Sapiens: A Brief History of Humankind (Marathi)

Sapiens: A Brief History of Humankind (Marathi)

फॅक्ट 1: 2 मिलियन वर्षांपूर्वी पृथ्वीवर मनुष्याच्या फक्त 6 प्रजाती होत्या. ज्यांना शास्त्रज्ञ 'ह्यूमन स्पीसीज' म्हणतात.

फॅक्टर 2: या सहा प्रजातींमधल्या 'होमो सेपियन्स' नावाच्या प्रजाती ने बाकी सगळ्या जातींना संपवून टाकले. म्हणजेच पृथ्वीवर 'ह्यूमन स्पीसीज' मधल्या सहा प्रजाती पैकी केवळ होमो सेपियन्स राहीले, आणि बाकी सगळ्या जाती संपुष्टात आल्या.

फॅक्ट 3: तुम्हाला माहित आहे? या होमो सेपियन्स' नावाच्या प्रजाती कडे जगावर हुकूमत गाजवण्याची ताकत होती.

फॅक्ट 4: या पृथ्वीवर अगोदर मानव जन्मास आला का? तर नाही. आपल्या आधी इथे अनेक प्रकारचे मोठ-मोठे जीव राहात होते, पण आता त्यांतील एक ही उरलेला नाही.

मित्रांनो, या पुस्तकाची समरी ऐकताना तुम्हाला अश्या अनेक आश्चर्यकारक गोष्टी कळणार आहेत. आपल्या लेखकांनी पृथ्वीवरील सजीवांचा सखोल अभ्यास करून मानवी इतिहासाबद्दल लिहिले आहे. या पुस्तकाची समरी ऐकताना, तुम्हाला अशा काही गोष्टी शिकायला मिळतील ज्या तुम्ही कदाचीत शाळेतही अभ्यासल्या नसतील.

ही समरी ऐकल्यावर तुम्हाला समजेल की, मनुष्य जात म्हणजेच आपण या जगावर वर्चस्व करीत आहोत, त्यासोबतच आपल्यावर एक मोठी जबाबदारीही आहे.

एन एनिमल ऑफ नो सिग्निफिकॅन्स
(An animal of no significance)

Imagine करा, तुमच्या समोर एक आई आहे जी आपल्या मुलांची काळजी घेतेय, त्यांच संगोपन करतेय. तिथं लहान लहान मुले इकडे-तिकडे पळत आहेत; बागडत आहेत. माणसे त्यांचे मसल्स दाखवत आहेत आणि म्हातारी माणसं एका बाजूला बसून ते पाहत आहेत. हे इमॅजिन केल्यावर तुम्हाला कळालेच असेल ना, माणूस हा सोशल प्राणी आहे,

जसे सगळे लोक एकत्र वावरतात, सोबत उठतात-बसतात, सोबत खेळतात सुद्धा म्हणजेच त्यांना एकत्रित ग्रुप मध्ये राहायला आवडतं. यावरून आणि आणखीन काही पुरव्यातून आपल्या scientists ने ही हा निष्कर्ष काढला आहे की, माणूस पुरातन काळापासूनच एक Social प्राणी आहे.

माणसात वेग वेगळ्या भावना असतात. जसं आपल्यात मैत्रीची, प्रेमाची, आदराची, तिरस्कारराची, रागाची भावना असते, तसंच आपल्यात चढाओढीची ही भावना ही असते; म्हणजेच आपल्यात कॉम्पटीशन ही खूप असते. या समरी मधून आपण ह्युमन species मधील competition बद्दल ही पाहणार आहोत.

पण फक्त मनुष्य जातचं अशी असते का? तर नाही. फक्त माणूसच नाही तर हत्ती, माकड, चिम्पांजी असे सगळे प्राणी याच पद्धतीने जगतात. जर सगळेच असे जगतात तर मानवामध्ये असं काय स्पेशल आहे बरं? आपण ही जंगलातल्या बाकी जनावरांसारखेच आहोत, फक्त आपण त्या प्राण्यांपेक्षा दिसायला वेगळे आहोत. आणि आपण आपल्या बुद्धीचा वापर करतं अहोत.

बायोलॉजिस्ट ने स्पेसिजच्या बेस वर ओर्गेनिज्मस चे वेगवेगळ्या गटांमध्ये विभाजन केले आहे. जे जीव एकमेकांशी शारीरिक संबंध ठेऊन नवीन जीवाला जन्म देऊ शकतात, ते एक गटात येतात म्हणजेच त्यांना एका जातीचे मानले जाते.

एक उदाहरण पाहूया जसे घोडा आणि गाढव हे दोन वेगळे प्राणी आहेत; जर दोघांची क्रॉस ब्रीडिंग केली तर म्युल (mule) जन्माला येईल. ते म्युल अर्धे गाढव आणि अर्धा घोडा असेल. पण ते म्युल infertile असेल; म्हणजेच त्यापासून कोणताच जीव जन्माला येऊ शकतं नाही. म्हणजेच त्या म्युल ला स्वतः चे मुलं होवू शकतं नाही.

अजून एक उदाहरण पाहूया, समजा बुल डॉग आणि स्पैनियल ब्रीड डॉग्स आहेत. हे दोन वेगळे ब्रीड आहेत पण त्यांची जात एकच आहे. हे दोन्हीही नैसर्गिकरित्या मेटिंग करून पिल्लं जन्माला घालू शकतात. त्यांचे पिल्लं देखील मोठे होऊन पिल्लं जन्माला घालू शकतात.

आणि त्यांची प्रजाती वाढवू शकतात. कारण ज्या स्पेसिज चे पूर्वज किंवा एन्सेस्टर्स एकच असतात, त्यांचे “जीनस” म्हणजेच गट एकच असतो. जसं की वाघ, बिबट्या, चित्ता आणि सिंह हे पैंथरा नामक जीनसमध्ये येतात.

बायोलॉजिस्टने ओर्गेनिज्म्सला दोन वेगळ्या भागात दोन वेगळ्या लॅटिन नावाने संबोधले आहे, एक आहे “जीनस” आणि दुसरं आहे “स्पेसिज”. लायन्सची म्हणजेच सिंहाची स्पेसिज आहे 'लियो' आणि ते 'पैंथरा' जीनस मध्ये मोडतात, म्हणून लायन्स चे स्पेसिफिक नाव झाले 'पैंथरा लियो'. याचप्रकारे 'होमो सेपियन्स' मध्ये “होमो” हे जिनस आहे आणि “सेपियन्स” स्पेसिज आहे, ज्याचा अर्थ आहे बुद्धिमान.

होमो निएंडरथल्स (The Homo Neanderthals) आणि होमो एरेक्टुस (Homo erectus) या दोन वेगवेगळ्या स्पेसिज आहेत. पण या दोन्हीही Humans family ला belong करतात. जसं की, सिंह, चित्ता आणि पाळीव मांजर हे तिघेही एका फॅमिलीला बिलॉग करतात, याचा सरळ अर्थ असा आहे की एका फॅमिलीला बिलॉग करणाऱ्या सगळ्या प्राण्यांचे पूर्वज एकच आहेत.

याच प्रमाणे जैकाल्स (एक प्रकारचा कोल्हा), कोल्हे, लांडगे हे डॉग फॅमिली मध्ये येतात.
मॅमथ, हत्ती आणि मस्टोडोंस (Mammoths, elephants and mastodons ) हे तिन्ही एलिफंट फॅमिलीमध्ये येतात.

आता तुम्ही विश्वास ठेवा किंवा नका ठेवू, पण आपली म्हणजेच मानवाची प्रजाती गोरिल्लास, ओरेंगउटान्स, आणि चिम्पैंजी यांसारख्या 'एप फॅमिली' ला बिलॉग करते. चिंपांजी आपले जवळचे नातेवाईक आहे असं बोललं तरी ते चुकीच  ठरणार नाही.

जवळपास 6 मिलियन वर्षांपूर्वी एका एप ने दोन मादी एप ला जन्म दिला होता, त्यांतील एक चिंपांजीची ग्रँडमदर झाली आणि एक आपली. एका मादी एप ने चिंपांजी ची प्रजाती वाढवली आणि दुसऱ्या मादी एप ने मनुष्य जाती. आहे ना इंटरेस्टिंग गोष्ट?

ऑस्ट्रालोपिथेकुस (Australopithecus) नामक जिनस असलेल्या एका एप मध्ये evolution झाले आणि मानवाची निर्मीती होण्यास सुरुवात झाली. ही प्रजाती ईस्ट आफ्रिकामध्ये राहत होती. त्यानंतर 2 मिलियन वर्षांपूर्वी यांतील काही मनुष्य दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित झाले. ही लोकं नॉर्थ आफ्रिका कडे गेले मग तेथून युरोप आणि आशिया कडे वळाले.

नवीन ठिकाणच्या वेगवेगळ्या वातावरणामुळे त्यांच्यात विविध बदल होत गेले. जो आदिमानव युरोप आणि वेस्ट आशिया मध्ये गेला, त्याने तिथल्या हवामानानुसार स्वतः ला adapt करून घेतले. या नंतर त्यांचे रूपांतर “neanderthalensis” मध्ये झाले. ज्यांना “Neanderthals” असं ही बोललं जातं.

जे आदिमानव ईस्ट आशियामध्ये आले ते “होमो एरेक्टुस” किंवा “अपराईट मॅन” नावाने ओळखले जाऊ लागले. जे मानव इंडोनेशियाच्या जावा आईलंडमध्ये वसले ते “होमो सोलोनसिस” (Homo soloensis) या नावाने ओळखले जातात, जे ईस्ट आशिया आणि इंडोनेशियाच्या जावा आईलंडमध्ये आले, त्या लोकांनी tropical किंवा विषुववृत्ताच्या जवळच्या वातावरणानुसार स्वतः ला adapt केले.

त्याच काळात दुसरीकडे, इंडोनेशियाच्या फ्लोरेस आयलंडमध्ये अजून एक मनुष्य प्रजातीची वाढ झाली त्यांना होमो फ्लोरेसइएंसिस म्हटले गेले. असं बोललं जातं की, होमो फ्लोरेसिएंश (Homo floresiensis) या आयलंडवर आले तेव्हा समुद्राच्या पाण्याची पातळी कमी लेव्हल ला होती.

त्यानंतर जेव्हा पाण्याची पातळी वाढली तेव्हा ती लोकं त्या आयलंडवरच ट्रॅप झाली. म्हणजेच ती लोकं तिथून बाहेर पडू शकली नाहीत. या आयलंड वर जगण्यासाठी जास्त साधने नव्हती. जे आदिमानव शरीराने मोठे होते त्यांना पुरेसे अन्न न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाला. आणि जे शारीरिकदृष्ट्या लहान होते त्यांनी या परिस्थित स्वतः ला टिकून ठेवले.

TO READ OR LISTEN COMPLETE BOOK CLICK HERE

हजारो वर्षानंतर होमो फ्लोरेसिएंशच्या जनरेशनमध्ये उंचीने लहान म्हणजेचं बुटके मनुष्य जन्माला येऊ लागली. त्यांची उंची फक्त एक मीटर पर्यंतच वाढू लागली. आणि वजन जवळपास 25 किलो इतकं होतं.

हे मनुष्य दिसायला छोटे होते पण त्यांची प्रजाती खूप वाढली. यांनीच तर नंतर प्राण्यांच्या शिकारीसाठी दगडापासून अवजारे बनवली. ते हत्ती सारख्या प्राण्याची ही शिकार करतं होते. एका बाजूला मानवांची स्पर्धा आफ्रिकेच्या बाहेर पोहचली होती, तर ईस्ट आफ्रिकाच्या मानवांचा विकास ही खुप जोमाने होत होता.

यांना होमो रुडोल्फफेंसिस ( Homo rudolfensis) किंवा “मॅन फ्रॉम लेक रुडोल्फ” आणि होमो इरगेस्टर (“Man from Lake Rudolf” and the Homo ergaster ) किंवा वर्किंग मॅन ही बोललं जात होतं.

नंतर हळूहळू आपल्या स्पेसिज म्हणजेच आपण ही विकसित झालो, ज्यांना आज आपण होमो सेपियन्स म्हणजेच वाईज मेन (wise man) म्हणून ओळखतो. या सगळ्या आदिमानव प्रजाती पृथ्वीवर एकाच कालखंडात राहत होत्या, ही गोष्ट आजपसून कदाचित 2 मिलियन ते 10,000 वर्षांपूर्वीची आहे.

Neanderthals, होमो सोलोएँसिस, होमो फ्लोरेसिएंसिस, होमो एरेक्टुस, होमो एर्गेस्टर आणि होमो सेपियन्स या मानव प्रजाती आहेत. जर अस्वल, डुक्करे, कोल्हे आणि बाकी अन्य प्राण्यांच्या अनेक प्रजाती असू शकतात, मग मानवाची का नाही असू शकतं? पण तुम्ही कधी विचार केलाय का, की होमो सेपियन्स चं इतके वर्ष पृथ्वीवर कसे टिकून राहिले.

हो, या मागे  एक आश्चर्यकारक गोष्ट आहे. ही गोष्ट आहे 1,50,000 वर्षां पूर्वीची. ईस्ट आफ्रिकामध्ये राहणाऱ्या होमो सेपियन्सला बाकी जगाशी काही घेणं देणं नव्हतं. ही लोकं हंटर गॅदरर होती. म्हणजेच hunting/ शिकार करायची आणि त्यावरचं जगायची. नंतर त्यांनीच आगीचा शोध लावला. ते आगीचा उपयोग अन्न शिजवण्यासाठी आणि जंगली जनावरांना घाबरवण्यासाठी करू लागली.

वैज्ञानिकांचं असं मत आहे की, या युगातील सेपियन्स आपल्यासारखेच दिसत होते. जेव्हा या लोकांनी आगीवर अन्न शिजवून खायला सुरुवात केली तेव्हा  अन्न चावायला त्यांना कमी कष्ट लागत होते, म्हणूनच त्यांच्या पूर्वजांपेक्षा होमो सेपियन्स चे जबडे छोटे होते.

पण त्यांच्या मेंदूचा आकार आपल्या इतकाच होता.   आज जर एखाद्या होमो सेपियन ची बॉडी मिळाली  तर पॅथॉलॉजीस्टला त्यात काहीही नवीन किंवा वेगळं असं वाटणार नाही.

70,000 हजार वर्षांपूर्वी ईस्ट आफ्रिकेतून होमो सेपियन्स बाहेर पडले. ते अरेबियन peninsula ला वळसा घालून युरोप आणि आशिया मध्ये गेले. तिथे गेल्यावर त्यांना कळून आले की, Neanderthals आणि दूसऱ्या ह्यूमन स्पीशीज इथे आधीपासूनच राहतं आहेत. यापुढे काय झाले असेल बरं? असाच प्रश्न आपल्या सायंटिस्ट ला ही पडला, त्यावर रिसर्च केल्यावर दोन theories पुढे आल्या.

पहिली थिओरी आहे, “इंटरब्रीडिंग थेरी”. ही theory सांगते की, ईस्ट आफ्रिकामधून दुसऱ्या वेळी बाहेर आलेले प्रगत मानव म्हणजेच होमो सेपियन्स जे यूरेशियामध्ये गेले, त्यांनी तिथे असलेल्या Neanderthals सोबत संभोग केला असावा आणि त्यांची नवीन पिढी वाढवली असावी.

जे मानव ईस्ट आशियात गेले होते त्यांचा शारीरिक संबंध होमो एरेक्टुससोबत आला असावा, म्हणूनच या जागी या स्पेसिजचे संमिश्र लोकं मिळतात. असे असले तरी रीप्लेसमेंट थेरी याच्या विरुद्ध आहे, कारण होमो सेपियन्स वेगळ्या जातीचे लोकं होते त्यावेळी त्यांची Neanderthals सोबत नक्कीच गाठ पडली असेल.

आणि दोघांनीही एकमेकांना संपवन्याचा पूर्ण प्रयत्न केला असेल. पण समजा जर ते एकमेकांत मिसळले असतील, तरी त्यांची पिढी वाढली नसती कारण ते नवजीवांना जन्म देऊ शकत नव्हते. म्हणून हे शक्यच नाही की, या दोन जातींनी मिळून पिढी वाढवली असेल.

होमो सेपियन्स ने Neanderthals ला संपवण्याचा प्रयत्न केला होता. असं रीप्लेसमेंट थेरी सांगते. नक्कीच सेपियन्स हुशार होतेच, त्यांना कुकिंग येत होती आणि त्यांचे ब्रेन ही जास्त विकसित झाले होते. बाकी जातींपेक्षा सेपियन्स हे कुशल शिकारी आणि गॅदरर होते, त्यांनी जास्तीत जास्त नैसर्गिक संसाधनांचा वापर केला आणि अशीच त्यांची संख्या वाढत गेली.

पण यादरम्यान Neanderthals शिकार करू शकत नव्हते. त्यांच्याकडे खाण्या-पिण्याची (अन्नाची ) खुपच जास्त कमतरता भासू लागली, एकेक करून त्यांच्या गटातील लोकं मरायला लागली. आणि आपापसातल्या भांडणामुळे त्यांचा जीव गेला. अशी देखील एक थेरी आहे.

युरेशियन सेपियन्स ने Neanderthals चा पूर्ण खात्मा करून टाकला. जर ही थेरी खरी आहे तर ही  इतिहासातील फर्स्ट जेनोसाइड किंवा 'एथनिक क्लींजिंग' मानली जाईल.

2010 मध्ये आलेल्या genetic डिस्कव्हरी ने त्या सगळ्या वैज्ञानिकांचे मत परिवर्तन केले, जे रीप्लेसमेंट थेरीच्या पक्षात होते. Geneticists ने (जनुकावर / DNA वर रिसर्च करणारे शास्त्रज्ञ) Neanderthals च्या fossile मधील DNA ला, आणि  मॉडर्न ह्यूमनच्या DNA ला कम्पेअर केले.

त्यांना असं दिसून आलं की मॉडर्न योरोपियंस आणि अरबांच्या डीएनए मध्ये 4% Neanderthals चा DNA आहे. जसं बायोलॉजीच्या भाषेत कोणतीही गोष्ट पूर्णतः काळी किंवा पूर्णतः पांढरी नसते, मधे मधे काही ग्रे जागा ही असतात, म्हणजेच प्रत्येक गोष्टीच्या अनेक बाजु असतात.

याचप्रमाणे इंटरब्रीडिंग आणि रीप्लेसमेंट या दोन्हीही थेरीज खऱ्या असू शकतात. असं पण असू शकतं की सेपियन्सनेच Neanderthals च्या प्रजातीला संपवले असेल, आणि त्यांच्या मधील काहींनी मिळून fertile मुलांना जन्म दिला असेल, कदाचीत त्यामुळेच मिळालेले DNA संमिश्र आहेत.

TO READ OR LISTEN COMPLETE BOOK CLICK HERE

SHARE
Subscribe
Notify of
Or
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments