Chicken Soup for the Unsinkable Soul (Marathi)
Chicken Soup
तुम्हाला आर्डिनरी लोकांच्या एक्स्ट्राऑर्डिनरी गोष्टी ऐकायच्या आहेत का? तुम्हाला जाणून घायचे आहे का ,की कसे या लोकांनी त्यांच्या आयुष्यातील आव्हानांना उत्तरे दिली? अनसिंकेबल सोल म्हणजे आशा आणि चिकाटी यांच्या जोरावर जो आव्हानांना सामोरे जातो.
आपली गरिबी, आजारपण आणि अपंगत्व या पलीकडे जाऊन ज्या लोकांनी आयुष्याला नजर रोखून उत्तर दिले आहे आणि यश संपादन केले. अनसिंकेबल सोल प्रत्येक परिस्थिती मध्ये आनंद शोधतो. कदाचित तुम्ही देखील तुमच्या आयुष्यात अशाच काही अडचणींचा सामना करत असाल आणि एक वेळ अशी येते की आपण अगदी निराश होऊन जातो.
पण अशा वेळी आपण या गोष्टींमधून खूप काही शिकू शकतो आणि हिमतीने समस्येवर मात करू शकतो. या गोष्टी आपल्याला शिकवतात की आयुष्य हे खूप सुंदर आहे आणि वाईट प्रसंग कितीही आले तरी एक आशेचा किरण आपल्या चेहऱ्यावर हसू नक्कीच आणते.
आणि आपल्याला तोच आशेचा किरण शोधायचा आहे जो आपल्याला जगण्याची एक नवीन उमेद देईल. चिकन सूप फॉर सोल ही एक प्रसिद्ध बुक सिरीज आहे.
लेखकांनी या पुस्तकाच्या माध्यमातून समाजाच्या, प्रत्येक वर्गाच्या अशा करोडो लोकांच्या गोष्टी लिहिल्या आहेत ज्यामुळे आपल्याला प्रेरणा तर मिळतेच शिवाय त्या गोष्टी आपल्याला वेगळा विचार करायला भाग पाडतात. चिकन सूप आज देखील करोडो लोकांना प्रेरणा देत आहे आणि बदल घडवत आहे
TO READ OR LISTEN COMPLETE BOOK CLICK HERE
अ न्यू डे फॉर डोरोथि ( A New Day for Dorothy )
डोरोथि ही एक 8 वर्षांची लहान मुलगी आहे. तिची आई तिला फ्रान्सिस नावाच्या थेरपिस्ट कडे घेऊन जाते. इतर डॉक्टर म्हणत होते की ही वेडी आहे, Mentally retarded वैगेरे. आणि हिची case एकदम होपलेस आहे. डोरोथि बोलू शकत नाही. तिच्या तोंडून आईने आजपर्यंत एक ही शब्द ऐकलेला नाही.
एवढ्या वर्षांच्या दिव्यांग मुलांच्या उपरचारात,फ्रान्सिस ला एक गोष्ट लक्षात आली की कमतरतांवर जास्त लक्ष दिले नाही पहिजे उलट ( or तर ) त्यांच्या विशेष गुणांकडे लक्ष देऊन त्यांना खूप सारे प्रेम दिले पाहिजे. फ्रान्सिस चे असे म्हणणे होते की प्रत्येक दिव्यांग मुलाची म्हणजेच या स्पेशल मुलांची काहीतरी स्पेशल स्ट्रेंग्थ जरूर असते. डोरोथिने तर पहिल्या भेटीतच फ्रान्सिस चे मन जिंकून घेतले.
तिचे केस सोनेरी होते आणि डोळे हे निळेशार. पहिल्यादा फ्रान्सिस ला भेटताना, डोरोथि खूप लाजत होती. डोरोथि ची आई सांगू लागली की कधी कधी एकदम शांत तर कधी इतकी मस्ती करते की हिला आवरणे अगदी अवघड होते. पण फ्रान्सिस ला असे अजिबात वाटत नव्हते, तिला कळते (कळाले) की डोरोथि स्वतःची ओळख बनवण्याचा प्रयत्न करत आहे.
फ्रान्सिसने डोरोथि ला एक महिना अंडर ऑब्झरव्हेशन ठेवले. सुरुवातीला तिला बऱ्याच अडचणी आल्या, तिने डोरोथि ला दिव्यांग मुलांच्या वर्गात घेऊन जायला सुरुवात केली.डोरोथि मात्र एका कोपऱ्यात शांत बसून राहायची. तिला इतरांसोबत खेळायला आवडायचे नाही.
ती वेगळी राहायची. टीचर म्हणाल्या, 'ही तर काहीच रिस्पॉन्स देत नाही.हिचे आईवडील का बरं पाठवता हिला इथे'. फ्रान्सिस ने पाहिले की बाकी मुलं वुडन शेप्स खेळत होते. कोणी चौरसाच्या होल मध्ये दुसरा चौरस फिट करण्याचा प्रयत्न करत होता. फ्रान्सिस ला कळून चुकले होते की डोरोथि ला क्लास मध्ये काही इंटरेस्ट नाही आहे व तिला खेळणे हे तितके आव्हानात्मक आणि मजेशीर नाही वाटत.
तिने डोरोथि च्या पालकांना सांगितले की तिला शाळेत पाठवू नका. डोरोथी चा प्रोबेलम हा होता की तिचे स्ट्रेंथ कोणाला कळत नव्हते. कोणाला ही डोरोथी कडून सुधारणेची अपेक्षा नव्हती. फ्रान्सिस ने बघितले की डोरोथी ला जर शिकण्याची आणि स्वतःहून काही करण्याची संधी मिळली तर तिच्यात नक्कीच सुधारणा होइल.
एके दिवशी डोरोथि नाश्ता करत नव्हती, ती फक्त तिच्या भावंडांचे खाताना निरीक्षण करत होती. तेवढ्यात नर्स म्हणली की 'हिला चमच्याने भरवा' पण फ्रान्सिस म्हणाली की, ती 'स्वतःच्या हाताने खाऊ शकते, पण ती सध्या बाकीच्यांना खाताना बघते आहे', नर्स ला ही गोष्ट काही समजली नाही कारण नर्स साठी ती एक वेडी आणि होपेलेस केस होती.
पण फ्रान्सिस ला मात्र माहीत होते की डोरोथि जरी काही बोलू शकत नसली तरी तीच्या आजू-बाजूला काय घडत आहे हे तिला समजत होते. एक दिवशी सकाळी फ्रान्सिस डोरोथि ला सेंट्रल पार्क मध्ये घेऊन गेली. दोघे पार्क मध्ये फिरत असताना फ्रान्सिस काहीतरी गुणगुणू लागली, त्यावर डोरोथि डोकं हलवू लागली आणि त्यावर थाप देऊ लागली.
फ्रान्सिस ला कळले की डोरोथि ला गाणे आवडते. एका बाकावर बसून त्यांनी क्रेयॉन्स चे खडू आणि स्केच पेन काढले. फ्रान्सिस ने डोरोथि चे चित्र पाहिले, तर ती व्हेविंग आणि फ्लोविंग लाईन्स काढत होती. फ्रान्सिस ला त्यांचा अर्थ नाही कळला.
नर्सच्या म्हणण्यानुसार त्या चित्राला काही अर्थ नव्हता. पार्क मध्ये बसून फ्रान्सिस झाडांचे आणि आकाशाचे चित्र काढत बसली होती. तेवढ्यात डोरोथि उठली, आळस दिला आणि पक्ष्यासारखे उडण्याची नकल करत इकडे तिकडे बागडू लागली वसंत ऋतू नुकताच बहरला होता, फ्रान्सिस आणि डोरोथि घरात पियानो वाजवण्याची प्रॅक्टिस करत होते.
फ्रान्सिस ने डोरोथि ला आवडणारे प्रत्येक गाणे प्ले केले. आणि काय आश्चर्य! डोरोथि चक्क गात होती, तिचा चिमुकला आवाज घरात घुमत होता. फ्रान्सिस गाणे वाजवत राहिली, ती पाहते की डोरोथि ला त्या गाण्याचा प्रत्येक शब्द न शब्द लक्षात होता. तेवढ्यात दरवाजातून कोणाचा तरी रडण्याचा आवाज आला.
डोरोथि ची आई भावुक होऊन रडत होती, घरात जाऊन तिने डोरोथिला घट्ट मिठी मारली. त्या दिवशी डोरोथि चे आयुष्य बदलले. फ्रान्सिस अजून महिनाभर त्यांच्या सोबत राहिली. त्या वेळेत डोरोथि abcd शिकली.
फ्रान्सिस जेव्हा तिथून गेली तेव्हा डोरोथि 13 वर्षांची होती आणि ती आता तिची बरीच काम स्वतः करू शकत होती, डोरोथि बोलू लागली होती. फ्रान्सिसने जेव्हा तिला तिने काढलेल्या चित्राचा अर्थ विचारला तेव्हा डोरोथि म्हणाली की, 'हे चित्र हवेचे आहे'. डोरोथि आता पंख विस्तारून आकाशाला गवसणी घालत आहे.
TO READ OR LISTEN COMPLETE BOOK CLICK HERE
आता नेक्स्ट स्टोरी आहे, छोटे सैनि
राचेल, 27 वर्षीय एक सिंगल मदर आहे. तिची 4 मुलं म्हणजचे तिचे 4 छोटे सैनिक आणि ती न्यू जर्सी च्या एका जुन्या बिल्डिंग मध्ये राहतात. ती त्यांचे पालन पोषण करण्यासाठी खूप कष्ट घेते. ती त्यांना ऐशो-आरामाचे आयुष्य देऊ शकत नाही पण त्यांना खूप प्रेम देते जेणेकरून ते नेहमी आनंदी राहतील.
मुलं झोपल्यानंतर ती आपले राहणीमान कसे उंचावता येईल याचा विचार करत असते. एका रात्री तिला एक बिल्डिंग मिळाली जिथे 5 रूम आणि अंगण देखील होते जिथे लहान मुलं खेळू शकतील. राचेल ने घर मालकीण शी (घर मालकीणी शी) बोलणी केली व बोलणी प्रमाणे घर मालकीण एका महिन्यात सगळे घर रिपेर करून राचेल च्या ताब्यात देणार होती.
राचेल ने देखील एका महिन्याचे रेंट आधीच दिले होते. सगळे जण खूपच खुश होते आणि आता पासूनच सगळी आवरा आवर सुरू केली होती. राचेल मुलांच्या आनंदात आनंद मानून घेत होती पण तेवढ्यात एक मोठा प्रॉब्लेम झाला.
राचेल नवीन घराच्या चाव्या घ्यायच्या विसरली आणि घर मालकीण देखील फोन उचलत नव्हती. असं वाटत होते की घरमालकिणीने तिला फसवले आहे.जड अंतःकरणाने राचेल ने ही बातमी तिच्या मुलांना सांगितली.
पण याच्या पेक्षा अजून वाईट घडणे बाकी होते. जुन्या घरात देखील ते जाऊ शकत नव्हते कारण तिथे दुसरी लोकं राहायला आली होती.राचेल जवळ काहीच पैसे शिल्लक नव्हते.
राचेल ची आई त्यांना घरी बोलावू इच्छित होती पण तिथे मात्र लहान मूल अलाऊड नव्हते. राचेल मग तिच्या एका मैत्रिणीकडे गेली जी स्वतः 5 मुलांची सिंगल मदर होती.तिने त्यांना काही दिवस राहण्याची परवानगी दिली पण शेवटी मात्र राचेल आपल्या 4 सैनिकांसोबत तिच्या कार मध्ये राहू लागली.
तिच्या 10 वर्षाच्या मुलाने विचारले की 'आपण आजी कडे का नाही राहायला जात?' , राचेल म्हणाली की 'प्रत्येकाचे आपापले आयुष्य असते आणि आपले प्रॉब्लेम आपण सोडवले पाहिजे आणि आपण ते नक्की सोडवू'.
ती आपल्या मुलांसमोर कणखर राहत होती कारण शेवटी तिची मुलंच तिची ताकद होते. पुढचे काही आठवडे त्यांनी कार मध्ये राहून काढले. अंघोळी साठी ते आजी कडे जात व जेवण फास्ट फूड रेस्टॉरंट मध्ये करत असत. या दरम्यान त्यांनी शाळेला एक दिवस देखील दांडी मारली नाही.
त्यांचे रुटीन जरी बिघडले असले तरी त्यांनी परिस्थितीशी जुळवून घेतले होते.राचेल रोज एखाद्या पार्किंग लॉट मध्ये सुरक्षित अशी जागा शोधायची जिथे त्यांना रात्र काढता येईल. जास्त थंडी असेल तर मूलं मागच्या सीट वर एकमेकाना चिटकून झोपत असत.आणि राचेल ड्रायव्हर सीट वर बसून त्यांच्या वर लक्ष देत.
कालांतरानंतर तिच्या कडे भाडे देता येईल इतके पैसे जमले. पण कोणीदेखील तिला चार मुलांसोबत राहण्यासाठी घर भाड्याने देत नव्हते. दुसरा कोणता पर्याय नसल्याने राचेल एका स्वस्त हॉटेल मध्ये राहायला लागली. मुलं खुश होती कारण आता त्यांना झोपण्यासाठी पलंग होता आणि अंघोळी साठी बाथटब.
ते एका छोट्याशा भांड्यात जेवण बनवू लागले. बऱ्याच दिवसानंतर अचानक तिला घर मालकीणीचा फोन आला व तिने घडलेल्या प्रकाराबद्दल माफी मागितली आणि सगळे पैसे परत करण्याचे आश्वासन दिले.
या गोष्टीला 13 वर्ष झाली, आता राचेल तीच्या चार सैनिकांसोबत मोठ्या घरात राहते आहे.
तिला तिच्या मुलांचा खूप अभिमान वाटतो कारण बेताच्या परिस्थिती मध्ये देखील त्यांनी कधी आई जवळ कुरकुर केली नाही व आई ला खंबीर पणे साथ दिली.
त्या सगळ्यांनी मिळून, हिमतीच्या जोरावर त्या वाईट परिस्थितीवर मात केली होती.