10% Happier: How I Tamed the Voice in My Head, Reduced Stress Without Losing My Edge, and Found Self-Help That Actually Works–A True Story (Marathi)

10% Happier: How I Tamed the Voice in My Head, Reduced Stress Without Losing My Edge, and Found Self-Help That Actually Works–A True Story (Marathi)

समरी ऑफ 10% हैप्पीयर डैन हैरीस द्वारे

परिचय

असे कधी झाले आहे का, की तुम्ही कामात अडकले आहात आणि तुमच्या मनाचा आवाज सतत तुमच्या कामात अडथळा आणत आहे?  जर आपल्यालापैकी एखाद्याचे उत्तर 'होय' असेल तर हे पुस्तक त्यांच्यासाठी योग्य आहे. लेखकाच्या वैयक्तिक अनुभवातून लिहिले गेलेेल  हे पुस्तक तुम्हाला मन शांत करण्यास शिकवेल.

डैन हैरीस अमेरिकाचे फेमस जर्नलिस्ट आहेत. ते लोकप्रिय  टीव्ही शो “गुड मॉर्निंग अमेरिका”  मध्ये अँकर म्हणून काम करणाऱ्या बऱ्याच न्यूज अँकरपैकी एक आहेत.

ही कहाणी त्यांच्या स्वतः च्या अंतर्गत शांतीला शोधण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांची आहे. काम करताना स्वत:चे मन शांत ठेवण्यासाठी त्यांनी शोधलेल्या उपायांची आहे. आपले लेखक डैन म्हणतात, ध्यान केल्याने ते 10% जास्त आनंदी राहतात. या पुस्तकामधून आपण आपल्या मनाला कसे शांत करावे हे शिकणार आहोत.

तसेच हे पुस्तक शांत मनाचा आनंद कसा घ्यायचा हे देखील शिकवेल. आपण आपल्या मनाचा आवाज थांबवू शकत नाही आणि तो थांबणार ही नाही. पण आपण आपल्या मनाला आपला सर्वात चांगला मित्र बनवू शकतो.

TO READ OR LISTEN COMPLETE BOOK CLICK HERE

एयर हंगर

मी जर तुम्हाला विचारलं, तुमचा सर्वात जवळचा मित्र कोण आहे? तुम्ही एखाद्या मित्राचे नाव घेताल, हो ना?
तुम्हाला पुन्हा प्रतिप्रश्न केला, तोच मित्र का बरं?
कदाचित तुमचे उत्तर असं असेल, तो माझ्या सुखात आणि दुःखात माझ्या सोबत असतो. पण मला वाटते आपल्या सगळ्यांचा सर्वात जवळचा मित्र मनच (माईंड) आहे.

कारण, खूप वेळेस आपण मनाच्या आवाजाला खरं काय आणि खोटं काय या प्रश्नावर विचार करण्यासाठी, स्वतःशीच संवाद करण्यासाठी, स्वतः ला एखाद्या कामाची आठवण करून देण्यासाठी, स्वतः ला मोटीवेट करण्यासाठी, योग्य मार्गावर राहण्यासाठी, जेणेकरून आपण चुकीच्या मर्गावर जाणार नाहीत. तसेच, आपल्याला आयुष्यात काय करायचे आहे हे ठरवण्यासाठी मदत करते.

म्हणतात ना, तुमच्या आतून एक आवाज येतो, त्याला ऐका आणि फॉलो करा. तो आवाज म्हणजेच आपले मन.

पण हे मन आपले सर्वात मोठे शत्रू देखील होवू शकते आ. जेव्हा आपण दुःखी होतो तेव्हा हाच आवाज आपल्याला मदत करतो, पण जेव्हा आपण घाबरलेले असतो तेव्हा हाच आवाज आपल्याला उध्वस्त ही करू शकतो. याचे उत्तम उदाहरण द्यायचे झाले तर अशी लोक ज्यांच्या मनात आत्महत्या करायचा विचार येतो.

त्या विचारांचा जन्म त्यांच्या मनातुनच होत असतो. तेच मन त्यांना चुकीचा निर्णय घ्यायला सांगते. हे मन आपल्याला चुकीचा व्यवहार करायला ही लावते आणि आपल्या भविष्यात येणाऱ्या चांगल्या संधीना खराब ही करू शकते.

डैन हॅरिस हे तुमच्या आमच्या सारखेच साधारण व्यक्ती आहेत. ते सामान्य कुटुंबात मोठे झाले. त्यांचे आई वडील दोघे ही डॉक्टर आहेत. त्यांच्या कडूनही घरच्यांनी तीच अपेक्षा केली जी नॉर्मली आपल्या कडेही केली जाते. ती अपेक्षा होती, त्यांनीही डॉक्टर होवून फॅमिली च्या या परंपरेला पुढे न्यावे. पण कुटुंबाच्या अपेक्षा असूनही, त्यांनीे वेगळा मार्ग निवडण्याचे ठरविले.

डैनला टीनएज (Teenage) पासूनच एक पत्रकार व्हायचे होते.

त्यांना पहिली नोकरी अमेरिकेच्या बेंगोरमधील सर्वात लहान टेलिव्हिजन चॅनल मध्ये लागली होती.
जरी ते मोठ्या Television channel वर नोकरी करत नव्हते, तरीही डैन आनंदी आणि statisfied होते कारण त्यांनी त्या कामाला सुरुवात समजली होती. ते आणखी पुढचा विचार व इतर गोष्टी करण्याचा प्रयत्न करत होते.

डैन बॅंगोरहून पोर्टलँडला, आणि तिथून बोस्टनला गेले. त्यांनी मोठ मोठ्या स्टोरीज ला कव्हर केले. त्यांना जी पोझिशन हवी होती त्यासाठी रिपोर्टिंग तिथं पर्यंत जाण्याचा मार्ग होता. त्यांना न्यूयॉर्क मध्ये येऊन काम करायचं होत.

शेवटी, ७ वर्षांनंतर डैन न्यूयॉर्क मध्ये आले. ते एका अत्यंत प्रसिद्ध टेलिव्हिजन चॅनेलपैकी एका चॅनेल वर काही दिग्गजांबरोबर काम करत होते. डैनला केवळ दिग्गजांबरोबर काम करायचे नव्हते तर त्या दिग्गजांपैकी एक व्हायचे होते. त्यांनी War Zones मधील स्टोरीज कवर केल्या होत्या. यामुळे त्यांना जीवनात एडवेंचर ची सवय झाली होती.

त्यांना स्वतः ला टीव्हीवर पाहण्याची आवड होती. ते स्वतः च्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी भूकेलेले होते. त्यांच्या जिद्दी मुळेच ते कमी वयात सगळ्यांपेक्षा जास्त सक्सेसफुल न्यूज़ रिपोर्टर बनले होते.

“पाकिस्तानची असाईनमेंट” त्यांचा पहिला मोठा ब्रेक होता. डैन कधीच अमेरिकेतून बाहेर गेले नव्हते, परंतु आता ते जगभर फिरू लागले, ते आता जगाच्या वेगळ्या भागात, लक्झरी हॉटेलमध्ये राहायला लागले.

पाकिस्तान च्या पहिल्या टास्क नंतर त्यांना असे खूप सारे टास्क मिळाले. जगभरातील बर्‍याच war zones मधून डैनने रिपोर्ट केले. ते war zones सारख्या वातावरणात शांत राहिले असले तरी, रायफलसमोर रिपोर्टिंग देणं त्यांना भितीदायक बाब वाटत होती.

तरीही त्यांनी ते टास्क पूर्ण केले व डैन अमेरिकेत परतले, पण त्यांना त्यांचे जीवन एडवेंचरस नसल्याचे फील झाले. त्यांना उदास वाटत होते, ते सुखाला शोधण्याचा प्रयत्न करू लागले. डैन ने चुकीच्या लोकांशी मैत्री केली आणि ते ड्रग्स घेऊ लागले. ड्रग्स मधून मिळणारे काही क्षणांचे सुख त्यांना ते जिवंत आहेत आणि सुखी आहेत याची खोटी जाणीव करून देत होते.

हळूहळू त्यांना, सकाळी उठल्या उठल्या नशेत धुंद होण्याची इच्छा होवू लागली. डैन दुःखी राहू लागले, अस्वस्थ राहू लागले. याचा परिणाम त्यांच्या शरीरावर ही झाला. नेशनल टेलीविजन वर रिपोर्टिंग करताना त्यांना अटॅक आला.

अटॅक मुळे ते घाबरुन गेले. त्यांना हे समजले की त्यांना काहीतरी करण्याची गरज आहे. एके दिवशी डैन लाइव रिपोर्टिंग करत होते. स्टूडियो च्या एंकर्स ने त्यांना इंट्रोड्यूस केले, कैमेरा चा फोकस त्यांच्या चेहऱ्यावर होता. पण, अचानक त्यांना जे बोलायचे होते ते सगळं विसरले.

ते घाबरून जणू स्तब्ध झाले होते. त्यांच्या तोंडातून शब्द फुटत नव्हते. अमेरिकेत,  आपल्या घरातून लाखो लोक त्यांना पाहत होते. डैन एकदम गोंधळलेले उभे होते. कसे बसे त्यांनी बोलायल सुरुवात केली. पण, त्यांना जे बोलायचे होते त्या रिपोर्ट ला त्यांनी अगदी मोजक्या शब्दात अस्पष्टपणे सांगितले. त्यांनी स्टूडियो च्या एंकर्स चे नाव घेण्यात ही चुकी केली होती.

डैनला तेव्हा हे कळून चुकले, त्यांना त्यांच्या सवयींना बदलावे लागणार आहे. त्यांना कळाले, जे घडले ते स्वतःसाठी घेतलेल्या चुकीच्या निर्णयांमुळे घडले आहे. स्वतः ला आनंदी करण्यासाठी ड्रग्स घेणे ही त्यांची सगळ्यात मोठी चुक होती. डैन ने एका साइकेट्रिस्टचा सल्ला घेतला. त्यांनी ड्रग्स घेणे, पार्टी करणे तसेच, असे मित्र जे त्यांना चुकीच्या मार्गावर घेऊन जात होते त्यांना भेटणे बंद केले.

त्यांना कळाले की लाइव न्यूज़ मध्ये असण्याची भूक त्यांना इतर कोणत्याही गोष्टी पेक्षा जास्त महत्वाची वाटत होती. त्यांनी आता केवळ एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करायचे ठरवले आणि ती गोष्ट होती, येणाऱ्या स्टोरी ला जेवढं चांगल कव्हर करता येईल तेवढं चांगल कव्हर करायचे.

TO READ OR LISTEN COMPLETE BOOK CLICK HERE

Unchurched

डैन हैरीस ने एका war रिपोर्टर च्या रुपात चांगली
प्रसिध्दी मिळवली होती. त्यांनी त्यांच्या कारकीर्दीतील पुढचे पाऊल, धार्मिक लढा आणि चुचच्या गटांना कव्हर करण्यासाठी उचलले.

जेव्हा डैन 9 वर्षांचे होते, तेव्हा त्यांच्या आईने त्यांना सांगितले होते की, सैंटा क्लॉस किंवा भगवान या केवळ लिहिलेल्या गोष्टी आहेत.म्हणूनच, डैन जास्त धार्मिक नव्हते. तरीही त्यांनी धार्मिक गोष्टींना कव्हर करण्याचे ठरवले. डैनने खूप चर्च मध्ये रिपोर्टिंग केली. यूनाइटेड स्टेट्स मध्ये जेवढे रीलिज़न आहेत, त्या सगळ्यांबद्दल माहिती काढली.

डैन यावेळी Bomb, Rifles असणाऱ्या war zones मधून शांती असणाऱ्या war zones मध्ये आले होते. जिथे लढाई शब्दांतून आणि चर्चेतून जिंकली जात होती.

डैन ला हे नवीन चॅलेंज वाटत होते. त्यामुळे त्यांनी स्वतः ला यासाठी तयार केले. ते इजरायल, Egypt, इराक सारख्या देशात रिपोर्टिंग करण्यासाठी गेले. हे असे देश आहेत जेथे धर्म जीवनाच्या महत्त्वाच्या गोष्टी मधील एक गोष्ट आहे. त्यांनी धर्माला केवळ career म्हणून पाहिले.तिथे काम करून डैन घरी येतातच,  तर  त्यांना कळते की त्यांचे senior पीटर वारले आहेत.

त्यांना हे ही सांगण्यात आले की, या घटनेमुळे त्यांच्या टीवी स्टेशन मध्ये बदल होवू शकतो आणि तसेच झाले. डैनला आता “संडे न्यूज़ डिवीजन” मध्ये कामास पाठवले होते. डैन पीटर वारल्याच्या दुःखा मुळे, जॉब प्रमोशन, नवीन कामाचा लोड आणि कधी कधी ड्रग्स घेण्याच्या सवयीमुळे धार्मिक बनले नाही.

ते धर्माला केवळ एका जर्नलिस्ट च्या नजरेने पाहत होते. त्यांना धर्म केवळ बातम्यांसाठी आणि या विषयात रस असणार्‍या प्रेक्षकांसाठी कव्हर करायचा होता. म्हणून डैन चर्चा करून अनेक फादरच्या मुलाखती घेत राहिले.

त्यांनी “न्यू लाइफ” चर्चचे प्रमुख टेड हैगर्ड यांची भेट घेतली. टेड यांना बरेच लोक फॉलो करत होते. डैन टेडचे विचार आणि शिकवण ऐकत. डैन टेडचा सन्मान करायला लागले, ते दोघे एक चांगले मित्र झाले.

पण हे ऐकून डैनला आश्चर्य वाटले की टेडचा एका ड्रग्सचा व्यापार करणाऱ्या माणसाशी संबंध आहे. टेडच्या देवाला घाबरणाऱ्या दयाळू फादरच्या इमेजच्या मागे, त्यांचे हे सत्य लपून होते.

डैनला हे कळाले कारण, ड्रग्सचा व्यापार करणाऱ्या त्या व्यक्तीने डैनला टीवी वर पाहिले आणि डैनशी कॉन्टॅक्ट केला. त्याने डैनला काही पुरावे दिले ( कदाचित फादर टेड आणि त्या व्यक्तीत शत्रुत्व निर्माण झाले असावे)

त्या पुराव्या मधून हे लक्षात आले की फादर टेड, जे homosexuality विरूद्ध बोलत होते, जे हजारो लोकांचे लीडर आणि ५ मुलांचे वडील होते. ते सुरुवाती पासूनच दुहेरी जीवन जगत आले. सगळी मीडिया इंडस्ट्री या स्कैंडल ला पाहून चकीत झाली आणि डैनने  War zones प्रमाणे धर्मीक विषयातही प्रसिध्दी मिळवली.

यातच डैन बियांकाला भेटले आणि त्यांना तिच्यावर प्रेम झाले. डैन ला बियांकाच्या रुपात एक बेस्ट फ्रेंड आणि सोलमेट मिळाली होती. बियांका 3 महिन्याने त्यांच्या अपार्टमेंट मध्ये राहू लागली. त्यांचे नाते आणखीन मजबूत झाले होते. डैन काम करण्यासाठी आणखीन जास्त मोटिवेट झाले होते.

आत्ता पर्यंत आपण डैनच्या Adventurous जीवना बद्दल ऐकले, त्यांचे व्यक्तिगत आयुष्यही सुंदर झाले होते. आता त्यांच्या आयुष्यात आलेल्या टर्निंग पॉईंट बद्दल पाहुया….

TO READ OR LISTEN COMPLETE BOOK CLICK HERE

SHARE
Subscribe
Notify of
Or
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments