12 Rules for Life (Marathi)

12 Rules for Life (Marathi)

समरी : 12 रूल्स फॉर लाइफ  (12 Rules for Life)
जॉर्डन पीटरसन द्वारे  (By Jordan Peterson)

परिचय

तुमचे जीवन डिसऑर्डर, कंफ्यूज़न, कधीच न संपणारे प्रॉब्लेम्सस अशा कित्येक अडचणींनी ग्रस्त झाले आहे का? तुम्ही प्रत्येक दिवशी यातच स्वतःला अडकलेलं फील करता का? तुम्ही कामात नेहमी वैतागलेले असतात का? तुम्हाला असं वाटतं का, तुमची नाती खराब होत चालली आहेत? जर तुमचे उत्तर हो असेल तर हे पुस्तक तुमच्यासाठी आहे.

या पुस्तकात बारा रुल्स दिले आहेत. जे तुम्हाला तुमच्या जीवनात सुव्यवस्था आणण्यासाठी मदत करतील. हे तुम्हाला तुमच्या अडचनीपासून आणि त्रासापासून मुक्त करण्यासाठी मदत करतील. तर चला, एक एक करून या रुल्स ला पाहुयात.

स्टैंड अप स्ट्रैट विथ योर शोल्डर्स बैक (Stand Up Straight With Your Shoulders Back)

तुम्हाला कधी हरून गेल्यासारखं वाटल का? तुम्हाला असं वाटतं का जीवन खूप unfair आहे? अडचणींच्या ओझ्याखाली तुम्ही दबून गेलाय का? अशा मनस्थितीत तुम्ही शरीराचं कधी निरीक्षण केलय? बघा, तुमची मान कशी खाली झुकलेली असते, खांदे पडलेले असतात, पाठीला पोक आलेले असते.

कारण मनाला झालेली जखम दिसत नसली तरी त्या जखमेची लक्षणे तुमच्या posture मधून दिसून येतात. मन हे अवयव नसले तरी, मानसशास्त्रा नुसार तुमच्या मनाचा आणि तुमच्या शरीराचा घनिष्ट संबंध आहे.

या बाबतीत या पुस्तकाचे लेखक जॉर्डन पीटरसन (J P) एक मोलाचा सल्ला देतात. त्यांच्या म्हणण्यानुसार, तुम्ही जास्त वेळ या posture मध्ये राहू नका. कारण ज्याप्रमाणे मनाची जखम तुमच posture बदलवते, तसेच तुमच चुकीच posture ही मनावर घाव घालते.

म्हणूनच लेखक म्हणतात, तुमच posture तुम्हाला अजून depressed करेल. ह्याऐवजी तुमच posture जर चांगलं असेल तर तुम्हाला आपोआपच छान वाटायला लागले.

तेव्हा हे करून पहा! मान सरळ ठेवा, ताठ उभे रहा, खंद्यांमध्ये बळ आणा, लांब श्वास घ्या. चेहऱ्यावर स्मित हास्य आणा. एक योग्य पोस्चर आणि चेहऱ्यावरील स्मित हास्य तुमच्या शरीरात सेरोटोनिन नावाच्या हार्मोन ची लेव्हल वाढवत.

सेरोटोनिन “हॅप्पी” हार्मोन आहे. ते तुमच्या नसांना आराम देते, त्यांना रिलॅक्स करायला मदत करते. ते तुमच्या इम्मुनिटीला ही स्ट्राँग बनवते. ह्या हार्मोनच्या योग्य प्रमाणामुळे मनात चांगले विचार येतात.

जनावरांमध्येही एक योग्य पोस्चर मनुष्याप्रमाणेच महत्वाच असत. कारण त्यांनाही मन असते. आणि आपल्या प्रमाणेच त्यांच्या पोस्चर चा परिणाम त्यांच्या मनावर होत असतो.

हे नीट समजून घ्यायला लॉबस्टर च intresting उदाहरण पाहूया. लॉबस्टर म्हणजेच ( केकडा / झींगा ) खेकड्याबद्दल बोलूया. एक योग्य पोस्चर असणाऱ्या खेकड्याच्या शरीरामध्ये सेरोटोनिन च प्रमाण खूप जास्त असते. जसे की आपण पाहिले हे एक हॅप्पी हार्मोन आहे, जे खेकड्याच्या मनाला हॅप्पी ठेवते. आत्मविश्वास असलेला असा खेकडा सहजरित्या शिकार करू शकतो.

पण, एक अयोग्य posture असलेला खेकडा नेहमी कमजोर असतो. त्याच्या शरीरामध्ये सेरोटोनिन च प्रमाण कमी असते. ह्यामुळे कमी आत्मविश्वास असणाऱ्या अशा खेकड्यास, शिकार करणे ही अवघड जाते. तो कधीच जास्त काळासाठी जगु शकत नाही. माणूसही या कोड्यात खेकड्या सारखाच असतो.

चांगले दरवाजे तुमच्यासाठी उघडे तेव्हाच असतील जेव्हा तुमचे विचार पोसीटिव असतील. एक बरोबर पोस्चर आणि चेहऱ्यावरील स्मित हास्य मनात पोसीटिव विचारास जन्म देत असते.

TO READ OR LISTEN COMPLETE BOOK CLICK HERE

ट्रीट योरसेल्फ लाईक समवन यू आर रेस्पोंसीबल फॉर हेल्पिंग (Treat yourself like someone you are responsible for helping)

तुम्ही किंवा तुमच्या जवळचे कोणी आजारी पडल्यावर तुम्ही काय करता, याच कधी निरीक्षण केलं आहे का?
काही लोक अशी असतात जे थोड आजारी पडले तरी लगेच डॉक्टरांकडे जातात. काही अशी असतात जे डॉक्टरांने सांगितलेले पथ्य पाळत नाहीत, दिलेले औषध वेळेवर घेत नाहीत.

काही लोक पैसे नसल्याने औषध विकत घेऊ शकत नाहीत. आणि काही तर केवळ जिद्दी असतात, त्यांना वाटत आजारपण तसेच ठीक होऊन जाईल, त्यासाठी औषध घेण्याची काय गरज आहे. काहींना वाटत आपण मोठे झालो आहोत औषध तर लहान मुलं घेतात.

आपण पाळलेल्या जनावरांची किती काळजी घेतो जेव्हा ती आजारी पडतात. त्यांना डॉक्टरांकडे घेऊन जातो. त्यांना वेळेवर औषध देतो. आहे ना आश्चर्याची गोष्ट! आपण आपल्या अरोग्यापेक्षा जास्त कळजी त्यांच्या आरोग्याची घेतो. आणि अगदी असेच होते जेव्हा कोणी आपले आजारी पडते.

आपण त्यांना औषध घेण्याचे आठवण करून देत असतो तसेच त्यांना औषध घेण्याआधी जेवायला लावत असतो. किती कळाजी असते ना आपल्याला, जेव्हा आपली एखादी व्यक्ती आजरी पडते!

यातून तुम्ही काय शिकलात? आपण दुसऱ्यांची काळजी घेतो, पण स्वतःची नाही. तुम्हाला स्वतःवरही तेवढेच प्रेम करायला शिकायला हवं जेवढे तुम्ही तुमच्या कुटुंबावर आणि तुमच्या जनावरांवर करता. स्वतःचीही काळजी घ्या. स्वतःचे मूल्य समजायला सुरुवात करा. डॉक्टर ने दिलेल्या सल्यांना फॉलो करा.

हाइजीन ला तुमच्या जीवनाचा भाग बनवा. हेल्दी जेवण तुमच्या डायटमध्ये घ्या. चुकीच्या सवयी पासून स्वतःला लांब ठेवा. स्वतःच्या माईंड मध्ये नेहमी पॉझिटिव्ह विचार ठेवा आणि नेहमी काही ना काही शिकत राहा. आपल्या माईंड ला नेहमी ॲक्टिव ठेवा.

जर तुम्ही स्वतःवर कंट्रोल करायला आणि स्वतःला शिस्त पाळायला शिकवले तर विचार करा तुमचे जीवन किती बदलून जाईल. तुमचे जीवन किती सूव्यवस्थित होऊन जाईल.

जर तुम्ही हेल्दी आणि आनंदी असाल तर त्याचा पॉझिटिव्ह परिणाम तुमच्या जीवनाच्या प्रत्येक भागावर पडेल. असे मित्र बनवा ज्यांना, तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या चांगल्या गोष्टींना पाहून, मनापासून आनंद होईल.

या पुस्तकाचे लेखक जॉर्डन एका छोट्या टाऊन मध्ये वाढले होते. त्यांचा एक मित्र होता. ज्याचे नाव एड होते. जो खूप इंटेलिजंट आणि स्मार्ट होता. परंतु तो एक रागीट आणि निगेटिव्ह विचार करणारा टीनएजर बनला होता.

जॉर्डन ने कॉलेज जॉईन केले पण एड ड्रग्स च्या आहारी गेला. तो अशा मित्रांसोबत वेळ घालवू लागला ज्यांनी स्कूल कॉलेज ला मध्येच सोडून दिले होते. जॉर्डन त्याला मदत करण्यासाठी काहीच करू शकत नव्हते.

एक दिवस, एड जॉर्डन ला भेटायला त्याच्या कॉलेजच्या अपार्टमेंट मध्ये गेला. जॉर्डन ने त्याचे स्वागत केले. पण एड एकटाच नव्हता, त्याच्यासोबत त्याचा मित्र कार्ल होता. जॉर्डनला त्यांना पाहिल्यावरच समजले की ते दोघेही ड्रग्स च्या नशेमध्ये आहेत.

कार्ल खाली बसला आणि वरच्या सीलिंग ला पाहत असताना, नशेच्या अवस्थेत तो म्हणाला  “माझे शरीर वरती हवेमध्ये तरंगत आहे”. हे दृश्य पाहून जॉर्डनला खूप विचित्र वाटले. शेवटी, जॉर्डन ने एड ला दुसऱ्या बाजूला नेऊन त्यांना तेथून जाण्यासाठी सांगितले.

एड ने मान हालवली. कदाचित केवळ लॉयल्टी मुळे तो कार्ल सोबत फिरत होता. पण हे नेहमी लक्षात ठेवा की, जे नशा करतात, आळशी आहेत, आणि जीवनामध्ये ज्यांचे काहीच ध्येय नाही अशा लोकांसोबत राहणं आपल्याला त्यांच्या सारख्या वाईट सवयी लावू शकते. शेवटी, तुम्हाला अशा लोकांची सोबत हवी आहे की नाही ही तुमचीच choice आहे.

याऐवजी तुम्ही अशा लोकांसोबत राहणं choose करू शकता जे पॉझिटिव्ह विचार ठेवणारे आहेत. जे तुम्हाला जीवनामध्ये पुढे जाण्यासाठी इन्स्पायर करतील. चांगल्या लोकांची कंपनी ठेवून तुम्ही स्वतःला त्यांच्यासारखे positive बनवाल, उच्च ध्येय ठेवाल आणि ध्येय प्राप्ती करण्यासाठी नेहमी motivate राहाल.

जीवनामध्ये ध्येय असणे खूप गरजेचे आहे, कारण “रिकामं डोकं भुताच माहेरघर असते”. प्रत्येक दिवस बदलण्याची एक नवीन संधी घेऊन येत असतो. तुमच्या भूतकाळाबद्दल विचार करण सोडून द्या आणि  पुढे चालत राहा. चांगल्या मित्रांची सोबत तुम्हाला जीवनाचा अर्थ समजण्यासाठी मदत करेल. जर तुम्ही या बदलांना स्वीकारत असाल तर येणाऱ्या जीवनामध्ये आशा, प्रेम आणि सुख तुमची वाट पाहत असेल.

कम्पेयर योरसेल्फ टू हू यू वर यस्टरडे, नॉट टू हू समवन एल्स इज़ टुडे  (Compare yourself to who you were yesterday, not to who someone else is today)

इमॅजीन करा की एक दिवस तुम्ही सोशल मीडिया ब्राऊझ करत आहात. तुमच्या मित्रांची पोस्ट तुमच्या समोर येते आणि तुम्ही त्यांचे फोटोज पाहायला लागता.

त्यांच्यामधील काहीजण युरोपमध्ये व्हेकेशन साठी गेले आहेत, तर कोणाला जॉब मध्ये प्रमोशन मिळाल आहे, तर कोणाला त्यांच्या जीवनाचा साथीदार मिळाला आहे आणि त्यांचे लग्न झाले आहे, कोणाला त्यांच्या फील्ड मध्ये अवॉर्ड मिळाला आहे आणि काहींनी मास्टर्सची डिग्री पूर्ण केली आहे.

आता तुम्ही स्वतःला त्यांच्याशी कम्पेअर करायला सुरुवात करता की, कोठे ते आयुष्यात मज्जा करत आहेत आणि कुठे तुम्ही आहात जे आपल्या अस्ताव्यस्त झालेल्या आणि खराब अपार्टमेंट मध्ये मांजरी सोबत एकटे बसून बियर पीत आहात.

आता तुम्ही खूप इंसेक्योर (असुरक्षित) आणि जेलस फील करायला सुरुवात करता. तुम्ही इथपर्यंत विचार करून टाकता की तुम्ही काहीच विशेष न करता, काहीच असं न करता ज्यावर तुम्हाला गर्व असेल असेच एकटे मरून जाल.

परंतु हे मुळीच सत्य नाहीे. जर तुम्ही म्युझिशियन असाल तर स्वतःला ग्रेट मोझार्ट सोबत कम्पेअर करू नका. जर तुम्ही शेफ असाल तर स्वतःला मास्टरशेफ र्गॉर्डन सोबत कम्पेअर करू नका. तुमच्याकडे तुमची स्वतःची युनिक स्कील आहे.

“तुम्ही त्यांच्या पेक्षा वेगळे आहात, त्यांच्या पेक्षा कमी नाही” तुम्ही स्वतःच  एक कमाल व्यक्तिमत्व आहात. या पूर्ण जगामध्ये अगदी तुमच्यासारख दुसरं कोणीच नाही.

म्हणून जसे  तुम्ही आहात तसे स्वतःला स्वीकारा. तुमच्या मध्ये जे विशेष गुण आहेत त्यांना इम्प्रुव करा. दुसऱ्याची नक्कल करायला जाल तर, तुम्ही त्यांच्यासारखे मुळीच बनणार नाहीत, पण तुम्ही स्वतःची ही ओळख बनवू शकणार नाहीत.

स्वतःला दुसऱ्यांशी कम्पेअर करण्याऐवजी तुम्ही काल जे होते त्याच्याशी स्वतःला कम्पेअर करा. तेव्हा तुम्ही तुमच्यातील खरा फरक पाहू आणि समजू शकाल. प्रत्येक दिवशी स्वतःला कालपेक्षा बेटर बनवण्यासाठी प्रयत्न करा, स्किल्सला इम्प्रुव करण्याची प्रॅक्टिस करत राहा.

आणि प्रोग्रेस ला व्यवस्थित नोटीस करत राहा. तुम्हाला स्वतःवर नक्कीच प्राउड फील व्हायला सुरुवात होईल. असुरक्षित फील करणे ही चांगली सवय नाही. सोशल मीडिया ब्राउझ करण्याऐवजी किंवा स्वतःमध्ये कमी पणा शोधण्याऐवजी आपल्या वेळेला आणि एनर्जी ला दुसऱ्या प्रॉडक्टिव गोष्टींमध्ये वापरा. जर तुम्ही कामाला उद्यावर ढकलण्याच्या सवयीला सोडून दिलं तर तुम्ही खूप इंप्रुव करू शकाल. जे तुम्हाला आवडते ते करत रहा.

स्वतःला दुसऱ्यांशी कम्पेअर करणे हे आपल्या मध्ये केवळ निगेटिव्हिटी ला जन्म देते, आपल्या कॉन्फिडन्स ला कमी करायला सुरुवात करते. हे तुमच्या चांगल्या गोष्टींना संपवून तुम्हाला निगेटिव्ह व्यक्ती बनवू लागते. परंतु तुमचे ध्येेय स्वतःला काल पेक्षा एक बेटर व्यक्ती बनवणे हेच हवे. तेव्हा तुमचं जीवन खऱ्या अर्थाने सुंदर असेल. आणि याला सिद्ध करण्यासाठी तुम्हाला कोणत्या सोशल मीडियावर पोस्ट करण्याची गरज नाही.

TO READ OR LISTEN COMPLETE BOOK CLICK HERE

SHARE
Subscribe
Notify of
Or
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments