Deep Work: Rules for Focused Success in a Distracted World (Marathi)
Deep Work by Cal Newport
समरीला सुरुवात करण्याआधी तुमच्यासाठी एक प्रश्न, या समरीला वाचून किंवा ऐकून exactly तुम्ही काय शिकणार आहात? तर याच उत्तर आहे की, Deep Work ची समरी वाचून तुम्हाला हे समजेल की, आजकालचे प्रोफेशनल लोकं कशाप्रकारे क्वॉलिटी ऐवजी क्वांटिटीवर भर देतात, आणि कशाप्रकारे या गोष्टीमुळे लोकं कठपुतळीसारखे झालेत.
अनेक लोक एकावेळेस वेगवेगळे प्रोजेक्ट्स आटोपण्याच्या चक्करमध्ये मल्टिटास्किंग करू लागतात. ज्यामुळे त्यांच्या कामात क्वॉलिटी म्हणजेच डीप वर्क नसते. Deep work म्हणजे कोणत्याही distractions शिवाय काम करणे.
याचाच अर्थ असा ही होतो, आजकालच्या प्रोफेशनल लोकांना आपल्या प्रायोरिटीज सेट करायला हव्यात. या पुस्तकाचे लेखक, कल न्यूपोर्ट(Cal Newport) जे MIT मधून शिकले आहेत त्यांचेदेखील हेच म्हणणे आहे की, कॉर्पोरेट रेसपासून स्वतःला वाचवायचे असेल ना,
तर तुम्ही टेक्नॉलॉजी आणि सोशल मिडिया पासून एक ब्रेक घेतला पाहिजे आणि स्वतःला क्वॉलिटी टाईम दिला पाहिजे ज्यामुळे तुम्हाला एकांतात सेल्फ Examination करण्याची संधी मिळेल आणि तुम्ही तुमच्यातील कमींना ओळखून स्वतःच्या इम्प्रोवमेंटवर लक्ष देऊ शकाल.
असं आहे ना, की हे deep work खूप important आहे. लक्षात ठेवा, डीप वर्क हे केवळ Distraction मधून बाहेर पडण्यासाठीच नव्हे तर इतर अनेक गोष्टींसाठी फायदेशीर आहे. कारण deep work तुम्हाला कमीत कमी वेळेत पॉईंट A पासून पॉईंट ब कडे घेऊन जाऊ शकते.
तर ही समरी दोन पार्ट मध्ये divide केली आहे
पहिला part आहे: द आईडिया, ज्यात ३ chapter आहेत. तर चला पाहुयात आपला पाहिला chapter, जिथं आपल्याला समजेल डीप वर्क महत्त्वाचे का आहे?
जर तुम्हाला समाजात तुमचे एक महत्त्वाचे स्थान बनवायचे असेल तर तुम्हाला या दोन गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील.
पाहिली तर, कठिण गोष्टी शिकण्याची क्षमता.आणि दुसरी आहे, कोणतेही महत्त्वाचे काम क्वॉलिटी आणि स्पीडने पूर्ण करण्याची क्षमता.
उत्तम क्वॉलिटीचे काम अचीव करण्यासाठी आपण एक इक्वेशन वापरू, जे खालीलप्रमाणे आहे,
हाई क्वालिटी वर्क प्रोड्यूसड = (टाइम स्पेंट) x (इन्टेसिटी ऑफ़ फोकस)
म्हणजे जर तुम्हाला हाय क्वॉलिटीचे काम करायचे असेल तर त्यावर जास्त वेळ घालवा किंवा तुमचे फोकस वाढवा. वेल रेकग्नाइज्ड शाळेच्या टॉपर स्टुडंट्सना हे आधीपासूनच हे इक्वेशन माहित आहे त्यामुळे ते त्यांचे फोकस वाढवून कमी वेळातच क्वॉलिटी वर्क प्रोड्युस करतात.
पण कोणतंही फोकस्ड वर्क करण्यासाठी आपण मल्टिटास्किंग सोडून डीपली ते एकच काम करणं गरजेचे आहे पण आपल्या आजच्या जीवनात मल्टीटास्किंग हे एक रूटीनच बनत चाललंय. म्हणजे सवयच पडून गेलीय… आता सोफी लीरॉय यांनाच घ्या. ही एक रिसर्चर आहे जी म्हणते की 'अटेंशन रेजिड्यू' नावाची एक गोष्ट असते.
जेव्हा टास्क A फिनिश केल्याशिवाय तुम्ही टास्क A वरून टास्क B वर जाता तेव्हा तुमच्या मनात टास्क A बद्दलचा विचार चालू असतो. आणि रेजिड्यू जेवढा तीव्र असेल तेवढा त्याचा तुमच्या टास्क B वर वाईट परिणाम होतो. पण जेव्हा तुम्ही डीपवर्कची टेक्निक शिकाल (जी या समरीमध्ये दिली आहे) आणि ती तुमच्या लाईफमध्ये वापराल, तेव्हा तुम्ही कमी वेळातच उत्तम क्वॉलिटीचे काम प्रोड्युस करू शकाल.
तर चला, यासोबतच पुढे जाऊया चॅप्टर दोन कडे: ज्यात सांगितलं आहे, डीपवर्क रेयर असते.
टॉम कोह्र्रेन हे एका company चे owner होते. त्यांनी पाहिले की रोज त्यांचा दीड तास तर ईमेल्स पाहण्यात आणि त्यास रिप्लाय देण्यातच जातो.
तेव्हा त्यांनी विचार केला की माझ्या या कामाचा कंपनीवर काय इफेक्ट पडतो? या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी त्यांनी सेंट ईमेल्स, टायपिंगची स्पीड, रिडींग स्पीड आणि कर्मचाऱ्यांचा पगार इत्यादींची डिटेल्स जमा केली आणि एनालिटिकल सिस्टम मधून त्याचे analysis केले, तर त्यांना समजले की ईमेल वाचणे हे प्रत्येक कामगाराच्या हिशोबाने 95 सेंट्सला पडते.
त्यांना कळाले की, ईमेल ला reply करताना, त्याचा इफेक्ट त्यांच्या company वर ही पडत आहे, म्हणून त्यांनी डीप work म्हणजेच थोडे ही distractions न होता, पूर्ण concentration ने तेचं काम करायचे ठरवले, ज्याने company ला फायदा होईल.
आजकाल फेसबुक सारख्या बहुतेक कंपन्या “द हॉल” चा कंसेप्ट वापरत आहेत, ज्यामध्ये एक ओपन स्पेस ऑफिस असते आणि प्रत्येक कर्मचाऱ्याला एक वेगळे केबिन दिले जाते. ज्यामुळे ते एकमेकांशी कम्युनिकेट करतील आणि आपल्या आयडिया शेअर करू शकतील. पण यामुळे त्यांच्या कामात व्यत्यय येऊ शकतो, कारण हे त्यांना त्यांच्या डीपवर्क झोनपासून लांब ठेवते.
बहुतेक एम्प्लॉयीज एकावेळी अनेक काम करतात. ज्यामुळे त्यांना असे वाटते की, ते खूप काम करत आहेत. तसेच आजकाल तर एक ट्रेंडच आहे, जे काम इंटरनेटशी रिलेटेड आहे ते प्रॉडक्टिव समजलं जाते. या सर्व गोष्टींमुळे डीपवर्क रेयर होतं चालले आहे. तुमच्यासाठी ही एक चांगली गोष्ट आहे कारण जो डीपवर्क करतो तो कुणाशीही स्पर्धा करू शकतो व सोबत काम करणाऱ्यांना सहज मागे पाडू शकतो.
तिसरा चॅप्टर : डीपवर्क मीनिंगफुल आहे
रिक फ्यूरर हा एक लोहार आहे. प्राचीन आणि मध्ययुगीन धातू कामात तो तज्ञ होता. जर त्याला तलवार बनवायची असेल तर त्याला ती बनवायला पूर्ण 8 तास लागायचे. कारण या कामात हातोडीचा घाव ब्लेडच्या एका विशिष्ट पॉइंटवरच पडायला हवा.
यामुळे अशा प्रकारच्या कामात खूप जास्तं कॉन्स्ट्रेशनची गरज लागते. हे काम करतांना कोणत्याही प्रकारचे डिस्ट्रॅक्शन नाही झाले पाहिजे. कोणत्याही गोष्टीवर, तुमचे लक्ष केंद्रीत करण्याच्या क्षमतेचा, मोठ्या प्रमाणात परिणाम होतो आणि यामुळे तुमची एक्स्पीरियंस लेव्हल देखील वाढते.
Laura Carstensen's स्टॅनफोर्ड university मध्ये psychology आणि पब्लिक पॉलिसीच्या professor आहेत. त्या नेहमी त्यांच्या पेशंटच्या मेंदूची ॲक्टिविटी समजून घेण्यासाठी एमआरआई स्कॅनरचा वापर करतात.
मेंदूचा एक भाग आहे, ज्याला एमिग्डाला असे म्हणतात, तो भाग पॉजिटिव्ह आणि निगेटिव्ह इमेजेसवर कशाप्रकारे इमोशनली रिऍक्ट करतो हे त्यांना जाणून घ्यायचे असते. त्यांनी पाहिले की वयाने छोटे पेशंट्स दोन्ही फोटोंनी अफेक्टेड होतात, तर मोठे पेशंट्स फक्त पॉजिटिव्ह फोटोंनी अफेक्टेड होतात.
पण यातून हे प्रूव्ह होत नाही की, मोठे लोकं जास्तं सुखी आहेत म्हणून त्यांना पॉजिटिव्ह इमेजेस जास्तं आवडली, खरंतर त्यांचा मेंदू एक प्रकारे रीवायर्ड झाला होता, जो त्यांना निगेटिव्हपेक्षा पॉजिटिव्ह गोष्टींचे कौतूक करण्यासाठी प्रेरित करत.
अशा लोकांनी आपलं लक्षकेंद्रित करून त्यांच्या आयुष्यात काही प्रमाणात सुधारणा केली आहे, आणि हे सर्व बाह्य बदलातून नव्हे तर त्यांनी विचारांमध्ये केलेल्या बदलांमुळे शक्य झाले. तसेच हे पण सिध्द झाले की, इमेल, कोणत्या जुन्या मित्रांना भेटणे किंवा ऑफीस पॉलिसीजवर बोलणे यांसारख्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला पॉजिटिव्ह वाटतात.
पण हे सर्व मिळून आपल्या डोक्यामध्ये एक इमेज तयार होते ज्यावरून तुमची लाईफ किती स्ट्रेसफुल, फ्रस्टेटिंग आणि डिप्रेसिंग आहे असे वाटते. आणि यामुळेच या सर्व लहान-लहान गोष्टींवर तुमचं लक्ष विभाजले जाते. त्यामुळे नेहमी तुमचे टार्गेट काळजीपूर्वक सेट करा आणि त्यावर तुमचे पूर्ण लक्षकेंद्रित करा. थोडक्यात तुम्ही सगळ्यात बेस्ट अशी, फोकस्ड लाइफ जगण्याचा प्रयत्न करायला हवा.
(Chick-san-mehaaye) Csikszentmihalyi, हे एक मानसशास्त्रज्ञ आहेत, ज्यांनी ईसीएम् – एक्स्पेरियन्स सेम्पलिंग मेथड ही एक असे टेक्निक जे एखाद्या खास क्षणी आपल्या भावना रेकॉर्ड करते.
त्यांनी या ईसीएमच्या सहाय्याने हे सिध्द केले की, बेस्ट मुवमेंट तेव्हा सामान्य होतात जेव्हा कोणत्याही व्यक्तीचे शरीर आणि मन हे एखादी कठिण आणि मौल्यवान गोष्ट मिळवण्यासाठी स्वतः पूर्णपणे तयार/फोकस्ड असते, आणि तेव्हाच तो सर्वात जास्त आनंदी असू शकतो.
याच मानसिक स्थितीला “फ्लो” असे म्हणतात, ज्यावर एक पुस्तकही लिहिले गेले आहे. इथेच आपला पार्ट 1 the idea संपतो…