See you at the top (Marathi)

See you at the top (Marathi)

See you at the top by Zig Ziglar

(Introduction)

राल्फ वाल्डो इमर्सन 19th century च्या मध्यात ट्रान्सजेंडलिस्ट चळवळीचे नेतृत्व करणारे एक अमेरिकन Lecturer, Philosopher, व कवी होते.  ते एकदा म्हणाले, “जे घडले आहे तो भूतकाळ आणि जे घडणार आहे तो भविष्यकाळ तितका महत्वाचा नाही.”

मग तुम्ही सांगा, तुम्ही तुमच्या जीवनात कशाला महत्व देता? तुम्हाला वाटते का, तुम्ही तुमच्या पूर्ण क्षमतेचा वापर केला आहे? तुम्ही आत्तापर्यंत तुमचा बेस्ट performance दिला आहे का? कदाचित तुमच्या मनात असा विचार येत असेल, तुम्ही जीवनात आतापर्यंत असे काहीही मिळवले नाही, जे तुम्ही deserve करता.

हे सर्व विचार तुमच्या मनात गोंधळ घालत असतील, तर ही समरी तुमच्यासाठीच आहे. बर्‍याच वेळा तुम्ही लोकांकडे पाहत असाल आणि स्वतःला विचारत असाल “मी कधी असं बनू शकेल का?… माझ्याकडे हे किंवा ते असते तर मी यशस्वी झालो किंवा झाले असते.”

पण खरं सांगायचे झाले तर, ही खूप नकारात्मक विचारसरणी आहे. आत्ता, याक्षणी, तुमच्याकडे ते सगळं आहे जे तुम्हाला यशस्वी होण्यासाठी आवश्यक आहे. कारण तुमच्याकडे तुम्ही स्वतः आहात आणि ते सगळं आहे जे तुम्हाला उच्च स्थानी घेऊन जाऊ शकेल.

एका वयस्कर माणसाला त्याच्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणी  समजते की, ज्या घरात तो इतक्या वर्षांपासून राहत होता, त्या घराखाली एक सोन्याची खाण आहे. ज्याच्या जवळ सोन्याची खान असेल तो जीवनात किती श्रीमंत असेल, हो ना? पण त्या माणसाला त्या खजिन्याची काहीच कल्पना नव्हती.

त्याने आपले संपूर्ण आयुष्य त्या घरात, गरीबीत घालवले. जर त्याला आधीच त्या खजिन्याबदल समजले असते, तर त्याचे आयुष्य किती सुखात गेले असते. पण मरताना ही गोष्ट कळून काय फायदा.

मित्रांनो,या गोष्टी मधून आपण काय शिकू शकतो? आपल्या सर्वांमध्ये अशीच एक सोन्याची खान असते, तिला योग्य वेळेत ओळखणे खूप गरजेचे आहे. म्हणून, तुम्ही त्या वृद्ध माणसासारखे होऊ नका.  तुमच्यातील त्या सोन्याच्या खाणीस ओळखा. म्हणजेच तुमच्यात असणाऱ्या क्षमतेस योग्य वेळेतच (वेळीच) ओळखा.

या पुस्तकाच्या सारांशचे उद्दीष्ट तुमच्या आत लपलेल्या पोटेंशियलचा वापर करणे आहे, तेचं तुम्हाला कृती  करण्यात मदत करेल. ही समरी तुम्हाला क्षमता वाढविण्यासाठी प्रेरणा देईल. जेणेकरुन तुम्ही आणि तुमच्या सभोवतालचे लोक अधिक चांगले जीवन जगू शकाल.

असे समजा तुम्ही सर्वात शेवटच्या स्टेप वर उभे आहात आणि टॉपला पोहोचू इच्छित आहात. टॉपला एक दरवाजा आहे जो येणाऱ्या उद्याचा आहे आणि या दारामागे सुख, शांती, संपत्ती, सुरक्षा, चांगले आरोग्य आणि बर्‍याच संधी आहेत.

नक्कीच तुम्हाला देखील या दारा पर्यंत पोहचायचे आहे, पण तिथे जाण्यासाठी कोणतीही लिफ्ट नाही, अन्य कोणताही शॉर्टकट देखील नाही. तुम्हाला स्वतः स्टेप्सवर चालावे लागेल. तरचं तुम्ही तिथे पोहोचू शकाल. म्हणूनच, तुम्हाला एक एक स्टेप चढणे शिकावे लागेल.

पहिली स्टेप म्हणजे self image ची आहे. दुसरी स्टेप म्हणजे इतरांशी असलेल्या आपल्या नात्याची आहे. तिसरी स्टेप म्हणजे लक्ष्य. चौथी स्टेप आहे दृष्टीकोन/attitude आहे. पाचवी स्टेप काम आणि शेवटची सहावी पायरी म्हणजे इच्छा/ desire. तर आता पहिले पाऊल उचलण्याची वेळ आली आहे.

तुमचा प्रवास आजपासूनच सुरू होत आहे. कचर्‍याप्रमाणे नकारात्मक विचार फेकून द्या. तुमच्या आत एक सोन्याची खाण आहे, एक दयाळू, हुशार व यशस्वी व्यक्ती तुमच्यात लपून आहे, परंतु तुम्ही टॉपला का पोहोचू शकत नाही? यामागचे कारण हे आहे की, तुम्ही आणखीनही नकारात्मक विचारास सोडले नाही.

एक म्हण आहे “तुम्ही जिथे आहात तिथे यामुळे आहात, कारण तुमचीच तिथे राहण्याची इच्छा आहे.” या म्हणीला मी थोडं अजून elaborate करते. कधी कुणाचा हृदय भंग होतो, कधी कुणाला जीवनात अनेक तडजोडी कराव्या लागतात किंवा कधी कुणाचे मित्रांसोबत आणि नातेवाईकांसोबत मतभेद असतात.

तर  मग काय वाटतं? या सगळ्यांना आयुष्यात हेच हवं होतं का? तुमचं उत्तर नाही असेल पण विश्वास ठेवा की नका ठेऊ, या मागील खरं कारण  म्हणजे त्यांचे विचार, त्यांचे नकारात्मक विचारच आहेत. अगदी लहानपणापासूनच आपल्याला जीवनाबद्दल नकारात्मक विचार सांगितले जातात.

ते आपल्याला असे काहीतरी सांगतात, “तुम्ही केवळ हेच करू शकाल किंवा तुम्ही केवळ हेच होऊ शकाल पण वास्तविकतेमध्ये असे नाही. लोक तुम्हाला कितीही डिसकरेज करोत, तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवू नका.

तुमचे बैकग्राउंड काय आहे, हे महत्त्वाचे नाही, परंतु तुमचे या सुंदर जीवनात ध्येय काय आहे आणि ते ध्येय पूर्ण करण्यासाठी तुम्ही काय करीत आहात हे महत्त्वाचे आहे.

बरेच लोक त्यांच्या समस्यांसाठी पालकांना दोषी ठरवतात किंवा नातेवाईक, बॉस किंवा कम्यूनिटीला शिव्या देत असतात. तुम्ही मात्र हे करू नका.

एका शहरात, एक मोठी कचराकुंडी होती. 100 वर्षे लोकं त्यांचा सगळा कचरा तिथेच टाकत राहिले, कचरा वर्षानुवर्षे जमा होत राहिला. आणि मग एक दिवस, काही प्रोग्रेसिव लोकांना त्या कचर्‍यामध्ये काहीतरी वेगळे दिसले.

जेव्हा लोकांचा व्ह्यू पॉईंट बदलला, तेव्हा लोकांनी तेथील कचर्‍याऐवजी मोठे शॉपिंग सेंटर पहायला सुरुवात केली. मग पुढे, लोकांनी तेथे कचरा टाकणे थांबवले आणि त्या जागेला मातीने भरण्यास सुरूवात केली.

तेथे एक चांगला पाया तयार होईपर्यंत ते माती भरत राहिले. काही वर्षातच तिथे, कचराकुंडीच्या ऐवजी शहरातील सर्वात मोठे शॉपिंग कॉम्प्लेक्स उघडले. ज्यात मोठी चमकणारी दुकाने सुरू झाली आणि तिथे सर्व प्रकारच्या वस्तू मिळू लागल्या.

त्या ठिकाणीहून जाताना लोकं नाक बंद करायचे. ते ठिकाण आता शहरातील सर्वात सुंदर ठिकाण बनले. हे कसे घडले!  हे सर्व घडले कारण लोकांनी त्यांचे जुने विचार सोडून नवीन विचार करण्यास सुरुवात केली.

तुम्हीही तुमच्या भूतकाळाच्या कचऱ्यातूनच फिरत आहात. पण त्याचा काही एक फायदा नाही, म्हणून आजपासून, आपल्या जीवनाचा पहिला दिवस समजून नवीन सुरुवात करा.

द ब्लैक बलून (The Black Balloon)

आम्ही आधीच सांगितल्याप्रमाणे, तुमच्याकडे यशस्वी होण्यासाठी जे आवश्यक आहे, ते सगळं काही आहे. तुम्ही यशस्वी होण्यासाठीच बनले आहात. तुमचे यश आणि तुमची dream life तुमच्यापासूनचं सुरू होते. स्वत:वरचा विश्वास कमी होवू देऊ नका.

स्वतःला कोणतेही excuses देऊ नका. कधीतरी तुम्हाला जीवनात मोठा ब्रेक मिळेल, अशा त्या दिवसाची वाट पाहत बसू नका. तुमच्या क्षमतेवर विश्वास ठेऊन तर  पहा, तुमच्या स्वप्नातील आयुष्य तुमच्या पायाला लोटांगण घालत असेल.

न्यूयॉर्क शहरात एक माणूस बलून (Baloon) विकत असे. जेव्हा त्याचे बलून विकले जात नव्हते, तेव्हा तो ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी हवेत एक बलून उडवून द्यायचा. हवेत उडणारा बलून पाहून, लोकं त्याच्याकडे बलून घेण्यासाठी येत असे. तो माणूस नेहमीच वेगळ्या रंगाचा बलून उडवत असे.

कधी पांढरा, कधी लाल किंवा कधी पिवळा. एक दिवस एक छोटा निग्रो मुलगा त्याच्याकडे आला. त्याने बाही वर केल्या आणि त्या बलून विकणाऱ्याला विचारले “तुम्ही काळा (ब्लॅक) बलून सोडला तर तोही उडेल काय? बलून विकणाऱ्या व्यक्तीने उत्तर दिले, “मुला, बलून मधील हवा बलूनला उंच घेऊन जाते बलूनचा कलर नाही.

नेहमी लक्षात ठेवा, तुम्ही आयुष्यात जे काही आहात, जिथे कुठे आहात, त्यामुळे काही फरक पडत नाही. मग फरक कशामुळे पडतो? जेव्हा तुमच्यात असं काय आहे जे तुम्हाला जीवनामध्ये सर्वात वरच्या स्थानावर घेऊन जाईल हे तुम्हाला माहीत असेल.

तर चला, स्टेप बाय स्टेप पाहुया….

द फर्स्ट स्टेप: सेल्फ इमेज (The First Step: Self-Image)

शिखरावर पोहोचण्याचा प्रवास हा तुमच्या आतूनच सुरू होतो. हे इतके सोपे नाही, पण हे खरं आहे. जर तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवत नसाल, तर इतरांनी तुमच्यावर विश्वास ठेवावा, अशी अपेक्षा तुम्ही का ठेवावी? सगळ्यात अगोदर, तुम्हाला तुमच्या negative सेल्फ इमेजपासून मोकळे व्हावे लागेल आणि एक Positive इमेज तयार करावी लागेल.

स्वतःला वेगळ्या दृष्टीकोनातून पहा. अशी कल्पना करा की, तुमचे मित्र असे काहीतरी बोलत आहेत, “मित्रा, मी तुला त्रास देऊ इच्छित नाही, आणि मी पैशासाठी किंवा इतर कोणत्याही मागणीसाठी कॉल केला नाही, मी फक्त सांगू इच्छित आहे, तू एक Amazing व्यक्ती आहेस.

तू तुझ्या career साठी आणि लोकांसाठी बरेच काही करत आहेस. मला तुझी मैत्री आवडते, कारण मी जे काही करतो त्यामध्ये तू मला माझे बेस्ट देण्यास Motivate करतोस व मला Inspire करतोस.

तू एक चांगला मित्र आहे, ज्यामुळे मला encouragement मिळते. हे बोलण्यासाठीच मी कॉल केला आहे आणि लवकरच भेटू अशी आशा करतो.” आता हे शब्द ऐकल्यानंतर कोणाला छान वाटणार नाही?

तुमचे मित्र तुमच्यामध्ये काय positive पहातात हे तुम्हाला कळेल. अचानक तुमचा आत्मविश्वास वाढेल. तुम्हाला असे वाटेल की, तुम्ही बरेच काही करू शकता आणि एकदा का तुमची image improve झाली की performance  देखील आपोआप सुधारला जाईल.

परंतु कधीकधी असे घडते, तुम्ही मुळीच मोटिवेटेड फील करत नाही. तुम्हाला असं वाटतं, मी यापेक्षा अधिक achive करू शकणार नाही. ही माझी लिमिट आहे. जेव्हा जेव्हा तुम्ही असा विचार करता, तेव्हा तुम्ही स्वत:पासूनच डोळे चोरुन घेत असता. म्हणून आपले लेखक म्हणतात, स्वतःकडे Positive दृष्टीकोनातून पहा

Emmanuel Ninger नावाचा एक टॅलेंटेड पेंटर होता. 1880 मध्ये तो खूप लोकप्रिय झाला होता.   तो त्यांच्या पोर्ट्रेटसाठी (portraits) नव्हे, तर बनावट डॉलरच्या नोटांसाठी खूप लोकप्रिय झाला होता. एकदा इमॅन्युएल स्थानिक किराणा दुकानातून एक टर्निप घेत होता.

त्याने कैशियरला 20 डॉलरची नोट दिली. कैशियरने पाहिले की, पैसे घेताना त्याच्या बोटावर शाई होती, पण त्याने जास्त लक्ष दिले नाही आणि पैसे घेतले. अर्थातच, इमॅन्युएल हा एक वेगळ्या प्रकारचा कलाकार होता, पण तो फसवणूक करू शकेल असा नव्हता.

कैशियरने उरलेले पैसे वजा केले आणि उर्वरित पैसे इमॅन्युएलला परत केले. नंतर जेव्हा त्यांनी ती नोट तपासली, तेव्हा त्यांना वास्तव कळले.

त्याने तातडीने पोलिसांना बोलवले. त्यावेळी 20 डॉलर्स मोठी रक्कम होती. ती नोट एका पोलिस कर्मचा-याला अस्सल वाटतं होती, पण दुसरा confused झालता, कारण त्या नोटची शाई त्याच्या हाताला लागली होती.

त्यांनी सर्च वॉरंट जारी केले आणि इमॅन्युएलच्या घरी पोहोचले. तेथे पोलिसांनी जे काही पाहिले, ते पाहून पोलिस आश्चर्यचकित झाले.

त्यांना एका खोलीत 20 डॉलरच्या बनावट नोटा दिसल्या. इमॅन्युएल एक कुशल कलाकार होता, तो इतका तज्ज्ञ होता की, त्याने 20 डॉलरच्या अशा  बनावट नोटा बनविल्या, ज्याला पाहून कोणीही फसेल.

त्याच दिवशी इमॅन्युएलला अटक करण्यात आली. या वादामुळे, त्याच्या प्रत्येक portraits/ painting चा दर 5,000 डॉलरहून 16,000 डॉलर पर्यंत वाढला.

पण जर इमॅन्युएलने अधिक पोर्ट्रेट तयार करण्यासाठी इतका वेळ खर्च केला असता आणि मेहनत केली असती, तर तो खूप पैसा कमवू शकला असता. कदाचित तो याहूनही अधिक यशस्वी झाले असते.

पण इमॅन्युएलने आपली extraordinary कला फ्रॉड कामासाठी वापरली. कदाचित तुमच्या आयुष्यात अशी एखादी वेळ आली असेल, जेव्हा तुम्हाला तुम्ही अनप्रोडक्टिव आहात, असे फील केले असेल.

आपल्या सगळ्यांच्या बाबतीत असे घडते की, जेव्हा आपल्या वाईट सवयी आणि negative विचार आपल्यावर अधिकार गाजवू लागतात, तेव्हा आपल्याला वाटते आपण खूपच average आहोत.

या भावना बदलणे आपल्या हातात आहे. कारण तुम्ही चोर बना किंवा जीनियस, हे केवळ तुमच्या निवडीवर अवलंबून आहे. त्याउलट, जेव्हा तुम्ही स्वत:ला आश्चर्यकारक काहीही करू शकणारे एक व्यक्ती समजाल, तर आपोआपच तुमची performance improve होवू लागते.

तुम्ही इच्छित असाल, तर तूम्ही नक्की प्रयत्न करून पहा. जेव्हा तुम्ही छान फील कराल तेव्हा तुमच्यासोबत असणाऱ्या लोकांचेही जीवन सुधरायला लागेल.

SHARE
Subscribe
Notify of
Or
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments