The $100 Startup (Marathi)
लेसंस टू लर्न
माझ्याकडे कोणतहीे स्किल्स नाही, मी पैसे कसे कमवू शकतो?
खरं तर तुमच्याकडे जर कोणतेचं स्किल नसेल, तर तुम्ही लाईफ मध्ये कधीच पैसे कमवू शकणार नाही.
पण असं आहे की, तुम्ही पैसे कमवता! खरं तर प्रत्येक जण कमवतो. कारण प्रत्येक जण या जगात कोणत्या ना कोणत्या टॅलेंट सोबत जन्माला आलेला आहे. तुम्हाला माहितेय तुमचा प्रोब्लेम काय आहे? प्रॉब्लेम केवळ एवढाच आहे की, तुम्हाला स्वतःला हे माहीत नसते, तुमच्यात कोणते टॅलेंट लपलेले आहे.
एक दिवस माइकल सूट घालून, छान असे तयार होवून ऑफीससाठी निघाला. नेहमप्रमाणेच दिवस संपला. माइकल आता घरी निघणार होता, तेवढ्यात त्यांच्या बॉसने मायकल ला ऑफीस मध्ये बोलवले आणि ते माइकल ला म्हणाले, “इकोनोमिक क्राइसिसमुळे तुला कामावरून काढले जात आहे.”
माइकल हे ऐकून एगदम स्थब्द झाला. त्याला प्रश्न पडू लागले, तो त्याच्या बायकोला, पोरांना कसे सांगणार की, त्त्याला कामावरून काढले आहे. काही वेळानंतर माइकल ह्या मनस्थितीतून कसेबसे बाहेर आला आणि स्वतःला Push करतं, तो नवीन जॉब शोधायला लागला पण त्याला कोणतेच काम मिळत नव्हते.
मायकलच्या एका मित्राचे फर्नीचरच दुकान होतं. एके दिवशी तो मित्र माइकल ला म्हणाला, “माझ्याकडे काही निरुपयोगी मेट्रेसेस ( गादया) पडलेल्या आहेत, ज्याचा मला काही उपयोग नाही.
तू ह्या गाद्यांना खरेदी कर व त्यांना विकायचा प्रयत्न कर. जेणेकरून तू काही पैसे कमवशील.” माइकल स्वतःला म्हणाला, चला हे पण ठीकच आहे आणि तो ही रिस्क घ्यायला तयार झाला. पण मायकल ला त्या गाद्यांना (मेट्रेसेसला) ठेवण्यासाठी एका जागेची गरज होती.
म्हणून त्यांनी रेंटवर एक जागा घेतली आणि छोटासा बिजनेस स्टार्ट केला. सुरुवातीला त्यांचा बिजनेस चांगला चालला, पण हळू हळू त्याला प्रोब्लेम येऊ लागले. क्लाइंट्स जेव्हा त्याला विचारत की, त्यांना कोणत्या टाईपचे मेट्रेसेस खरेदी करायला हवे, तेव्हा माइकलला या गोष्टींबद्दल नॉलेज नसल्याने, तो काहीच उत्तर देत नसतं.
त्याला हेही माहित नव्हते की, तो कोणत्या टाईपचे मेट्रेसेस विकत आहे. पण नंतर त्याने ठरवले, अगोदर तो या गोष्टींची पूर्ण माहिती घेतील आणि पूर्ण नॉलेज घेतल्यानंतर, तो एका प्रोपर प्लॅनने काम करेल.
त्याने यासाठी एक बिझनेस प्लॅन बनवला ज्यात तो एक असा स्टोअर उघडेल जिथं सायकलवरून मेट्रेसेसची डिलिव्हरी केली जाईल. आणि जे ग्राहक सायकल घेऊन येतात त्यांना मोफत डिलीवरी दिली जाईल.
आहे ना हा मार्केटींगचा चांगला मार्ग? त्यावेळी अनेक कस्टमर सायकल वरून मेट्रेसेस घरी घेऊन जाताना व्हिडिओ काढत व त्या व्हिडिओज ला ते YouTube वर टाकत यामुळं मायकल ला खूप प्रसिद्धी मिळाली आणि अशा प्रकारे मायकल चा बिझनेस सुरू झाला.
ही त्याच्यासाठी सर्वात आनंदाची गोष्ट होती. अशा बिझनेस ला माइक्रोबिझनेस म्हंटले जाते. ज्यात जवळजवळ काहीच स्टार्टअप कॉस्ट लागत नाही. एवढेच नाही तर अशा बिझनेस मध्ये सक्सेसची गॅरंटी देखील असते.
TO READ OR LISTEN COMPLETE BOOK CLICK HERE
3 महत्त्वाचे लेसन तुम्ही या पुस्तकातून शिकाल.
● कन्वेर्जेंस:
जर तुमच्या पॅशन मध्ये इतर लोकांना इंटरेस्ट असेल तरच तुम्हाला त्या पॅशन मधुन स्टार्ट केलेला बिझनेस मध्ये सक्सेस मिळू शकते. त्यामुळं गाढवा सारखं फक्त तुमच्या passion वर फोकस करू नका , हे देखिल पहा की मार्केट तुम्हाला तुमच्या पॅशन साठी पे करेल की नाही.
● स्किल ट्रांसफॉरमेशन:
एखाद्या बिझिनेसला सुरू करण्यासाठी तुमच्याकडे त्या बिझनेससाठी लागणारे खास स्कील असणे गरजेचे नाही. आता तुम्ही म्हणाल की, स्कील नसेल तर चालेल? हो! तुमच्याकडे त्या बिझनेससाठी लागणारी स्कील नसली तरी चालेल, पण तुमच्याकडे एखादी रिलेटेड स्किल असायलाचं हवी. कारण एखाद्या रिलेटेड स्किलनेही तुमचा बिझनेस चांगल्या पद्धतीने चालू शकतो.
जसे की टीचर्स टीचिंग मध्ये परफेक्ट असतात आणि यासोबतच त्यांचे कम्यूनिकेशन देखील चांगले असते, ते स्वतःला कोणत्याही परिस्थितीशी जुळवून घेऊ शकतात. त्याचबरोबर ते वेगवेगळा इंटरेस्ट असणाऱ्या विद्यार्थ्यांत एकतेची भावना निर्माण करू शकतात. जसे त्यांच्यात एकापेक्षा जास्त स्किल्स आहेत, तसेच तुम्हाला ही रियलाईज़ होईल की, तुमच्यात देखील एका पेक्षा जास्त स्किल्स आहेत. काळजीपूर्वक विचार करून पहा, अशी कोणती स्कील आहे जिला तुम्ही दुसऱ्या स्कील मध्ये ट्रांसफॉर्म करू शकाल. जेणेकरून तुम्ही त्या Specific स्किलने तुमचा माइक्रोबिजनेस सुरू करू शकता.
● द मैजिक फार्मूला:
आपण अगोदर सांगितलेल्या २ लेसंसला यूज़ करून एक इक्वेशन बनवू शकतो, एक असा फॉर्म्युला जो तुम्हाला सक्सेस देईल.
पैशन किंवा स्किल + यूज़फुलनेस = सक्सेस
कस्टर्म्स ला काय हवंय?
इमेजिन करा, तुम्ही खूप आनंदी आहात आणि सेलिब्रेट करण्यासाठी तुम्ही रेस्ट्रोरेन्टला डिनरसाठी गेलात. तुम्ही तिथं एक प्लेट “साल्मन” ऑर्डर केले. तेव्हा शेफ तुमच्या टेबल जवळ येतो आणि म्हणतो, “साल्मन बनवणे थोडे ट्रिकी आहे, तुम्ही याला कधी बनवले आहे का?”
तुम्ही त्याला काही बोलण्याआधीच शेफ म्हणतो “मी जाऊन ऑईल गरम करतो, तोपर्यंत तुम्ही फ्रेश व्हा आणि मला किचन मध्ये भेटा.” हे इमॅजिन करायला ही किती वीयर्ड वाटते ना?
नक्कीच असा प्रसंग तुमच्यासोबत कधीच झाला नसेल. आणि होणारही कसा? कोणता शेफ तुम्हाला तुमचे जेवण स्वतः बनवायला सांगेल? कारण तुम्ही चांगल्या सर्विस आणि एटमोस्फेयर साठी रेस्ट्रोरेन्ट मध्ये जातात.
जिथे तुम्ही तुमचे पैसे खर्च करत आहात तिथे जेवणही तुम्हालाच बनवायला लागले, तर तुम्ही पैसे खर्च करून तिथे कशाला जाल, हो ना?
पण आता तुम्ही म्हणाल की या सर्व गोष्टींचा मायक्रोबिजनेसशी काय संबंध आहे? याबाबतीत आपले लेखक म्हणतात, काही ओनर्सला अशी अपेक्षा असते की कस्टमरसने स्वतःच त्यांचे जेवण तयार करावे, त्यांना वाटते की कस्टमर्सला ते आवडेल.
“एका माणसाला मासा द्या, तो एका दिवसात खाईल, परंतु त्याला मासेमारी करायला शिकवा, तो जन्मभर मासे खाईल.” या म्हणीत त्यांचा विश्वास आहे. पण इथे गोष्ट अशी आहे की, कस्टमर्स ला मासेमारी शिकण्यात काहीच इंटरेस्ट नाहीये, त्यांना फक्त त्यांची स्वादिष्ट फिश त्यांच्या प्लेट मध्ये हवी आहे.