारा बॉल दिसला, ज्यातून डोळे दिपवणारा प्रखर प्रकाश बाहेर येत होता.
त्या प्रकाशाचा रंग बदलत होता. तो बॉल हळू हळू मोठा होत गेला आणि एका क्षणाला फुटला. आणि त्यातून निघणारा प्रकाश त्यांच्यावर पडायला लागला व त्याने नरेनला पूर्णपणे घेरून घेतले.
लहान वयातच ते लोकांना वेगवेगळ्या धर्मात (जसे की हिंदू-मुस्लीम किंवा गरीब-श्रीमंत )
यात भेदभाव करण्यासाठी प्रश्न विचारत. एक दिवस त्यांनी त्यांच्या वडिलांच्या ऑफिस मध्ये टोबॅको पाइप चा एक बॉक्स पाहिला.
तो त्यांच्या वडिलांच्या क्लाइंट साठी होता. वेगवेगळ्या हिंदू जाती करिता तेथे एक बॉक्स होता आणि मुस्लिमांसाठी वेगळा बॉक्स ठेवला होता. नरेन ने प्रत्येक बॉक्स ट्राय केले. त्यांच्या वडिलांनी जेव्हा हे पाहिले तेव्हा ते नरेनला रागवले. नरेन म्हणाले “मला तर त्यामध्ये कोणताही फरक जाणवला नाही”
नरेन ला नेहमी प्रत्येक गोष्ट जाणण्याची इच्छा होती. एकदा त्यांनी त्यांच्या वडिलांना विचारले “तुम्ही माझ्यासाठी काय केले आहे?” त्यांचे वडील खूप समजदार होते. त्यांनी नरेनला आरशामध्ये स्वतःला पाहण्यासाठी सांगितले आणि म्हणाले “स्वतःला या आरशामध्ये पाहशील तर तुला समजेल मी तुझ्या साठी काय केले आहे”.
त्यांनी वडिलांना एकेदिवशी पुन्हा विचारले “मला माझ्या कोणत्या प्रतिमेला या जगासमोर ठेवायला हवे?” त्यांच्या वडिलांनी सांगितले बाळा, “कधी कोणत्या गोष्टीला पाहून आश्चर्यचकित होऊ नकोस”.
त्यांना अस म्हणायचं होत की कोणतीही चकाकणारी गोष्ट पाहिल्यावर मोहित होवू नकोस, आणि कोणतीही मूल्य नसलेली गोष्ट किंवा कमकुवत व्यक्तीस वाहून तिचा तिरस्कार करू नकोस किंवा कोणालाही दुःखी करू नकोस.
म्हणूनच जेव्हा नरेन एक भिक्षुक म्हणून कोणत्या राजाच्या महालामध्ये जात किंवा कोणत्या गरीबाच्या घरी ते सर्वांसोबत एकसारखाच व्यवहार करत, त्यांना गरीब किंवा श्रीमंतात वावरताना कोणताही फरक पडत नसे.
TO READ OR LISTEN COMPLETE BOOK CLICK HERE
रामकृष्णानंच्या चरणी (At the Feet of Ramakrishna)
नरेन जेव्हा लहान होते, तेव्हा त्यांना दोन वेगवेगळे स्वप्न पडले. पहिले, एक खूप शिक्षित माणूस आहे ज्याच्याकडे खूप पैसा आहे आणि समाजामध्ये ज्याचं नाव खूप मोठ आहे. ज्याच्याकडे एक सुंदर घर, पत्नी आणि गोंडस मुलं आहेत.
दुसर, एक भिक्षुक आहे जो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी फिरत असतो. ज्याला साध राहायला आवडते. पैसा आणि दुसऱ्या सुख-सुविधा देणाऱ्या गोष्टीं ज्याला आनंद देत नाही. ज्याची फक्त एकच इच्छा आहे की त्याने देवाला ओळखावे. आणि देवाच्या च्या आणखीन जवळ जावे.
नरेन ओळखून होते की ते यातील काहीही बनू शकतील. त्यांनी खूप विचार केला, त्यांना याची जाणीव झाली की ते एक भिक्षुक प्रमाणे जीवन जगू इच्छित आहेत. जगात कोणते नवीन शोध लागत आहेत यात त्यांना कोणतीही रुची नव्हती.
त्यांच्याकडे एक स्पष्ट ध्येय होते की, त्यांना देवाला पाहायचे आहे. त्यांची इच्छा होती की, त्यांना अशा एका व्यक्तीने मार्ग दाखवावा ज्यांनी हा अनुभव घेतला आहे.
आपल्या याच शोधात ते ब्राह्मण समाजाशी जोडले गेले. एक दिवस त्यांनी त्या ग्रुपच्या लीडर देवेन्द्रनाथ यांना विचारले “गुरु तुम्ही देवाला पाहिल आहे का?” त्यांचा प्रश्न ऐकून देवेन्द्रनाथ खूप आश्चर्यचकित झाले. त्यांनी नरेंद्र चे मन शांत करण्यासाठी त्याला सांगितले “बाळा तू एक साधू प्रमाणे आहेत, तुला ध्यान करायला हव”.
त्यांचे उत्तर ऐकून नरेन उदास झाले, त्यांना वाटले जसे गुरू त्यांना हवे आहेत तसे ते नाहीत. त्यांनी खूप लोकांना विचारले, खूप शोध घेतला परंतु त्यांना जे हव होत ते मिळाले नाही. मग त्यांनी श्री रामकृष्ण परमहंस बद्दल ऐकले, जे एवढ्या एकाग्रतेने ध्यान करत की त्यांनी साक्षात देवाचा अनुभव घेतला होता.
नरेन श्री रामकृष्ण यांना दक्षिणेश्वर मंदिर येथे भेटले. नरेन ला भेटून श्री रामकृष्ण प्रभावित झाले. नरेन पूर्ण मनापासून भजन करत होते. रामकृष्ण यांनी ओळखले की नरेन बाकी मुलांपेक्षा वेगळा आहे.
असं वाटत होतं की नरेन चे डोळे नेहमी ध्यानामध्ये गुंग असतात. ते त्यांचे कपडे किंवा ते कसे दिसत आहेत यांवर बिलकुल लक्ष देत नसत. रामकृष्ण खूप आनंदी होते कारण त्यांना एक असा शिष्य मिळाला ज्याच्या सोबत ते त्यांच्या विचारांची देवाणघेवाण करू शकत होते.
राम कृष्णा सोडून इतर कोणत्याही गुरुने ठामपणे सांगितल नव्हत की त्यांनी देवाला ला खरोखर पाहिल आहे. आता नरेन ला पूर्ण विश्वास बसला होता की, ज्यांचा ते शोध घेत होते ते त्यांना भेटले आहेत.
एक दिवस त्यांनी विचारले “गुरु तुम्ही देवाला ला पाहिल आहे का?” गुरूंनी सांगितले “हो मी देवाला पाहिल आहे. जसा मी तुला पाहू शकत आहेे तसंच मी देवाला ही पाहू शकतो. देवाला पाहिल जाऊ शकत, त्याचाशी गप्पा ही केल्या जाऊ शकतात.
लोक आपल्या कुटुंब, पैसा, प्रॉपर्टी साठी रडतात. पण देवाला एगदा पाहण्याची इच्छा कोणातच नसते. कोणाच्याही डोळ्यात त्याला पाहण्यासाठी अश्रू येत नाहीत. जर कोणी मनापासून देवाला पाहू इच्छित आहे तरच तो देवाला पाहू शकतो”. हे ऐकून नरेन च्या मनाला शांती मिळाली.
TO READ OR LISTEN COMPLETE BOOK CLICK HERE
ट्रेनिंग ऑफ़ द डिसाईपल (Training of the Disciple)
रामकृष्णांच्या मृत्यू नंतर सर्व भिक्षुक जणू अनाथ झाले. नरेन २३ वर्षांचे झाले होते. नवीन भिक्षुकांची काळजी घेणे आणि त्यांना शिकवणे ही आता नरेन ची जबाबदारी होती. रामकृष्णांच्या एका फॉलोवर ने सर्वांना एक घर रेंट वर देण्याची ऑफर दिली.
येथूनच बारानगर मठा ची सुरुवात झाली. नरेन ने पूर्ण मनाने नवीन शिष्यांना शिकवण्यास सुरुवात केली. घरात सर्वात मोठे असल्याने ते दिवसभर आपल्या कुटुंबाप्रती त्यांची जबाबदारी पूर्ण करत आणि रात्री मठामध्ये आपल्या शिष्यांना शिकवायला जात.
बारा नगर मध्ये रामकृष्णांचे शिष्य एक दुसऱ्यासोबत मिसळून गेले होते. ते सर्वजण खूप प्रेमाने राहत. रामकृष्णांनी शिकवलेल्या शिकवणीने त्या सर्वांना एका धाग्यात, मोत्या प्रमाणे जोडून ठेवले होते.
सर्व शिष्यांनी साधे जीवन पूर्णपणे स्वीकारले होते. ते सर्वजण त्यांचा पूर्ण दिवस पूजा, अभ्यास, ध्यान आणि भजन गाण्यांमध्ये घालवत. या सर्वांमध्ये ते इतके रमत की, कधीकधी जेवण करण देखील विसरून जात. हे सर्व करण त्यांना एवढ आवडे की, त्यांना जेवणाचे ही विस्मरण होत होते.
पण जेव्हा ही ते काही खात तेव्हा केवळ भात खात. आणि त्यामध्ये चवीसाठी मीठ देखील टाकत नसत. या सर्वांनंतरही सर्व भिक्षुक आनंदी होते, त्यांना कोणत्या गोष्टीची कमी वाटत नसे. त्यांचा विश्वास होता की कोणत्याही गोष्टींचा मोह आपल्याला या जगामध्ये हरवून टाकेल.
देवापासून दूर घेऊन जाईल. स्वादिष्ट जेवण पण त्यातीलच एक आहे ज्याची सवय ते स्वतःला लावू इच्छीत नव्हते. खूप वेळेस ते महिनोन्महिने केवळ शिजवलेला भात खात. कधीकधी त्यामध्ये केवळ मीठ किंवा हर्ब मिसळवित.
ते सर्वजण साधे कपडे घालत. प्रत्येक सदस्याकडे केवळ दोन जोडी कपडे होते. ते जेव्हा मठाबाहेर जात तेव्हा एक दुसऱ्यां सोबत कपडे शेअर करत. झोपण्यासाठी ते जमिनीवर स्ट्रोमैट अंथरत. त्यांच्या खोलीतील भिंतींवर देवांची आणि साधूनचे फोटोज लावलेली होती.
नरेन ला वाटत होते की त्यांच्यासोबत जेवढे लोक आहेत, त्यांना प्रत्येक गोष्टीबद्दल पूर्ण ज्ञान असावे. ते त्यांच्या सोबत खूप काही शेअर करून त्यांचे ज्ञान वाढवत. जगाच्या वेगवेगळ्या ठिकानाची पुस्तके वाचून दाखवत. नरेन त्यांना दुसऱ्या देशाच्या इतिहास आणि राजकीय व्यवस्थेबद्दल सांगत.
त्यांनी त्या सर्वांना प्लेटो, एरिस्टोटल, बुद्ध, हेगेल, केंट अशा अनेक लोकांबद्दल सांगितले. त्यांनी कर्म, योग, भक्ती आणि ज्ञान याबद्दल ही सांगितले. जेव्हा आपण आपले ज्ञान दुसऱ्यांना देतो तेव्हा आपले ज्ञान वाढतच असते. म्हणूनच नरेनचे ज्ञान जीवनातील प्रत्येक क्षेत्रात खूप चांगले झाले होते. जेव्हा ते सर्वजण थकत तेव्हा ते भजन गाऊन स्वतःला रिलॅक्स करत.