Leaders Eat Last: Why Some Teams Pull Together and Others Don’t (Marathi)
Leaders Eat Last by Simon Sinek
“Leaders Eat Last” म्हणजेच “लीडर्स सर्वात शेवटी जेवण करतात” हे ऐकायला थोड वेगळं वाटतं ना? कारण Leaders कडे तर इतर व्यक्तींपेक्षा अधिक पॉवर असते! आणि युजुअली ते स्वत:चे मूल्य इतर कर्मचार्यांपेक्षा वर ठेवतात. पण “लीडर्स ईट लास्ट” या टर्मचा खरा अर्थ आधी स्वत:ला priority न देता, जो इतरांच्या कल्याणकडे लक्ष देतो तोच खरा लीडर आहे. Good लीडर्स ते आहेत, जे आपल्या सहकाऱ्यांना महत्त्व देतात.ज्यांना माहित असते की, त्यांचा Influence इतरांवर पडत आहे, आणि ते नेहमी त्या Influence ला Positive ठेवण्याचा प्रयत्न करतात.
तर मग तुम्हाला जाणून घ्यायला आवडेल का, एखाद्या चांगल्या लीडर चे सर्वात महत्वाचे ( Characteristic ) वैशिष्ट्य काय असते? जर तुम्हाला हे जाणून घ्यायचे असेल, तर आमच्या सोबत रहा. कारण आम्ही या समरी मध्ये Leaders Eat Last या पुस्तकात मेंशन केलेल्या काही लीडर्सला Discribe करणार आहोत.
Simon Sinek यांनी लिहिलेल्या Short Stories पैकी एकाचा उल्लेख या पुस्तकात आहे. ही स्टोरी एका आर्मी ग्रुप बदल आहे. त्या ग्रुप मध्ये एक चांगला ( लीडर ) सार्जंट होता. पण या प्लॅटूनची म्हणजेच अर्मी ग्रुपची कार्यक्षमता त्याच्या कोणत्याही लीडर्सच्या अधिकारावर depend नव्हती. तर परस्पर विश्वास आणि एकमेकांच्या आदरावर अवलंबून होती.
पण लीडर्सने नेहमी 'सेन्स ऑफ़ अथोरिटीची' भावना दर्शविली पाहिजे.
Protection From Above
लिडर्स आपल्या soldiers शी जो संबंध निर्माण करतो, तो केवळ एक लीडर आणि सबओरडीनेट मधील संबंधासारखा नसतो. हे नाते समान स्थान नसलेल्या, दोन मनुष्यांमधील इतर मानवी संबंधांसारखेच आहे. सिमोन सिनेक त्याला “ द प्रोटेक्शन फ्रॉम above” म्हणतात.
आमच्या काही Readers ने “बँड ऑफ ब्रदर्स” नावाचा लोकप्रिय टीव्ही शो तर पाहिलाच असेल. ही सीरीज “प्रोटेक्शन फ्रॉम above” चे एक लोकप्रिय आणि उत्कृष्ट उदाहरण आहे.
आता आपण एका माणसाची गोष्ट पाहू, जो आधी तर एक साधा सैनिक होता, पण दुसर्या महायुद्धात त्याने मोठे यश संपादन केले ( Success मिळवले). बूट कैंपमध्ये, विंटर्स नावाचा एक सैनिक होता, तो इतर लोकांप्रमानेच एक साधा सैनिक होता. पण युद्धाच्या कठीण दिवसांत त्याचा चांगुलपना आणि धैर्य तेजस्वी प्रकाशासारखे उदयास आले आणि त्यामुळे तो अधिकारी बनला. सुरुवातीला तो एक Minor लेफ्टनंट होता.
तो आपल्या बूट कॅम्पमधील इतर सैनिकांना मागे टाकून उच्च पदावर आला होता पण त्याने या गोष्टीचा कधीच शो ऑफ नाही केला. तो जिथे इतर सैनिक झोपायचे तेथेच झोपायचा, जे इतर सैनिक खायचे, तेच तोही खायचा व तो इतर सैनिकांसोबत युद्धातही लढण्यास जायचा आणि याच कारणामुळे त्याच्या सैनिकांमध्ये 'विंटर्स' साठी खूप आदर होता.
त्याच्या ब्रेवेरीचे सगळे जण कौतुक करत. कारण तो नेहमी फर्स्ट लाइनमध्ये उभा राहिला आणि रोज आपल्या इतर सैनिकांसोबत आपला जीव देण्यास तयार असायचा.
तो त्याच्या प्रत्येक सैनिकास वैयक्तिक पातळीवर म्हणजेच Personal Level वर ओळखत होता तो नेहमी प्रत्येकाची Care करायचा. जर त्याचा एखादा सैनिक जखमी झाला असेल किंवा एखाद्याने आपला जीव गमावला असेल, तर त्याला फार दुःख होत असे.
काही काळानंतर तो मेजरच्या रँक पर्यंत पोहचला. पण 'विंटर्स' च्या वागण्यात कोणताही बदल झाला नाही. एवढ्या मोठ्या पदावर असल्यामुळे त्याला आता Front मध्ये राहण्याची गरज नव्हती, तरी देखील तो आपला बराच वेळ आपल्या सैनिकांसोबत घालवायचा.
एकदा तर अशी वेळ आली होती जेव्हा तो इतर अमेरिकन सैनिक आणि पैराटरूपर्स सोबत बास्टोनेच्या जंगलात अडकला होता. अशा कठीण ठिकाणी क्वचितच कोणते जनर्ल्स किंवा उच्च अधिकारी गेले असतील. काही काळानंतर त्या ठिकाणी पोहोचणे अशक्य झाले, कारण जर्मन लोकांनी अमेरिकन लोकांना सर्व बाजूंनी वेढले होते. तरी देखील, मेजर विंटर्स व इतरांच्या चांगल्या नेतृत्त्वामुळे अमेरिकन सैनिक मागे पडले नाही आणि त्यांनी वळून त्यांच्यावर हल्ला केला.
Empathy
“कर्मचारी देखील माणसे असतात” आणि ही गोष्ट एका लीडरला realise होणे फार गरजेचे आहे. याबाबत सिनेक म्हणतात, “ज्यांच्याशी तुमचे फक्त पैशाचे नाते असते त्या लोकांना एक Commodity (वस्तू) समजू नका. त्याऐवजी पैशाला Commodity म्हणून पाहिले पाहिजे, 'सहानुभूती' ही एक महत्वाची गोष्ट आहे ज्याद्वारे आपण हे करू शकतो.”
याचे एक उदाहरण पाहूया, मार्क एक यशस्वी उद्योजक आहे. त्यांची कंपनी इंटरनेट रूटर्स सोबत ट्रेड करते आणि त्यांना आपली सर्व्हिस देते. त्याच्या कंपनीत कर्मचारी कमी असतात, म्हणून तो सगळया कर्मचाऱ्यांना Personal Level वर ओळखतो. तरुण वयातच मार्कला एक मोठा माणूस बनून खूप पैसे कमवायचे होते.
पण जसजसा वेळ गेला तसतसे मार्कला एक योग्य लीडर कसा असावा याची जाणीव होत गेली. त्याने अल्पावधीतच भरपूर पैसे कमवण्याचा प्रयत्न केला. पण हळू हळू त्याला समजले की, संख्या जितक्या महत्त्वाच्या वाटतात तितक्या महत्त्वाच्या नसतात.
म्हणून त्याचे केवळ पैसे कमविण्याचे स्वप्न वेळेसोबत नाहीसे होतं गेले. त्यामुळे तो सर्वांचा आवडता लीडर बनला होता.
एवढेच नाही तर, मार्क स्वतः मालक असताना, त्यांची salary त्यांच्या कंपनीतील एका Hard working programmer पेक्षा कमी होती. कंपनीतील असे वातावरण पाहून त्यांचे कर्मचारी खूप Motivate राहत आणि आणखीन उत्साहाने काम करत.
ऑटोनोमी
मित्रांनो, मानसशास्त्राच्या बर्याच अभ्यासांमध्ये असे दिसून आले आहे की, (डेमॉक्रॅटिक वर्क एनवायरनमेंट) लोकशाही वातावरणात लोक आनंदी राहतात. जर कर्मचार्यांच्या कामावर खूपच नियंत्रण ठेवले किंवा काहीच नियंत्रण ठेवले नाही, तर त्यांच्यात Stress Related लक्षणे विकसित होवू शकतात.
जर हा Stress कायम राहिला, तर तो कर्मचार्यांच्या मनात नैराश्य, चिंता अशा अनेक प्रकारच्या गंभीर मानसिक आजारांना घेऊन येऊ शकतो. जे लोक मोकळ्या आणि मैत्रीपूर्ण वातावरणात काम करतात, ते अधिक प्रोडक्टिव, तसेच खूप आनंदी असतात.
डेमॉक्रॅटिक वर्क एनवायरनमेंटचा अर्थ अजून छान पद्धतीनं सांगण्यासाठी आणखी एक आर्मी चे उदाहरण घेऊया.
जरी आर्मी हे स्वत: एक डेमॉक्रॅटिक वर्क एनवायरनमेंटचे चांगले उदाहरण नसले, तरी सैन्यात काही डेमोक्रेटिक लेवल आहेत ज्यांना मेन्टेन करणे फार गरजेचे आहे. दोन टॉप जनरल मधील इंटररिलेशन हे याचे एक उत्तम उदाहरण आहे. दोन उच्च अधिकार्यांमध्ये सगळया गोष्टी सारख्या नसतात.
दुसर्या महायुद्धात, जेव्हा रेड आर्मी, जर्मन सैन्याला आपल्या सीमेबाहेर ढकलत होती, तेव्हा एका Particular ऑपरेशन 'operation Bagration' ने इस्टर्न फ्रंट वरील 'बेलेंस ऑफ़ पॉवरला' प्रॅक्टिकली टर्न केले.
हा जगातील सर्वात मोठ्या मिलिट्री ओफ्फेंस मधील एक होता.ज्याने 2.3 मिलियन Troops, असंख्य सैनिक, वाहने, विमाने आणि Tanks ला आपल्या कब्जात घेतले होते. हा जर्मन सैन्याच्या इतिहासातील सर्वात मोठा पराभव होता.
'अलेक्झांडर वेसिलेवस्काई' यांचा या ऑपरेशनच्या योजनेत खूप मोठा वाटा होता. या ऑपरेशनच्या आधीच काही दिवसांपूर्वी त्यांना सोव्हिएत युनियनच्या 'मार्शल' पदावर बढती देण्यात आली होती. पूर्वी हा रँक सोव्हिएत युनियनचा सर्वोच्च लष्करी रँक असायचा.
वेसिलेवस्काईने operation Bagration ची योजना फार व्यवस्थित आखली होती, परंतु हे इतके गुंतागुंतीचे ऑपरेशन होते की, त्यांना Ground level वर कोणत्याही प्रकारे पूर्णपणे नियंत्रित करणे शक्य नव्हते.
त्यांना युद्धात असलेल्या अधिकाऱ्यांच्या कौशल्य व बुद्धिमत्तेवर अवलंबून रहावे लागले. म्हणजेच, त्यांना 'जनरल जुकोवच्या' स्किल्सवर अवलंबून राहावे लागले, जो त्यांच्याच सैन्यातील एक कुशल लीडर होता. जर वेसिलेवस्काई ने जुकोवच्या कृतीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला असता, तर 'ऑपरेशन Bagration' इतके यशस्वी झाले नसते.